Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 134
ऋषिः - त्रिशोकः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
भि꣣न्धि꣢꣫ विश्वा꣣ अ꣢प꣣ द्वि꣢षः꣣ प꣢रि꣣ बा꣡धो꣢ ज꣣ही꣡ मृधः꣢꣯ । व꣡सु꣢ स्पा꣣र्हं꣡ तदा भ꣢꣯र ॥१३४॥
स्वर सहित पद पाठभि꣣न्धि꣢ । वि꣡श्वाः꣢꣯ । अ꣡प꣢꣯ । द्वि꣡षः꣢꣯ । प꣡रि꣢ । बा꣡धः꣢꣯ । ज꣣हि꣢ । मृ꣡धः꣢꣯ । व꣡सु꣢꣯ । स्पा꣣र्ह꣢म् । तत् । आ । भ꣣र ॥१३४॥
स्वर रहित मन्त्र
भिन्धि विश्वा अप द्विषः परि बाधो जही मृधः । वसु स्पार्हं तदा भर ॥१३४॥
स्वर रहित पद पाठ
भिन्धि । विश्वाः । अप । द्विषः । परि । बाधः । जहि । मृधः । वसु । स्पार्हम् । तत् । आ । भर ॥१३४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 134
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात परमेश्वराला राजाला आणि आचार्याला विघ्नविनाशासाठी आणि धनप्रदानासाठी प्रार्थना केली आहे -
शब्दार्थ -
हे इन्द्र, विद्यावीर, दयावीर, बलवीर परमात्मा, हे राजा वा हे आचा४, आपण (विश्वाः) सर्व (द्विषः) द्वेष भावना आणि काम, क्रोध, लोभ आदी असुरांना तसेच मानव राक्षसांच्या सैन्याला (दुष्ट मनुष्यांना) (अप भिन्धि) विदीर्ण करा. (बाधः) बाधक, सन्मार्गात अडथळे उत्पन्न करणाऱ्या (मृघ) आमच्याशी युद्ध करणाऱ्या पापकर्मांना (परि जहि) सर्वत्र सर्वथा नष्ट करूा. (तत्) तो प्रसिद्ध (स्पार्हम्) स्पृहणीय (वसु) सत्य, अहिंसा, आरोग्य, विद्या, सुवर्ण आदी आध्यात्मिक व भौतिक घन (आभर) आम्हा (उपासकांना / प्रजाजनांना वा शिष्यांना) प्रदान करा. ।। १०।।
भावार्थ - मनुष्यंनी परमेश्वर, राजा आणि आचार्य यांच्या साह्याने आपल्या सन्मार्गातील राग, द्वेष, पाप, विघ्न आदी अडथळे दूर केले पाहिजेत आणि सर्व प्रकारचे ऐश्वर्य संपादित केले पाहिजे. ।। १०।। या दशतीध्ये इन्द्र नाम परमेश्वराच्या गुणांचे वर्णन असून त्यापासून ऐश्वर्य प्राप्तीची प्रार्थना केली आहे. तसेच परमेश्वराला प्रणाम अर्पित केले असून त्याला शत्रुनिवारा आणि स्पृहणीय धनाची याचना केली आहे. या सर्व विषयांच्या वर्णनामुळे या दशतीच्या विषयांशी यापूर्वीच्या दशतीची संगती आहे, असे जाणावे. द्वितीय प्रपाठकातील प्रथम अर्धापैकी चतुर्थ दशती समाप्त. द्वितीय अध्यायातील द्वितीय खंड समाप्त
विशेष -
आता इंद्राचे सहकारी मरुत यांचे वर्णन करीत आहेत. येथे जरी इन्द्राचे सहकारी म्हणून मरुतांची स्तुती केली आहे, तथापि सैनिकांच्या स्तुतीच्या माध्यमातून सेनापतीचीच स्तुती केली आहे, असेच मानले जाते. या न्यायाने या मंत्राची देवता इन्द्र मानली आहे. ऋग्वेदातही मरुतांनाच या मंत्राची देवता म्हटले आहे. इन्द्र शब्दाने शरीराचा सम्राट जीवात्मा अपेक्षित असून राष्ट्राचा सम्राट राष्ट्रपती अभिप्रेत होत आहे. जीवात्मारूप इन्द्राचे सहकारी आहेत मरुत आणि राष्ट्रपतीरूप इन्द्राचे सहकारी मरुत म्हणजे राष्ट्राचे सैनिक. या मंत्राचा असाच अर्थ घेतला पाहिजे.।।