Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 211
ऋषिः - गोषूक्त्यश्वसूक्तिनौ काण्वायनौ
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
अ꣣पां꣡ फेने꣢꣯न꣣ न꣡मु꣢चेः꣣ शि꣡र꣢ इ꣣न्द्रो꣡द꣢वर्तयः । वि꣢श्वा꣣ य꣡दज꣢꣯य꣣ स्पृ꣡धः꣢ ॥२११॥
स्वर सहित पद पाठअ꣣पा꣢म् । फे꣡ने꣢꣯न । न꣡मु꣢꣯चेः । न । मु꣣चेः । शि꣡रः꣢꣯ । इ꣣न्द्र । उ꣢त् । अ꣣वर्तयः । वि꣡श्वाः꣢꣯ । यत् । अ꣡ज꣢꣯यः । स्पृ꣡धः꣢꣯ ॥२११॥
स्वर रहित मन्त्र
अपां फेनेन नमुचेः शिर इन्द्रोदवर्तयः । विश्वा यदजय स्पृधः ॥२११॥
स्वर रहित पद पाठ
अपाम् । फेनेन । नमुचेः । न । मुचेः । शिरः । इन्द्र । उत् । अवर्तयः । विश्वाः । यत् । अजयः । स्पृधः ॥२११॥
सामवेद - मन्त्र संख्या : 211
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - ‘नमुचि - संहार’ - परमेश्वर, जीवात्मा, वैध, राजा आणि सेनाध्यक्ष यांद्वारे -
शब्दार्थ -
(प्रथम अध्यात्मपर) हे (इन्द्र) परमेश्वर अथवा हे जीवात्मा (अपां फेनेन) पाण्याच्या फेसाप्रमाणे स्वच्छ सात्त्विक तरंगाद्वारे देखील (नमुचेः) न सुटणारे किंबहुना चित्तावर अधिकच दृढतेचे आपली सत्ता बसविणाऱ्या पापभावनेच्या (शिरः) मस्तकाला अर्थात पापाच्या मोठ्या आक्रमणाला (उदवर्तायः) तुम्ही दूर करता वा त्यास परावर्तित करता (तुम्ही पापनाशक आहात) तुम्ही (यत्) जेव्हा तसे करता, तेव्हा (विश्वाः) सर्व (स्पृधः) पापरूप नमुचिचे सहाय्यक असलेल्या काम, क्रोध आदी शत्रूंचे सैन्य (अजयः) जिंकून घेता (आमच्या हृदयातील षड्रिपूनां निस्सन्देह नष्ट करण्याचे सामर्थ्य तुमच्याजवळ आहे.) ।।
द्वितीय अर्थ - (आयुर्वेदपर) - हे (इन्द्र) रोगनिवारक वैद्यराज, तुम्ही (अपां फेनेन) समुद्र फेस रूप औषदाद्वारे (नमुचेः) शरीराला न सोडणाऱ्या असाध्यप्राय रोगांच्या (शिरः) हानिकर प्रभावाला (उदवर्तायः) उच्छिन्न करता. (यत्) त्या वेळी तुम्ही जे कार्य करता, त्याद्वारे (विश्वाः) समस्त (स्पृधः) स्पर्धा करणाऱ्या रोगाची वृद्धी करणारे जे वेदना, वमन मूर्च्छा आदी सहाय्यक आहेत, त्यांना (अजयः) तुम्ही जिंकून घेता (रोग्याला निरोगी करता)।।
तृतीय अर्थ - (राजापर) - हे (इन्द्र) वीर राजा, आपण (अपां) राष्ट्रात व्यात (फेनेन) कररूपाने प्राप्त आणि चक्रवृद्धी व्याजाद्वारे अर्जित धनाद्वारे (नमुचेः) राष्ट्राला न सोडणारे अथवा राष्ट्रात व्याप्त होऊन अधिकच त्रास देणाऱ्या दुःख, दारिद्रय आदींच्या (शिरः) मस्तकाला म्हणजे अग्रतेला (उदवर्तयः) विच्छिन्न करता, असे करताना आपण (यत्) जे (विश्वाः) सर्व (स्पृधः) स्पर्धा करणारे शत्रुसैन्य आहे, त्याला तुम्ही (अजयः) जिंकून घेता.।।
चतुर्थ अर्थ - (सेनाध्यक्षपर) हे (इन्द्र) सूर्याप्रमाणे तेजस्वी, शत्रुविदारक सेनापती, आपण (अपां फेनेन) पाण्याच्या फेसाप्रमाणे उज्ज्वळ अशा अस्त्र- शस्त्राद्वारे (नमुचेः) वीराचा कायम पाठलाग करणाऱ्या शत्रूचे (शिरः) मस्तक (उदवर्तयः) धडापासून वेगळे करता. (यत्) तेव्हा (विश्वाः) सर्व (स्पृधः) स्पर्धा वा विरोध करणाऱ्या सर्व शत्रूसैन्यांवर तुम्ही (अजयः) विजय मिळविता.।। ८।।
भावार्थ - ज्याप्रमाणे एक वैध समुद्र फेन (प्रवाळ) आदी औषधींद्वारे रोग नष्ट करतो, जसा एक राजा प्रजेकडून प्राप्त होणऱ्या कर रूप धनाने प्रजेचे दुःख हरण करतो, जसा एक सेनापती शस्त्रास्त्राद्वारे शत्रूचा शिरच्छेद करतो, त्याचप्रमाणे परमेश्वर आणि जीवात्मा मनुष्याच्या मनातील पापभावना सात्त्विक वृत्तीच्या उदयाद्वारे दूर करतो वा उन्मूलित करतो.।। ८।। सायणाचार्याने मात्र या मंत्रात इतिहास दाखविला आहे. तो असा - केव्हा एके काळी इंद्राने अनेक असुरांचा वध केला, पण नमुचि नावाच्या राक्षसाचा वध करणे त्याला शक्य झाले नाही. उलट इंद्रच नमुचीच्या तावडीत सापडला. नमुचीने युद्धात इंद्राला बंदी केले. नमुचि बंदीवान असलेल्या इंद्राला म्हणाला, ‘मी तुला एका अटीवर मुक्त करू शकतो. ती अट अशी की तू दिवसा माझा वध करू नकोस आणि रात्री पण नको. तू मला कोरड्या शस्त्राने मारायचे नाही तसे ओल्या शस्त्रानेही ठार मारायचे नाही.’ इंद्राने नमुचीची अट मान्य केल्यानंतर नमुचीने इंद्रास मुक्त केले. मुक्त झालेल्या इंद्राने नंतर दिवस - रात्रीच्या संधिकाळात पाण्याच्या फेसाने त्याचे मस्तक भग्न केले (दिवस- रात्री चा संधिकाळ म्हणजे दिवसही नसतो व रात्रही नाही. तसेच फेस कोरडा नाही तसे ओलाही नसतो) अशा प्रकारे मंत्रात इतिहास दाखवून सामण म्हणतात की या ऋचेत हाच विषय प्रतिपादित आहे. विवरणकार माधव यानेही सा इतिहास या मंत्रात असल्याचे म्हटले आहे. वास्तव असे की असे कथानक निव्वळ कल्पित असून हा काही खरेच घडलेला प्रसंग व ऐतिहासिक घटना नाही.।।८।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. याशिवाय या मंत्रात उपमान उपमेद भावदेखील ध्वनित होत आहे.।। ८।।