Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 212
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

इ꣣मे꣡ त꣢ इन्द्र꣣ सो꣡माः꣢ सु꣣ता꣢सो꣣ ये꣢ च꣣ सो꣡त्वाः꣢ । ते꣡षां꣢ मत्स्व प्रभूवसो ॥२१२

स्वर सहित पद पाठ

इ꣣मे꣢ । ते꣣ । इन्द्र । सो꣡माः꣢꣯ । सु꣣ता꣡सः꣢ । ये । च꣣ । सो꣡त्वाः꣢꣯ । ते꣡षा꣢꣯म् । म꣣त्स्व । प्रभूवसो । प्रभु । वसो ॥२१२॥


स्वर रहित मन्त्र

इमे त इन्द्र सोमाः सुतासो ये च सोत्वाः । तेषां मत्स्व प्रभूवसो ॥२१२


स्वर रहित पद पाठ

इमे । ते । इन्द्र । सोमाः । सुतासः । ये । च । सोत्वाः । तेषाम् । मत्स्व । प्रभूवसो । प्रभु । वसो ॥२१२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 212
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ - (परमात्मपर अर्थ) हे (इन्द्र) परमेश्वर, (ते) तुमच्याकरिता (इमे) आम्ही वर्तमानकाळी प्रस्तुत करीत असलेला जो (सोमाः मैत्रीपूर्ण रस (भक्तीभावात रंगलेले ध्यान) आहे आणि (ये) जे (सुतासः) भूतकाळी निष्पादित (भक्ति वा उपासनारूप रस) आहेत, ते व तसे भाव (सोत्वाःच) भविष्यकाळीदेखील निष्पादित होत राहतील (आम्ही तुमची भक्ती करती आलो आहोत, करीत आहोत व पुढेही करीत राहू.) हे (प्रभूवसो) आमच्या हृदयात सद्गुणांची स्थापना करणआऱ्या हे परमेश्वरा, तू (तेषाम्) त्या आनंद रसाने (मत्स्व) प्रभुदित व्हा।। द्वितीय अर्थ - (जीवात्मा पक्षी) - हे (इन्द्र) जीवात्मा, (ते) तुझ्यासाठी (इमे) हे वर्तमानकाळी आम्ही प्रस्तुत करीत असेले (ये) जे (सोमाः) ज्ञानरस, कर्मरस व श्रद्धारस आहेत, तसेच (सुतासः) पूर्वी भूतकाळी व्यक्त केलेले जे रस आहेत (सोत्वाःच) ते भविष्यकाळीदेखील व्यक्त होत राहतील. हे (प्रभूवसो) मन, बुद्धी, इंद्रिये आदींना अत्यधिक स्थिर वा शांत करणाऱ्या जीवात्मा, (तेषाम्) त्या रसाद्वारे तू (भत्स्व) तृप्त होत म्हणजे अधिक ज्ञानवान, अधिक कर्मण्य आणि श्रद्धावान हो।। ९।।

भावार्थ - सर्वांचे कर्तव्य आहे की उपासकांच्या मनात सद्गुणांची स्थापना करणाऱ्या आणि दिव्य संपदेचा जो स्वामी त्या परमेश्वराला सदा सर्वकाळी मैत्री रसाने तृप्त करावे (त्याला आपला सर्वश्रेष्ठ मित्र मानावे) आणि आपल्या आत्म्यास ज्ञानरस, कर्मरस व श्रद्धारसाने तृप्त करावे.।। ९।।

इस भाष्य को एडिट करें
Top