Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 213
ऋषिः - श्रुतकक्षः सुकक्षो वा आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
तु꣡भ्य꣢ꣳ सु꣣ता꣢सः꣣ सो꣡माः꣢ स्ती꣣र्णं꣢ ब꣣र्हि꣡र्वि꣢भावसो । स्तो꣣तृ꣡भ्य꣢ इन्द्र मृडय ॥२१३॥
स्वर सहित पद पाठतु꣡भ्य꣢꣯म् । सु꣣ता꣡सः꣢ । सो꣡माः꣢꣯ । स्ती꣣र्ण꣢म् । ब꣣र्हिः꣢ । वि꣣भावसो । विभा । वसो । स्तो꣡तृभ्यः꣢ । इ꣣न्द्र । मृडय ॥२१३॥
स्वर रहित मन्त्र
तुभ्यꣳ सुतासः सोमाः स्तीर्णं बर्हिर्विभावसो । स्तोतृभ्य इन्द्र मृडय ॥२१३॥
स्वर रहित पद पाठ
तुभ्यम् । सुतासः । सोमाः । स्तीर्णम् । बर्हिः । विभावसो । विभा । वसो । स्तोतृभ्यः । इन्द्र । मृडय ॥२१३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 213
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - उपासकांना परमेश्वराने सुख द्यावे -
शब्दार्थ -
हे (विभावसो) तेजरूप संपदा असलेल्या परमेश्वरा, (तुभ्यम्) तुझ्यासाठी (सोमाः आम्ही प्रेमरस (सुतासः) निष्पादित केले आहेत (भक्तिभाव अर्पित केले आहेत) आणि तुझ्या स्वागतासाठी (बर्हिः) हृदयरूप आसन (स्वीर्णम्) आंथरले आहे. या हृदयासनावर बसून आमच्या प्रीतीरूप सोमरसाचे प्राशन करून हे (इन्द्र) परमैश्वर्यशाली परमेश्वरा, तू (स्तोतृभ्यः) आम्हा स्तोत्यांना / उपासकांना (मृडय) आनन्द प्रदान कर।। १०।।
भावार्थ - परमेश्वराची उपासना केल्यामुळे आणि त्याच्या प्रत आपल्या प्रेमभावना समर्पित केल्यामुळे उपासकांनाच आनंद मिळतो.।। १०।। या दशतीमध्ये इंद्राचे वर्णन तरणि (नौका) या रूपाने केले असून त्याचे सहचारी असलेल्या मित्र, वरूण आणि मरुत् आदींची प्रशंसा आहे. या दशतीत इंद्राने जल फेनाद्वारे नमुचिचे मस्तक भंग करणे तसेच इंद्र नावाने विद्वान, वैद्य, राजा, सेनापती आदी विषयीदेखील विचार प्रकट केले आहेत. याकरिता या दशतीतील मंत्रांच्या अर्थाची संगती मागील दशतीच्या अर्थाशी आहे, असे जाणावे.।। तृतीय प्रपाठकातील प्रथम अर्धाची द्वितीय दशती समाप्त. द्वितीय अध्यायातील दशम खंड समाप्त.
इस भाष्य को एडिट करें