Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 254
ऋषिः - रेभः काश्यपः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
या꣡ इ꣢न्द्र꣣ भु꣢ज꣣ आ꣡भ꣢रः꣣꣬ स्व꣢꣯र्वा꣣ꣳ अ꣡सु꣢रेभ्यः । स्तो꣣ता꣢र꣣मि꣡न्म꣢घवन्नस्य वर्धय꣣ ये꣢ च꣣ त्वे꣢ वृ꣢क्त꣡ब꣢र्हिषः ॥२५४॥
स्वर सहित पद पाठयाः꣢ । इ꣣न्द्र । भु꣡जः꣢ । आ꣡भ꣢꣯रः । आ꣣ । अ꣡भरः꣢꣯ । स्व꣢꣯र्वान् । अ꣡सु꣢꣯रेभ्यः । अ । सु꣣रेभ्यः । स्तोता꣡र꣢म् । इत् । म꣣घवन् । अस्य । वर्धय । ये꣢ । च꣣ । त्वे꣡इति꣢ । वृ꣣क्त꣡ब꣢र्हिषः । वृ꣣क्त꣢ । ब꣣र्हिषः । ॥२५४॥
स्वर रहित मन्त्र
या इन्द्र भुज आभरः स्वर्वाꣳ असुरेभ्यः । स्तोतारमिन्मघवन्नस्य वर्धय ये च त्वे वृक्तबर्हिषः ॥२५४॥
स्वर रहित पद पाठ
याः । इन्द्र । भुजः । आभरः । आ । अभरः । स्वर्वान् । असुरेभ्यः । अ । सुरेभ्यः । स्तोतारम् । इत् । मघवन् । अस्य । वर्धय । ये । च । त्वेइति । वृक्तबर्हिषः । वृक्त । बर्हिषः । ॥२५४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 254
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला आणि राजाला प्रार्थना
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) - हे (इन्द्र) परमेश्वर, (स्वर्वान्) धनवान, प्रकाशवान आणि आनंदवान, आपण (अ सुरेभ्यः) अशा लोकांसाठी ज्यानी सुरापान केलेले नाही, पण ते सावध आहेत, त्यांच्यासाठी (याः भुजः) आपण अंत प्रकाशरूप वा आनंदरूप भोग (आअभरः) आपण आणता वा देता, हे (मघवन्) दिव्य संपदेचे स्वामी, त्या आनंदपूर्ण भोगांद्वारे (अस्य) या अध्यात्म- यज्ञाच्या (स्तोतारम्) स्तोता यजमानाला (इत्) अवश्यमेन (वर्धय) वाढवा (त्यालाही तो आनंद द्या) तसेच (त्वयि) तुमची प्राप्ती करविणाऱ्या या अध्यात्म- यज्ञामध्ये (येच) जे (वृक्तबर्हिषः) मार्गदर्शक ऋत्विज आहेत, तुम्ही त्यांनाही वाढवा (तोच आनंद त्यांनाही द्या)।।२।।
द्वितीय अर्थ - (राजापर) - हे (इन्द्र) शत्रुविदारक, संपत्तिदायक राजा, (स्वर्नान्) राजनीतिविद्येच्या प्रकाशाने समृद्ध असे आपण (असुरेभ्यः) दान न देणाऱ्या, स्वार्थासाठी राष्ट्राची संपत्ती आपल्याच कोठारात भरून ठेवणाऱ्या कृपण माणसांपासून (याः भुजः) जे जे भोग्य पदार्थ, सर्वांसाठी उपयोगी पदार्थ (आ अभरः) जप्त करून आणले आहेत, त्याद्वारे हे (मघनन्) धनवान राजा, (अस्य) या राष्ट्रयज्ञाच्या (स्तोतारम्) स्तोता जनाला, राष्ट्रगीत गायकाला (इव्) अवश्यमेव (अर्धय) अधिक समृद्ध करा, (राष्ट्रदोही मनुष्याला मात्र मुळीच नको) (येच) तसेच जे (त्वे) तुमच्यासाठी, तुमच्या मदतीसाठी (वृक्तबर्हिषः) राष्ट्रयज्ञाचा विस्तार करणारे राजपुरुष आहेत, त्यांनादेखील आपण समृद्ध करा.।।
राजाचे हे उचित कर्तव्य आहे की राज्यात जे कृपण धनपती आहेत, त्यांना प्रेरणा करावी की त्या धनवंतांनी स्वेच्छेने निर्धन व्यक्तींना धनाने साह्य करावे. याक्तरही जे दान देणार नसतील, त्यांच्याकडून शक्तिप्रयोगाद्वारे द्रव्य हिसकावून घ्यावे. ही वैदिक मर्यादा वा आज्ञा आहे. पहा (ऋ. ६/५३/३) - ‘‘हे तेजस्वी पोषक राजा, जो आपल्या संपत्तीचे दान करू इच्छित नाही, त्याला तुम्ही दानासाठी प्रेरणा करा’’ हे राष्ट्र स्वामी राजा, दान न करणाऱ्या लोकांपासून घन हिसकावून घ्या (ऋ १/८१/९) प्रस्तुत मंत्रातदेखील हाच विचार सांगितला आहे.।।२।।
भावार्थ - जसा परमेश्वर धार्मिक उपासकांना ज्ञानाचा प्रकाश देऊन आणि दिव्य आनंद देऊन समृद्ध करतो, तद्वत राजानेदेखील राष्ट्रभक्तांना प्रोत्साहन द्यावे आणि राष्ट्र द्रोह्यांना दंडित करावे।।२।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे।।२।।