Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 272
ऋषिः - कलिः प्रागाथः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
व꣣य꣡मे꣢नमि꣣दा꣡ ह्योपी꣢꣯पेमे꣣ह꣢ व꣣ज्रि꣡ण꣢म् । त꣡स्मा꣢ उ अ꣣द्य꣡ सव꣢꣯ने सु꣣तं꣡ भ꣣रा꣢ नू꣣नं꣡ भू꣢षत श्रु꣣ते꣢ ॥२७२॥
स्वर सहित पद पाठव꣣य꣢म् । ए꣣नम् । इदा꣢ । ह्यः । अ꣡पी꣢꣯पेम । इ꣣ह꣢ । व꣣ज्रि꣡ण꣢म् । त꣡स्मै꣢꣯ । उ꣣ । अद्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । स꣡व꣢꣯ने । सु꣣त꣢म् । भ꣣र । आ꣢ । नू꣣न꣢म् । भू꣣षत । श्रुते꣢ ॥२७२॥
स्वर रहित मन्त्र
वयमेनमिदा ह्योपीपेमेह वज्रिणम् । तस्मा उ अद्य सवने सुतं भरा नूनं भूषत श्रुते ॥२७२॥
स्वर रहित पद पाठ
वयम् । एनम् । इदा । ह्यः । अपीपेम । इह । वज्रिणम् । तस्मै । उ । अद्य । अ । द्य । सवने । सुतम् । भर । आ । नूनम् । भूषत । श्रुते ॥२७२॥
सामवेद - मन्त्र संख्या : 272
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - परमात्मा आण रिाजा यांना आवाहन
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (अध्यात्मपर) - (वयम्) आम्ही ईश्वराचे उपासक (वष्रिणम्) दुर्जनांच्या व दुर्गुणांना जो विनाशक (एनम्) त्या या प्रख्यात गुणवान इंद्र परमेश्वराला (इदा) या वेळी म्हणजे आज आणि (हयः) उद्या (इह) या आमच्या उपासना - यज्ञामध्ये केलेल्या (उलीपेम) स्तुतीद्वारे प्रसन्न करू शकलो आहोत. हे माझ्या बांधवा (ईशभक्ता) तूदेखील (तस्मै उ) त्या इंद्र परमेश्वराला (अघ) आज (सवने) आपल्या जीवनरूप यज्ञामध्ये (सुतम्) उत्कर्षित श्रद्धारूप रसाने (भवः) हृदयात धारण कर अथवा त्याला आपली उपासना अर्पित कर. हे बांधवांनो, तुम्ही सर्वजण देखील (नूवम्) अवश्यमेव )श्रृते) वेदादीद्वारे त्याचा महिमा ऐका आणि तो ऐकून (आभूषत) स्तोत्ररूप उपहार त्याला देऊन अलंकृत करा.।।
द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) - (वयम्) आम्ही राष्ट्रभक्तांनी (वज्रिणम्) शत्रू, दुर्जन, चोर- लुटारू आदींना दंड देणाऱ्या (एतम्) या आपल्या सम्राटाला (इदा) या वर्तमान (संकटकाळी) आणि (हयः) काल भूतकाली (इह) या राष्ट्रोन्नती यज्ञात (अपीपेम) राजस्व कर व संपत्ती देऊन वाढविले आहे. हे मित्रा, बांधवा, (तस्मै उ) तूदेखील त्या सम्राटाप्रत (अघ) आज (सवने) राष्ट्ररूप यज्ञात (सुतम्) आपल्या आर्थिक प्राप्तीपैकी काही धनराशी वेगळी ठेऊन ती राजदेय कराच्या रूपाने (भर) प्रदान कर. हे अन्य प्रजाजनहो, तुम्हीदेखील (नूनम्) अवश्यमेष (श्रृते) राजाज्ञा ऐकल्यानंतर राजाला (आभूषत) आपापल्या देय भाग देऊन अलंकृत करा. ।। १०।।
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।। १०।।
भावार्थ - सर्व मनुष्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी दुर्गुण-नाशक, दुर्जन- विनाशक, सद्गुण पोषक परमेश्वराची उपासना करावी. त्याचप्रमाणे शत्रू, चोर, ठक, लुटारू आदी लोकांना तसेच अशांती पसरविणाऱ्या दुर्जनांना दंडित करणाऱ्या सज्जनांना आणि शांतिप्रेमी राष्ट्रनिवासींना आनंदित करणाऱ्या राजाला कर (राजस्व-कर) देऊन सम्मान केला पाहिजे. ।। १०।। या दशतीमध्ये इंद्राच्या गुणांचे वर्णन, त्याच्या महिमेने गान करणे, विषयी प्रेरणा, त्याच्यापासून गृहादी पदार्थांची याचना साह्याकरिता त्याचे आवाहन आणि इंद्र नावाने राजा आदींचे वर्णन, हे विषय असल्यामुळे या दशतीतील मंत्राच्या अर्थाची संगती मागील दशतीच्या मंत्रांच्या अर्थाशी आहे, हे जाणावे.।। तृतीय प्रपाठकातील द्वितीय अर्धाची तृतीय समाप्त । तृतीय अध्यायातील चतुर्थ खंड संपला.
इस भाष्य को एडिट करें