Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 318
ऋषिः - वसिष्ठो मैत्रावरुणिः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
इ꣢न्द्रं꣣ न꣡रो꣢ ने꣣म꣡धि꣢ता हवन्ते꣣ य꣡त्पार्या꣢꣯ यु꣣न꣡ज꣢ते꣣ धि꣢य꣣स्ताः꣢ । शू꣢रो꣣ नृ꣡षा꣢ता꣣ श्र꣡व꣢सश्च꣣ का꣢म꣣ आ꣡ गोम꣢꣯ति व्र꣣जे꣡ भ꣢जा꣣ त्वं꣡ नः꣢ ॥३१८॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्र꣢꣯म् । न꣡रः꣢꣯ । ने꣣म꣡धि꣢ता । ने꣣म꣢ । धि꣣ता । हवन्ते । य꣢त् । पा꣡र्याः꣢ । यु꣣न꣡ज꣢ते । धि꣡यः꣢꣯ । ताः । शू꣡रः꣢꣯ । नृ꣡षा꣢꣯ता । नृ । सा꣣ता । श्र꣡व꣢꣯सः । च । ꣣ का꣡मे꣢꣯ । आ । गो꣡म꣢꣯ति । व्र꣣जे꣢ । भ꣣ज । त्व꣢म् । नः꣣ ॥३१८॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रं नरो नेमधिता हवन्ते यत्पार्या युनजते धियस्ताः । शूरो नृषाता श्रवसश्च काम आ गोमति व्रजे भजा त्वं नः ॥३१८॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रम् । नरः । नेमधिता । नेम । धिता । हवन्ते । यत् । पार्याः । युनजते । धियः । ताः । शूरः । नृषाता । नृ । साता । श्रवसः । च । कामे । आ । गोमति । व्रजे । भज । त्वम् । नः ॥३१८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 318
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - परमेश्वर आणि नृपतीला प्रार्थना -
शब्दार्थ -
(इन्द्रम्) वीर परमेश्वराला वा राजाला (नरः) उपासक /प्रजानन (नेमधिता) आंतरिक /बाह्य संग्रामामध्ये आणि यज्ञामध्ये (हवन्ते) साह्यासाठी हाक मारतात. (पार्याः) पार होण्यासाठी (युद्धात विजय प्राप्तीसाठी) ते लोक आंतरिक व बाह्य बाधा पार करण्यासाठी (यत्) ज्या साधनांचा (युनजते) उपयोग करतात, (ताः) ती साधने आहेत (धियः) बुद्धी आणि कर्म म्हणजे बुद्धी आणि कर्माचे अवलंब करून ते लोक सर्व शत्रूंना आणि विघ्नांना परास्त करतात. हे परमेश्वर /राजा, (शूरः) शूरवीर से आपण (नृषाताः) संग्रामामध्ये (यशसःच) यशाच्या आणि (कामे) अभिलाषांच्या पूर्ततेसाठी तसेच (गोमति व्रजे) प्रशस्त भूमी, वाणी, इंद्रिये, दुधदुभत्या गायी आदींविषयी (नः) आम्हाला (आभज्) समृद्ध करा. अर्थात आम्ही विसफल होण्यासाठी तुम्ही आमच्या सर्व कामना पूर्ण करा तसेच पृथ्वीचे राज्य, वाणीचे बळ, इंद्रियांची शक्ती आणि उत्तम जातीच्या गायी आम्हाला द्या. ।। ६।।
भावार्थ - परमेश्वराची कृपा आणि राजाकडून होणारे साह्य याद्वारे आपापल्या बुद्धि कौशल्य व पुरुषार्थाने सर्व जण विजय प्राप्त करू शकतात. कीर्ती व भूमंडल- साम्राज्य तसेच इतरही इच्छित वस्तू प्राप्त करू शकतात. ।। ६।।
विशेष -
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. ।। ६।।