Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 327
ऋषिः - वामदेवो गोतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
मे꣣डिं꣡ न त्वा꣢꣯ व꣣ज्रि꣡णं꣢ भृष्टि꣣म꣡न्तं꣢ पुरुध꣣स्मा꣡नं꣢ वृष꣣भ꣢ꣳ स्थि꣣र꣡प्स्नु꣢म् । क꣣रो꣢꣯ष्यर्य꣣स्त꣡रु꣢षीर्दुव꣣स्यु꣡रिन्द्र꣢꣯ द्यु꣣क्षं꣡ वृ꣢त्र꣣ह꣡णं꣢ गृणीषे ॥३२७
स्वर सहित पद पाठमे꣣डि꣢म् । न । त्वा꣣ । वज्रि꣡ण꣢म् । भृ꣣ष्टिम꣡न्त꣢म् । पु꣣रुधस्मा꣡न꣢म् । पु꣣रु । धस्मा꣡न꣢म् । वृ꣣षभ꣢म् । स्थि꣣र꣡प्स्नु꣢म् । स्थि꣣र꣢ । प्स्नु꣣म् । करो꣡षि꣢ । अ꣡र्यः꣢꣯ । त꣡रु꣢꣯षीः । दु꣣वस्युः꣢ । इ꣡न्द्र꣢꣯ । द्यु꣣क्ष꣢म् । द्यु꣣ । क्ष꣢म् । वृ꣣त्रह꣡ण꣢म् । वृ꣣त्र । ह꣡न꣢꣯म् । गृ꣣णीषे ॥३२७॥
स्वर रहित मन्त्र
मेडिं न त्वा वज्रिणं भृष्टिमन्तं पुरुधस्मानं वृषभꣳ स्थिरप्स्नुम् । करोष्यर्यस्तरुषीर्दुवस्युरिन्द्र द्युक्षं वृत्रहणं गृणीषे ॥३२७
स्वर रहित पद पाठ
मेडिम् । न । त्वा । वज्रिणम् । भृष्टिमन्तम् । पुरुधस्मानम् । पुरु । धस्मानम् । वृषभम् । स्थिरप्स्नुम् । स्थिर । प्स्नुम् । करोषि । अर्यः । तरुषीः । दुवस्युः । इन्द्र । द्युक्षम् । द्यु । क्षम् । वृत्रहणम् । वृत्र । हनम् । गृणीषे ॥३२७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 327
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - मी परमेश्वराची स्तुती कोणाप्रमाणे करावी ?
शब्दार्थ -
हे (इंद्र) परम ऐश्वर्यवान परमेशवर, (दुवस्युः) तुमची पूजा करण्याची इच्छा करणारा मी तुमची पूजा वा उपासना कशा प्रकारे करू. (वज्रिणम्) दुष्टांना दंडित करणारे व (भृष्टिमन्हम्) दीप्तिमान व शत्रूंना प्रतिहत करणाऱ्या तेजाने युक्त आहात. तुम्ही (पुरुधस्मानम्) अनेकांचे धारण पोषण करणारे असून (वृषभम्) सुखाची वृष्टी करणारे आहात. (स्थिरप्स्नुम्) स्थिर रूप म्हणजे निव्य गुण, कर्म स्वभावाने तुम्ही संपन्न असून (घुक्षम्) उपासकाला कर्तव्य अकर्तव्यात विवेक सांगणारे आहात. (वृत्रहणम्) तुम्ही पाप-विनाशक असून मी (त्वा) तुमची पूजा अशा रीतीने करतो की जसे (मेडिन) भूमीला जलाने सिंचित करणारा वा विद्युत गर्जना करणारा मेघ असतो म्हणजे जसा पावसाची वाट पाहणारा कोणी माणूस मेघाची वारंवार स्तुती करतो, तद्वत मी तुमची अंतःकरणापासून (गृणीषे) प्रशंसा करतो. हे परमेश्वर, तुम्ही (अरीः) प्रजेला (सर्व माणसांना) (तरुषीः) संकटापासून तारण्यात वा शत्रु-विनाशात समर्थ असे (करोषि) करता (सर्वांना धैर्य व पराक्रमासाठी प्रेरणा देतो.)।। ५।।
भावार्थ - जसे वृष्टि- याचक कृपक गण वर्षक मेघाची वारंवार प्रशंसा करतात. तद्वत सर्वांनी श्रेष्ठ गुण- कर्म- स्वभाव असणाऱ्या आणि सुख- समृद्धीची वर्षा करणाऱ्या परमेश्वराची उपासना व प्रशंसा अव्य केली पाहिजे.।। ५।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ङ्गकरोष्यर्यस्तरुषीःफ या कारणात्मक वाक्याद्वारे स्तुतिरूप कार्याचे समर्थन केले आहे, म्हणून इथे अर्थान्तरन्यास अलंकारदेखील आहे.।। ५।।