Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 333
ऋषिः - भरद्वाजः
देवता - इन्द्रः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
त्रा꣣ता꣢र꣣मि꣡न्द्र꣢मवि꣣ता꣢र꣣मि꣢न्द्र꣣ꣳ ह꣡वे꣢हवे सु꣣ह꣢व꣣ꣳ शू꣢र꣣मि꣡न्द्र꣢म् । हु꣣वे꣢꣫ नु श꣣क्रं꣡ पु꣢रुहू꣣त꣡मिन्द्र꣢꣯मि꣣द꣢ꣳ ह꣣वि꣢र्म꣣घ꣡वा꣢ वे꣣त्वि꣡न्द्रः꣢ ॥३३३॥
स्वर सहित पद पाठत्रा꣣ता꣡र꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣विता꣡र꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । ह꣡वे꣢꣯हवे । ह꣡वे꣢꣯ । ह꣣वे । सुह꣡व꣢म् । सु꣣ । हव꣢꣯म् । शू꣡र꣢꣯म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । हु꣣वे꣢ । नु । श꣣क्र꣢म् । पु꣣रुहूत꣢म् । पु꣣रु । हूत꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । इ꣣द꣢म् । ह꣣विः꣢ । म꣣घ꣡वा꣢ । वे꣣तु । इ꣡न्द्रः꣢꣯ ॥३३३॥
स्वर रहित मन्त्र
त्रातारमिन्द्रमवितारमिन्द्रꣳ हवेहवे सुहवꣳ शूरमिन्द्रम् । हुवे नु शक्रं पुरुहूतमिन्द्रमिदꣳ हविर्मघवा वेत्विन्द्रः ॥३३३॥
स्वर रहित पद पाठ
त्रातारम् । इन्द्रम् । अवितारम् । इन्द्रम् । हवेहवे । हवे । हवे । सुहवम् । सु । हवम् । शूरम् । इन्द्रम् । हुवे । नु । शक्रम् । पुरुहूतम् । पुरु । हूतम् । इन्द्रम् । इदम् । हविः । मघवा । वेतु । इन्द्रः ॥३३३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 333
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 11;
Acknowledgment
विषय - इंद्र परमेश्वराचे आणि नृपतीचे आवाहन कसे उचित आहे, याविषयी -
शब्दार्थ -
(त्रातारम्) विपत्तींपासून माझे रक्षण करणाऱ्या (इन्द्रम्) शत्रुनाशक जगदीश्वराला अथवा राजाला (मी हाक मारतो) त्या (अवितारत्) सुखप्रदायक व पालक अशा (इन्द्रम्) जगदीश्वराला वा राजाला (हवे हवे) प्रत्येक संग्रामात वा संकटात (सुहवम्) जो सहज हाक देऊन बोलवण्यासारखा आहे, अशा (शक्रम्) शक्तिमान (पुरुहूतम्) अत्यंत स्तवनीय अथवा अनेक लोक ज्याला हाक मारतात, त्या (इंद्र) अविद्या, दुःख आदींचा विनाशक परमेश्वराला / राजाला मी (उपासक / प्रजाजन) (तु) त्वरित (हुवे) रक्षणासाठी हाक मारतो. (सः) तो (मघवा) प्रशस्त धनवान (इन्द्रः) जगदीश्वर वा राजा (इदम् माझ्यातर्फे दिल्या जाणाऱ्या (हविः) आत्मसमर्पण रूप हवी अथवा मी देत असलेले राजकर (वेतु) स्वीकार करतो. (आणि मला सुख, निर्भयपणा देवो.) ।। २।।
भावार्थ - सर्वांचे कर्तव्य आहे की विपत्तीपासून रक्षण करणाऱ्या, पालनकर्ता ज्याला सुखाने व सहज आवाहन करता येते, अशा सर्व वंदित परमेश्वराचा आणि राजाचा स्वीकार करावा वा त्याचा आधार घ्यावा आणि याद्वारे आत्मकल्याण तसेच जनकल्याणही करावे. याशिवाय परमेश्वरासमोर समर्पण करावे आणि राजाला कर देत जावे. ।। २।।
विशेष -
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे. प्रयुक्त विशेषणे साभिप्राय (म्हणजे जाणीवपूर्वक वापरली) असल्यामुळे येथे परिकर अलंकार आहे. एकाच शब्दाची (इन्द्र शब्दाची) चार वेळा केलेली पुनरुक्ती त्या शब्दाची बहुश्रमत्व आणि अन्य शब्दापेक्षा विलक्षणत्व घोतित करते. तसेच ‘तारामिन्द्र’ शब्दाची दोन वेळा ङ्गरमिन्द्रफची तीन वेळा व ‘मिन्द्र’ची चार वेळा आवृत्ती असल्यामुळे यमक अलंकारही आहे. याचप्रमाणे ‘हवे, हवे, हवं हवं हुवे, हवि’ याध्ये वृत्त्युनुप्रास आहे. ‘त्रातारम्’ ‘अवितारम्’ तसेच ‘इन्द्रम्’ शक्रम्, पुरुहूतम्’मुळे पुनरुक्त वादाभांस अलंकार आहे. ।। २।।