Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 36
ऋषिः - भर्गः प्रागाथः
देवता - अग्निः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
पा꣣हि꣡ नो꣢ अग्न꣣ ए꣡क꣢या पा꣣ह्यू꣡३꣱त꣢ द्वि꣣ती꣡य꣢या । पा꣣हि꣢ गी꣣र्भि꣢स्ति꣣सृ꣡भि꣢रूर्जां पते पा꣣हि꣡ च꣢त꣣सृ꣡भि꣢र्वसो ॥३६॥
स्वर सहित पद पाठपा꣣हि꣢ । नः꣣ । अग्ने । ए꣡क꣢꣯या । पा꣣हि꣢ । उ꣣त꣢ । द्वि꣣ती꣡य꣢या । पा꣣हि꣢ । गी꣣र्भिः꣢ । ति꣣सृ꣡भिः꣢ । ऊ꣣र्जाम् । पते । पाहि꣢ । च꣣तसृ꣡भिः꣢ । व꣣सो ॥३६॥
स्वर रहित मन्त्र
पाहि नो अग्न एकया पाह्यू३त द्वितीयया । पाहि गीर्भिस्तिसृभिरूर्जां पते पाहि चतसृभिर्वसो ॥३६॥
स्वर रहित पद पाठ
पाहि । नः । अग्ने । एकया । पाहि । उत । द्वितीयया । पाहि । गीर्भिः । तिसृभिः । ऊर्जाम् । पते । पाहि । चतसृभिः । वसो ॥३६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 36
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात परमेश्वराला व विद्वानाला प्रार्थना केली आहे. -
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपूरक) - हे (ऊर्जा पते) अन्न, रस, बळ आणि प्राण यांचे अधिपती (वसो) सर्वत्र वास्तव्य असणारे सर्वान्तर्यामी आणि निवासप्रदायक (अग्ने) परमात्मन्, आपण (न:) आमची (एकया) एकऋक् रूप वाणीद्वारे (रक्ष) रक्षा करा (उत्) आणि (द्वितीयया) दुसऱ्या म्हणजे यजु:रूप वाणीद्वारे (पाहि) रक्षण करा (तिसृभि:) तीन म्हणजे ऋग्, यजु: आणि साम या सन्मिलित (गीर्भि:) वाणीद्वारे (पण्हि) रक्षा करा. (चतसृभि:) चार म्हणजे ऋग्, यजु:, साम आणि अथर्व या चार वाणीद्वारे (पाहि) आमचे रक्षण करा. या मंत्रात चार वेळा पाहि शब्दाच्या प्रयोगाने परमेश्वराद्वारे मिळणाऱ्या रक्षणाची आवश्यकता व नैरन्तर्य व्यक्त होत आहे. ।।
द्वितीय अर्थ : (विद्वत्परक) (उर्जा पते) सामर्थ्या आमचे पालन करणारे (वसो) (विद्यार्थ्यांना) उत्तम निवासस्थान देणारे (अग्ने) अग्निवत् विद्याप्रकाशाने समृद्ध हे विद्वान, आपण (एकया) एका उत्तम शिक्षण वा विद्येने (न;) आमचे (पाहि) रक्षण करा. (ठत) आणि (द्वितीयया) दुसऱ्या विद्येने म्हणजे अध्यापन क्रियेने (पाहि) रक्षण करा (विसृभि:) कर्मकांड, उपासनाकांड व ज्ञानकांड या तीन विषयांचे ज्ञान देणाऱ्या (गीर्भि:) वाणी वा उपदेशाद्वारे आमचे (पाहि) खूण करा. (चतसृभि:) चार पुरुषार्थ म्हणजे धर्म, अर्थ, काम व मोक्ष यांचे ज्ञान देणाऱ्या चार प्रकारच्या वाणीद्वारे आमचे (पाहि) रक्षण करा. ।।२।।
भावार्थ - परमेश्वराने चार वेद आमच्या हिताकरीता प्रदान केले आहेत. जर आम्ही वेदवर्णित ज्ञान, कर्म, उपासना व विज्ञान या विषयांचे ज्ञान संपादित करून आपल्या कर्तव्य कर्मांचे आचरण करू. तर अवश्यमेव आमचे रक्षण होईल. विद्वानांचे कर्तव्य आहे की, आम्हास वेदांचे अध्यापन करून वेदविहित धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांचा उपदेश देऊन आमची रक्षा करावी. ।।२।।
इस भाष्य को एडिट करें