Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 366
ऋषिः - अत्रिर्भौमः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

वि꣣भो꣡ष्ट꣢ इन्द्र꣣ रा꣡ध꣢सो वि꣣भ्वी꣢ रा꣣तिः꣡ श꣢तक्रतो । अ꣡था꣢ नो विश्वचर्षणे द्यु꣣म्न꣡ꣳ सु꣢दत्र मꣳहय ॥३६६॥

स्वर सहित पद पाठ

वि꣣भोः꣢ । वि꣣ । भोः꣢ । ते꣣ । इन्द्र । रा꣡ध꣢꣯सः । वि꣣भ्वी꣢ । वि । भ्वी꣢ । रा꣣तिः꣢ । श꣣तक्रतो । शत । क्रतो । अ꣡थ꣢꣯ । नः꣣ । विश्वचर्षणे । विश्व । चर्षणे । द्युम्न꣢म् । सु꣣दत्र । सु । दत्र । मँहय ॥३६६॥


स्वर रहित मन्त्र

विभोष्ट इन्द्र राधसो विभ्वी रातिः शतक्रतो । अथा नो विश्वचर्षणे द्युम्नꣳ सुदत्र मꣳहय ॥३६६॥


स्वर रहित पद पाठ

विभोः । वि । भोः । ते । इन्द्र । राधसः । विभ्वी । वि । भ्वी । रातिः । शतक्रतो । शत । क्रतो । अथ । नः । विश्वचर्षणे । विश्व । चर्षणे । द्युम्नम् । सुदत्र । सु । दत्र । मँहय ॥३६६॥

सामवेद - मन्त्र संख्या : 366
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(शतक्रतो) अत्यंत ज्ञानवान आणि अनेकानेक कर्म करणारे हे (इंद्र (विश्वंभर परमेश्वर, (विभो- ते) तुम्ही व्यापक असून तुम्ही विस्तारलेली (राधसः) सम, दम, न्याय, सत्य, अहिंसा आदी आध्यात्मिक संपदा आणि चांदी, सोने, हीरक, मोती, मणि, माणिक्य, विद्या, आरोग्य, कीर्ती, चक्रवर्ती राज्य या रूपात दिली. (रातिः) भौतिक संपदा (विभ्वी) अत्यंत व्यापक आहे. (अथ) यामुळे हे (विश्वचर्षणे) विश्वद्रष्टा, हे (सुदत्र) शुभदाता परमेश्वर, तुम्ही (नः) आम्हा (उपासकांना) (द्युम्नम्) आत्मिक तेज, भौतिक धन आणि त्यापासून मिळणारी कीर्ती (मंहय) आम्हाला प्रदान करा.।। या मंत्राचा राजापर व आचार्यपर अर्थदेखील केला पाहिजे. पुष्कळ धनवान राजाचे दानवृत्ती व्यापक वा मोठी असते आणि अत्यंत विद्यावान आचार्यांचे विद्यादानही व्यापक असते. राजा आपल्या गुप्तचर रूप डोळ्यांमुळे सकलद्रष्टा सतो, तर आचार्य त्याच्या ज्ञानदृष्टीमुळे सकलद्रव्य असतो.।। ७।।

भावार्थ - जगदीश्वर, राजा आणि आचार्य, हे सर्व धन, विद्या, तेज, यश आदींची वृष्टी करतात. या सर्वांनी आम्हा (उपास, प्रजाजन व विद्यार्थ्यांकरिता) या पदार्थांची वृष्टी करावी (अशी आम्ही कामना वा याचना करतो.)।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top