Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 411
ऋषिः - गोतमो राहूगणः
देवता - इन्द्रः
छन्दः - पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
इ꣢न्द्रो꣣ म꣡दा꣢य वावृधे꣣ श꣡व꣢से वृत्र꣣हा꣡ नृभिः꣢꣯ । त꣢꣯मिन्म꣣ह꣢त्स्वा꣣जि꣢षू꣣ति꣡मर्भे꣢꣯ हवामहे꣣ स꣡ वाजे꣢꣯षु꣣ प्र꣡ नो꣢ऽविषत् ॥४११॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रः꣢꣯ । म꣡दा꣢꣯य । वा꣣वृधे । श꣡व꣢꣯से । वृ꣣त्रहा꣢ । वृ꣣त्र । हा꣢ । नृ꣡भिः꣢꣯ । तम् । इत् । म꣣ह꣡त्सु꣢ । आ꣣जि꣡षु꣢ । ऊ꣣ति꣢म् । अ꣡र्भे꣢꣯ । ह꣣वामहे । सः꣢ । वा꣡जे꣢꣯षु । प्र । नः꣣ । अविषत् ॥४११॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्रो मदाय वावृधे शवसे वृत्रहा नृभिः । तमिन्महत्स्वाजिषूतिमर्भे हवामहे स वाजेषु प्र नोऽविषत् ॥४११॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्रः । मदाय । वावृधे । शवसे । वृत्रहा । वृत्र । हा । नृभिः । तम् । इत् । महत्सु । आजिषु । ऊतिम् । अर्भे । हवामहे । सः । वाजेषु । प्र । नः । अविषत् ॥४११॥
सामवेद - मन्त्र संख्या : 411
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - इन्द्र नावाने परमात्मा, जीवात्मा, राज्य अथवा सेनापतीला युद्धात विजय देण्यासाठी / मिळण्यासाठी आवाहन -
शब्दार्थ -
(वृत्रहा) शत्रुहन्ता (इन्द्रः) वीर परमात्मा, जीवात्मा, राजा वा सेनापती (मदाय) हर्ष मिळण्यासाठी वा देण्यासाठी आणि (शवसे) शक्तिमान कार्ये करण्यासाठी (नृभिः) लोकांद्वारे (वावृधे) प्रोत्साहित केला जातो. (लोक त्याला समर्थन व पाठिंबा देतात - हे ईश्वर व आत्म्याविषयी नव्हे, तर त्या फक्त राजा, सेनापती यांनाच लागू मानावा.) कारण ईश्वराला कोणाच्या समर्थनाची आवश्यकता नाही.) (तम् इत्) (अतिम्) त्या रक्षकांना (वरील चौघांना) (महत्यु आजिषु) मोठ्या युद्धात आणि (अर्भे) छोट्या युद्धात आम्ही (प्रजाजन) (हवामहे) मदतीसाठी हाक मारतो. (सः) तो (ते सर्व) (वाजेषु) युद्धामध्ये (वः) आमची (प्र अविषत्) चांगल्या रीतीने रक्षा करो.।। ३।।
भावार्थ - आनंद, आत्मशक्ती व शारीरिक बल प्राप्त करण्यासाठी परमेश्वराला स्तुतीद्वारे, जीवात्म्याला उत्कृष्ट उद्बोधनाद्वारे आणि राजा व सेनापतीला जय जयकाराद्वारे उत्साहित व प्रहर्षित केले पाहिजे. सामान्य प्रसंगात वा विकट आंतरिक बाह्यॉ युुद्धात तेच आमचे सहाय्यक होतात.।। ३।।
विशेष -
या मंत्रात अर्थश्लेष अलंकार आहे.।। ३।।