Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 414
ऋषिः - गोतमो राहूगणः
देवता - इन्द्रः
छन्दः - पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
य꣢दु꣣दी꣡र꣢त आ꣣ज꣡यो꣢ धृ꣣ष्ण꣡वे꣢ धीयते꣣ ध꣡न꣢म् । यु꣣ङ्क्ष्वा꣡ म꣢द꣣च्यु꣢ता꣣ ह꣢री꣣ क꣢꣫ꣳ हनः꣣ कं꣡ वसौ꣢꣯ दधो꣣ऽस्मा꣡ꣳ इ꣢न्द्र꣣ व꣡सौ꣢ दधः ॥४१४॥
स्वर सहित पद पाठय꣢त् । उ꣣दी꣡र꣢ते । उत् । ई꣡र꣢꣯ते । आ꣣ज꣡यः꣢ । धृ꣣ष्ण꣡वे꣢ । धी꣣यते । ध꣡न꣢꣯म् । युङ्क्ष्व꣢ । म꣣दच्यु꣡ता꣢ । म꣣द । च्यु꣡ता꣢꣯ । हरी꣣इ꣡ति꣢ । कम् । ह꣡नः꣢꣯ । कं । व꣡सौ꣢꣯ । द꣣धः । अस्मा꣢न् । इ꣣न्द्र । व꣡सौ꣢꣯ । द꣣धः ॥४१४॥
स्वर रहित मन्त्र
यदुदीरत आजयो धृष्णवे धीयते धनम् । युङ्क्ष्वा मदच्युता हरी कꣳ हनः कं वसौ दधोऽस्माꣳ इन्द्र वसौ दधः ॥४१४॥
स्वर रहित पद पाठ
यत् । उदीरते । उत् । ईरते । आजयः । धृष्णवे । धीयते । धनम् । युङ्क्ष्व । मदच्युता । मद । च्युता । हरीइति । कम् । हनः । कं । वसौ । दधः । अस्मान् । इन्द्र । वसौ । दधः ॥४१४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 414
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - मागील मंत्राचाच विषय याही मंत्रात आहे -
शब्दार्थ -
(यत्) जेव्हा (आजयः) देवासुर- संग्राम (उदीर ते) होण्याची वेळ येते, तेव्हा (धृष्णवे) जो कोणी शत्रूचा पराभव करू शकतो, त्यालाच (धनम्) धनसंपत्ती (धीयते) मिळते. यामुळे हे (इन्द्र) माझ्या अंतरात्मा, सेनापती अथवा हे राजा, तुम्ही (मदच्युता) शत्रूंचा मद चूर्णित करणाऱ्या (हरी) ज्ञानेंद्रिये - कर्मेंद्रिये रूप घोड्यांना / युद्धरथ चालविण्याचे साधन जल, अग्नी, रूप वा वायु- विद्युत रूप घोड्यांना (युहक्ष्व) कार्यात प्रवृत्त करा. (कम्) अनेक शत्रूपैकी प्रत्येकाला (हवः) नष्ट करा / (कम्) कोणाला म्हणजे मित्राला (वसौ) ऐश्वर्यात (दधः) स्थापित करा. (मित्राची / मित्र राष्ट्राची आर्थिक मदत करा.) (अस्मान्) दिव्य कार्यात मग्न असलेल्या आम्हा धार्मिकजनांना (वसौ) ऐश्वर्यात स्थापित करा. (पुष्कळ धनसंपत्ती द्या.) ।। ६।।
भावार्थ - आंतरिक देवासुर- संग्राम, (बरे वाईट विचारांचा संघर्ष) असो वा बाह्य देवासुर- संग्राम (शत्रूचे आक्रमण) असो, अशा प्रसंगी सर्वांशी असुरांना पराजित करून देवांना (सज्जनांना, विद्वानांना, सद्विचारंना) प्रोत्साहित केले पाहिजे आणि युद्धात विजय प्राप्त करून भौतिक संपदा अर्जित करावी.।। ६।। या मंत्राचे भाष्य करताना सायणाचार्याने अशा प्रकारे त्तिहास दाखविला आहे. ङ्गङ्घरहूगणाचा पुत्र गोतम कुरू- सृज्जन राजाचा पुरोहित होता. कुरुराजाचे शत्रूंशी युद्धा सुरू झाल्यावर त्या ऋषीने या मंत्राद्वारे इन्द्राची स्तुती करून त्याला स्व पक्षाच्या विजयाची प्रार्थना केली होती.फफ रहू गण पुत्र गोतम या मंत्राचा द्रष्टा ऋषी आहे. हा इतिहास त्याच्यासंबंधी आहे, असे सायणाने सांगितले आहे.
इस भाष्य को एडिट करें