Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 415
ऋषिः - गोतमो राहूगणः देवता - इन्द्रः छन्दः - पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

अ꣢क्ष꣣न्न꣡मी꣢मदन्त꣣ ह्य꣡व꣢ प्रि꣣या꣡ अ꣢धूषत । अ꣡स्तो꣢षत꣣ स्व꣡भा꣢नवो꣣ वि꣢प्रा꣣ न꣡वि꣢ष्ठया म꣣ती꣢꣫ योजा꣣꣬ न्वि꣢꣯न्द्र ते꣣ ह꣡री꣢ ॥४१५॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡क्ष꣢꣯न् । अ꣡मी꣢꣯मदन्त । हि । अ꣡व꣢꣯ । प्रि꣣याः꣢ । अ꣣धूषत । अ꣡स्तो꣢꣯षत । स्व꣡भा꣢꣯नवः । स्व । भा꣣नवः । वि꣡प्राः꣢꣯ । वि । प्राः꣣ । न꣡वि꣢꣯ष्ठया । म꣣ती꣢ । यो꣡ज꣢꣯ । नु । इ꣣न्द्र । ते । ह꣢री꣣इ꣡ति꣢ ॥४१५॥


स्वर रहित मन्त्र

अक्षन्नमीमदन्त ह्यव प्रिया अधूषत । अस्तोषत स्वभानवो विप्रा नविष्ठया मती योजा न्विन्द्र ते हरी ॥४१५॥


स्वर रहित पद पाठ

अक्षन् । अमीमदन्त । हि । अव । प्रियाः । अधूषत । अस्तोषत । स्वभानवः । स्व । भानवः । विप्राः । वि । प्राः । नविष्ठया । मती । योज । नु । इन्द्र । ते । हरीइति ॥४१५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 415
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 3; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 7;
Acknowledgment

शब्दार्थ -
गृहस्थ पुरुष म्हणत आहे. (विप्राः) या विद्वान अतिथींनी (अक्षन्) जेवण केले आहे. (अभीमदन्त हि) हे सर्व अवश्य मेव तृप्त झाले आहेत. (प्रियाः) या प्रिय अतिथींनी (अव अधूषत) मला, आतिथ्य करणाऱ्या गृहस्थाच्या दोषांना प्रकम्पित केले आहे. (माझे दोष काढून टाकून मला निर्मळ चारित्र्यवान केले आहे.) (स्वभानवः) आपल्या तेजाने तळपणाऱ्या यांनी (न विष्ठ्या मती) नवीन विचारांद्वारे (अस्तोपत) मला स्वस्ति - कुशलचा आशीर्वाद दिला आहे. ाता (इन्द्र) हे माझ्या आत्मा, तू (तु) त्वरित (ते हरी) आपल्या ज्ञानेंद्रिय - कर्मेंन्द्रिय रूप घोडे (योज) वाहनात जुंपून घे म्हणजे विद्वान अतिथींच्या उपदेशावर मनन, चिंतन व आचरण करण्याचा यत्न कर.।। ७।।

भावार्थ - गृहस्थांद्वारे जेव्हा विद्वान अतिथींचा सत्कार केला जातो, तेव्हा विद्वान अतिथींनी त्यांना बहुमोल उपदेश देऊन कृतार्थ केले पाहिजे आणि गृहस्थजनांनी त्या उपदेशाप्रमाणे वागले पाहिजे।। ७।। या मंत्राच्या (यजुर्वेदातील मंत्रावर) भाष्य करताना उलट व महीधर यांनी कात्यायन श्रौत सूत्राप्रमाणे लिहिताना असे म्हटले आहे की पितृयज्ञ कर्मात जे पितर आले आहेत, त्यांनी आम्ही दिलेले अन्नाचे सेवन केले आहे व ते तृप्त झाले आहेत. याविषयी हे समजून घेतले पाहिजे की मृत पितरांचे येणे व भोजन ग्रहण करणे, हे सर्व वेद संमत नाही. म्हणून असा अर्थ चुकीचा मानावा.।।

इस भाष्य को एडिट करें
Top