Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 429
ऋषिः - ऋण0त्रसदस्यू
देवता - पवमानः सोमः
छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
प꣡व꣢स्व सोम म꣣हा꣡न्त्स꣢मु꣣द्रः꣢ पि꣣ता꣢ दे꣣वा꣢नां꣣ वि꣢श्वा꣣भि꣡ धाम꣢꣯ ॥४२९॥
स्वर सहित पद पाठप꣡व꣢꣯स्व । सो꣣म । महा꣢न् । स꣣मुद्रः꣢ । स꣣म् । उद्रः꣢ । पि꣣ता꣢ । दे꣣वा꣡ना꣢म् । वि꣡श्वा꣢꣯ । अ꣣भि꣢ । धा꣡म꣢꣯ ॥४२९॥
स्वर रहित मन्त्र
पवस्व सोम महान्त्समुद्रः पिता देवानां विश्वाभि धाम ॥४२९॥
स्वर रहित पद पाठ
पवस्व । सोम । महान् । समुद्रः । सम् । उद्रः । पिता । देवानाम् । विश्वा । अभि । धाम ॥४२९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 429
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - सोम नावाने परमश्वराची वा राजाची प्रार्थना.
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) हे (सोम) सर्व जगाचे उत्पत्तिकर्ता परमेश्वर, तुम्ही (महान्) महान आहात. (समुद्रः) रसाचे आनंदाचे सागर आहात (देवानाम्) प्रकाशक विद्वानांचे, सूर्य, चंद्र, विद्युत, अग्नी आदींचे आणि ज्ञानेंद्रिये, मन, बुद्धी आदींचे (पिता) पालनकर्ता आहात. तुम्ही (विश्वा धात्र) सर्व स्थानांत आणि हृदयरूप गृहात (अभि पवस्व) व्याप्त असून त्यांना पवित्र करीत आहात.।।
द्वितीय अर्थ - (राजापर अर्थ) - हे (सोम) चंद्राप्रमाणे आल्हादक आणि प्रजारंजक राजा, आपण (महान्) गुण व कर्म या दृष्टीने महान आहात. आपण (समुद्रः) प्रेमरस, शौर्य आणि संपदांचे आगर आहात. (देवानाम्) दानादी गुणांनी समृद्ध अशा प्रजाजनांचे (पिता) पालक आहात. आपण (विश्वा धाम) राष्ट्राचे शिक्षण, न्याय, कृषी, व्यापार, उद्योग, सैन्य आदी सर्व विभागांत (अभि) जाऊन (पवस्व) त्या विभागांना पवित्र वा शुद्ध करता.।। ३।।
भावार्थ - जसे परमात्मा सर्वांचे हृदय पवित्र वा दोषरहित करतो, तसे राजानेही राष्ट्राच्या सर्व विभागांचा पवित्र म्हणजे भ्रष्टाचाररहित करावे.।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. तसेच सोम शब्दावर पमरेश्वराचा आणि राजाचा आरोप केल्यामुळे येथे रूपक अलंकारही आहे.।। ३।।