Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 430
ऋषिः - ऋण0त्रसदस्यू
देवता - पवमानः सोमः
छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
प꣡व꣢स्व सोम म꣣हे꣢꣫ दक्षा꣣या꣢श्वो꣣ न꣢ नि꣣क्तो꣢ वा꣣जी꣡ धना꣢य ॥४३०॥
स्वर सहित पद पाठप꣡व꣢꣯स्व । सो꣣म । महे꣢ । द꣡क्षा꣢꣯य । अ꣡श्वः꣢꣯ । न । नि꣣क्तः꣢ । वा꣣जी꣢ । ध꣡ना꣢꣯य ॥४३०॥
स्वर रहित मन्त्र
पवस्व सोम महे दक्षायाश्वो न निक्तो वाजी धनाय ॥४३०॥
स्वर रहित पद पाठ
पवस्व । सोम । महे । दक्षाय । अश्वः । न । निक्तः । वाजी । धनाय ॥४३०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 430
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - परमेश्वराला आणि राजाला प्रार्थना
शब्दार्थ -
हे रसगार (आनंद- समुद्र) परमेश्वर व राजा, आपण (अस्वः न) अग्नी, मेघ वा सूर्य याप्रमाणे असून (निक्तः) शुद्ध, शुद्ध गुण - कर्म- स्वभाव असणारे आणि (वाजी) बलवान आहात. आपण आम्हालाही (महे) अध्याधिक (दक्षाय) शक्ती देऊन व (धनाय) धन देऊन आम्हाला (पवस्व) पवित्र करा.।। ४।।
भावार्थ - परमेश्वराप्रमाणे राजानेदेखील स्वतः सदाचारी असावे आणि सर्व प्रजेचे आचरण शुद्ध पवित्र करावे / ठेवावे. जे बळ वा धन मनुष्याने स्वतः पवित्र राहून पवित्र साधनांनी अर्जित केले असले, त्याद्वारेच सर्वांचा उपकार घडणे शक्य आहे.।। ४।।
विशेष -
या मंत्रात उपमा आणि श्लेष अलंकार आहे.।। ४।।