Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 443
ऋषिः - संवर्त आङ्गिरसः
देवता - उषाः
छन्दः - द्विपदा विराट् पङ्क्तिः
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
आ꣡ या꣢हि꣣ व꣡न꣢सा स꣣ह꣡ गाव꣢꣯ सचन्त वर्त꣣निं꣡ यदूध꣢꣯भिः ॥४४३॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । या꣣हि । व꣡न꣢꣯सा । स꣣ह꣢ । गा꣡वः꣢꣯ । स꣣चन्त । वर्त्तनि꣢म् । यत् । ऊ꣡ध꣢꣯भिः ॥४४३॥
स्वर रहित मन्त्र
आ याहि वनसा सह गाव सचन्त वर्तनिं यदूधभिः ॥४४३॥
स्वर रहित पद पाठ
आ । याहि । वनसा । सह । गावः । सचन्त । वर्त्तनिम् । यत् । ऊधभिः ॥४४३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 443
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 10;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 10;
Acknowledgment
विषय - उषा देवता। उषा नावाने जगन्मातेचे आवाहन
शब्दार्थ -
उषेप्रमाणे तेजोमयी हे जगन्माते (परमेश्वरा), तू (वनसा सह) आपल्या अधिकतम तेजासह (आ याहि) ये, माझ्या हृदयात प्रादुर्भूत हो. (यत्) जेव्हा (गावः) वेदरूपिणी गायी (ऊघभिः) ज्ञानरसाने परिपूर्ण मंत्र रूप ऊधसांद्वारे (गाईचे स्तन) (वर्तनिम्) माझ्या आत्मरूप दोहमगृहात (सचन्त) याव्यात. (सकाळी गायी चरण्यासाठी वनात जातात. सकाळी- सायंकाळी दूध देतात. तद्वत उपासकाच्या हृदयी सकाळी - संध्याकाळी ईश्वराचे ध्यान यावे, अशी कल्पना आहे.)।। ७।।
भावार्थ - जसे उषेच्या आगमना होताना घागरीप्रमाणे मोठे स्तन असलेल्या गायी दूध देण्यासाठी दोहनगृहात येतात, तसे हृदयात जगन्मातेचा प्रादुर्भाव झाल्यानंत ज्ञानरसाने पूर्ण वेदरूपिणी गायी आपले ज्ञानरूप दूध देण्यासाठी स्तोताजनांच्या आत्म्यात जागृत होतात.।। ७।।
विशेष -
या मंत्रात उपमानापेक्षा उपमेय अधिक प्रभावी आहे. त्यामुळे येथे अतिशयोक्ती अलंकार आहे.।। ७।।