Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 462
ऋषिः - एवयामरुदात्रेयः देवता - मरुतः छन्दः - अतिजगती स्वरः - निषादः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

प्र꣡ वो꣢ म꣣हे꣢ म꣣त꣡यो꣢ यन्तु꣣ वि꣡ष्ण꣢वे म꣣रु꣡त्व꣢ते गिरि꣣जा꣡ ए꣢व꣣या꣡म꣢रुत् । प्र꣡ शर्धा꣢꣯य꣣ प्र꣡ यज्य꣢꣯वे सुखा꣣द꣡ये꣢ त꣣व꣡से भ꣣न्द꣡दि꣢ष्टये꣣ धु꣡नि꣢व्रताय꣣ श꣡व꣢से ॥४६२॥

स्वर सहित पद पाठ

प्र꣢ । वः꣣ । महे꣢ । म꣣त꣡यः꣢ । य꣣न्तु । वि꣡ष्ण꣢꣯वे । म꣣रु꣡त्व꣢ते । गि꣣रिजाः꣢ । गि꣣रि । जाः꣢ । ए꣣वया꣡म꣢रुत् । ए꣣वया꣢ । म꣣रुत् । प्र꣢ । श꣡र्धा꣢꣯य । प्र । य꣡ज्य꣢꣯वे । सु꣣खाद꣡ये꣢ । सु꣣ । खाद꣡ये꣢ । त꣣व꣡से꣢ । भ꣣न्द꣡दि꣢ष्टये । भ꣣न्द꣢त् । इ꣣ष्टये । धु꣡नि꣢꣯व्रताय । धु꣡नि꣢꣯ । व्र꣣ताय । श꣡व꣢꣯से ॥४६२॥


स्वर रहित मन्त्र

प्र वो महे मतयो यन्तु विष्णवे मरुत्वते गिरिजा एवयामरुत् । प्र शर्धाय प्र यज्यवे सुखादये तवसे भन्ददिष्टये धुनिव्रताय शवसे ॥४६२॥


स्वर रहित पद पाठ

प्र । वः । महे । मतयः । यन्तु । विष्णवे । मरुत्वते । गिरिजाः । गिरि । जाः । एवयामरुत् । एवया । मरुत् । प्र । शर्धाय । प्र । यज्यवे । सुखादये । सु । खादये । तवसे । भन्ददिष्टये । भन्दत् । इष्टये । धुनिव्रताय । धुनि । व्रताय । शवसे ॥४६२॥

सामवेद - मन्त्र संख्या : 462
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 12;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (अध्यात्म पक्ष) - हे बंधूंनो, त्या (महे) महान (मरुत्वते) प्राणवान (विष्णवे) साऱ्या शरीरात व्याप्त होऊन क्रिया करणाऱ्या जीवात्म्याला प्रोत्साहन देण्यासाठी (वः) तुमची (मतयः) बुद्धी अथवा तुमची वाणी (प्र यन्तु) प्रसृत व्हावी (बुद्धी व वाणीने तुम्ही आपली आत्मिक शक्ती वाढवा) हा जीवात्मा (गिरिजाः) पर्वतासारख्या दृढ शरीरात आलेला वा जन्म घेतलेला असून (एवयामकत्) वेगवान प्राणशक्ती धारण करीत आहे. (यज्यवे) शरीर संचालन रूप यज्ञ करणाऱ्या आणि (सुखादवे) रोज आदींना पूर्णपणे खाऊन टाकणाऱ्या (तवसे) शारीरिक शक्तीने संपन्न (या जीवात्म्याला तुम्ही वाणी, बुद्धीने उत्साहित करा) प्राणशक्ती (मन्ददिष्टये) सुखमय शंभर वर्षाचे आयुष्य रूप यज्ञ करणारी (धुनिव्रताय) शारीरिक व मानसिक दोष कंपित करणारी (शवसे) असून अशा बलवती (शर्घाय) प्राणशक्ती प्राप्त करण्यासाठी देखील तुमची बुद्धी व वाणी (प्र प्र यन्तु) प्रवृत्त व्हावी (वाणी व बुद्धीद्वारे तुम्ही प्राणादी वायूंची शक्ती वाढवा.)।। द्वितीय अर्थ - (राष्ट्र पक्ष) बंधूनो, (महे) महान (मकत्वते) शूर योद्धा सैनिकांच्या सैन्याचा स्वामी व (विष्णवे) यानांद्वारे जल, स्थल व अंतरिक्ष या तिन्ही स्थानांपर्यंत व्याप्ती असलेल्या या राजाकरिता (वः) तुमच्या (मतयः) वाणी (प्र यन्तु) प्रवृत्त व्हाव्यात. (तुम्ही त्याची प्रशंसा करा). तो राजा (गिरिजाः) पर्वतसम सर्वोच्च पदावर अभिषिक्त असून (एवयामकत्) वेगवान सैनिकांचा संचालक आहे. तसेच तो (यज्ववे) राष्ट्र - रक्षारूप यज्ञ करण्यात व्यस्त आणि (सुखादये) उत्कृष्ट पादत्राण आणि हस्तत्राणांनी अशा (तवसे) गतिमान, कर्मथ (सैनिकांसाठीदेखील तुमची वाणी प्रवृत्त व्हावी. कारण त्या सैनिकांना (मन्ददिष्ट्ये) संग्रामरूप यज्ञात खरे सुख मिळते (धुनिव्रताथ) ते शत्रूला प्रकम्पित करणारे आहेत, अशा (शवसे) बलवान (शर्धाय) वीर योद्धा सैन्यासाठीदेखील तुमची वाणी (प्र प्र यन्तु) अधिकाधिक प्रवृत्त होऊ द्या. म्हणजे तुम्ही चांगल्या कामगिरीबद्दल राजाची आणि त्याच्या सैन्याची प्रशंसा करीत चला, तसेच त्यांना योग्य वेळी उत्साह देत जा.।। ६।।

भावार्थ - जेव्हा लोक प्राणायामाद्वारे शारीरिक व मानसिक दोष भस्म करून आत्मिक बळ वाढवतात, तेव्हा त्यांना सर्व सिद्धी हस्तगत होतात. त्याचप्रमाणे राष्ट्राचे वीर सैनिक जेव्हा शत्रूला प्रकम्पित करून राजाची शक्ती वाढवतात, तेव्हा राष्ट्राची सर्व दृष्ट्या उन्नती घडून येते.।। ६।।

इस भाष्य को एडिट करें
Top