Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 497
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
अ꣡चि꣢क्रद꣣द्वृ꣢षा꣣ ह꣡रि꣢र्म꣣हा꣢न्मि꣣त्रो꣡ न द꣢꣯र्श꣣तः꣢ । स꣡ꣳ सूर्ये꣢꣯ण दिद्युते ॥४९७॥
स्वर सहित पद पाठअ꣡चि꣢꣯क्रदत् । वृ꣡षा꣢꣯ । ह꣡रिः꣢꣯ । म꣣हा꣢न् । मि꣣त्रः꣢ । मि꣣ । त्रः꣢ । न । द꣣र्शतः꣢ । सम् । सू꣡र्ये꣢꣯ण । दि꣣द्युते ॥४९७॥
स्वर रहित मन्त्र
अचिक्रदद्वृषा हरिर्महान्मित्रो न दर्शतः । सꣳ सूर्येण दिद्युते ॥४९७॥
स्वर रहित पद पाठ
अचिक्रदत् । वृषा । हरिः । महान् । मित्रः । मि । त्रः । न । दर्शतः । सम् । सूर्येण । दिद्युते ॥४९७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 497
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 4;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 4;
Acknowledgment
विषय - सोम परमेश्वराच्या महिमेचे वर्णन
शब्दार्थ -
(वृषा) मनोरथ पूर्ण करणारा (हरिः) पापहारी सोम परमश्वर सर्वांच्या हृदयात असून (अचिक्रदत्) शब्द करीत आहे. अर्थात सदुपदेश आणि सत्प्रेरणा देत आहे. तो (महान्) महान असून (मित्रः न) मित्राप्रमाणे (दर्शतः) दर्शनयी (वा सह राहणारा) आहे. तोच (सूर्येण) सूर्याशी (सम्) संगत असून (विद्युते) प्रकाशित होत आहे (म्हणजे तोच सूर्याला प्रकाश देत असून सूर्याच्या प्रकाशाच्या रूपाने त्यालाच पाहता येते.) म्हटलेही आहे ‘जो आदित्यात पुरुष आहे, तो मीच आहे.’ (यजु. ४०/१७/१)
या मंत्रात ‘अचिक्रदत् लृषा’ येथे शब्दश
भावार्थ - जे सूक्ष्मदर्शीजन सतात, ते सूर्य, पर्जन्य आदीत परमेश्वरालाच पाहतात. कारण त्या पदार्थांना उष्णत्व, प्रकाश, जलवर्षण आदी सर्व शक्ती परमेश्वराने दिलेल्या आहेत.।। १।।
विशेष -
या मंत्रात ‘अचिक्रदत् लृषा’ येथे शब्दशक्तीमूलक ध्वनी असा वर्षा करणारा मेघ गर्जना करीत आहे. या दुसऱ्य अर्थाद्वारेही अर्थ ध्वनित आहे की मेघात आणि सोम परमात्म्यात उपमान उपमेय भाव आहे, म्हणून येथे उपमाध्वनि आहे. ‘मित्रो न दर्शतः’ मध्ये वाच्या पूर्णोपया आहे.।। १।।