Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 51
ऋषिः - सौभरि: काण्व:
देवता - अग्निः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
प्र꣡ दैवो꣢꣯दासो अ꣣ग्नि꣢र्दे꣣व꣢꣫ इन्द्रो꣣ न꣢ म꣣ज्म꣡ना꣢ । अ꣡नु꣢ मा꣣त꣡रं꣢ पृथि꣣वीं꣡ वि वा꣢꣯वृते त꣣स्थौ꣡ नाक꣢꣯स्य꣣ श꣡र्म꣢णि ॥५१॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । दै꣡वो꣢꣯दासः । दै꣡वः꣢꣯ । दा꣣सः । अग्निः꣢ । दे꣣वः꣢ । इ꣡न्द्रः꣢꣯ । न । म꣣ज्म꣡ना꣢ । अ꣡नु꣢꣯ । मा꣣त꣡र꣢म् । पृ꣣थिवी꣢म् । वि । वा꣣वृते । तस्थौ꣢ । ना꣡क꣢꣯स्य । श꣡र्म꣢꣯णि ॥५१॥
स्वर रहित मन्त्र
प्र दैवोदासो अग्निर्देव इन्द्रो न मज्मना । अनु मातरं पृथिवीं वि वावृते तस्थौ नाकस्य शर्मणि ॥५१॥
स्वर रहित पद पाठ
प्र । दैवोदासः । दैवः । दासः । अग्निः । देवः । इन्द्रः । न । मज्मना । अनु । मातरम् । पृथिवीम् । वि । वावृते । तस्थौ । नाकस्य । शर्मणि ॥५१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 51
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - पुढे परमेश्वराच्या महिमेचे वर्णन केले आहे. -
शब्दार्थ -
(दैवोदास) धार्मिक जनांचा प्रिय असा (देव:) (अग्नि:) प्रकाशक जगन्नायक परमेश्वर (इन्द्र व) बलवान राजाप्रमाणे (मज्मना) आपल्या शक्तीमुळे (प्र) प्रभावशाली आणि समर्थ झालेला आहे. पुढे परमेश्वराच्या सामर्थ्याचेच वर्णन आहे. तो परमात्मा (मातरम्) माता (पृथिवीम्) भूमीला (अनु वि वावृते) अनुकुलतेने वा नियमाप्रमाणे सूर्याभोवती परिक्रमा करवीत आहे. तोच परमेश्वर (वाकस्य) सूर्याच्या (शर्मणि) घरात म्हणजे सूर्यमंडळात (तस्यौ) स्थित आहे. म्हणजे सूर्याचा संचालकही तोच आहे. ।।७।।
भावार्थ - जसे एक मानव राजा आपल्या सामर्थ्याद्वारे राष्ट्रभूमीला नियमाप्रमाणे सुनियमितरूपेण संचालित करतो, तसेच परमेश्वर भूमीला सूर्याभोवती परिभ्रमण करवीत आहे. तोच आदित्यात विद्यमान राहून सूर्याद्वारे पृथ्वी आदी ग्रह उपग्रहांना प्रकाशित करीत आहे. ।।७।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे. - इन्द्र: न ।।७।।