Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 50
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः देवता - अग्निः छन्दः - बृहती स्वरः - मध्यमः काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0

श्रु꣣धि꣡ श्रु꣢त्कर्ण꣣ व꣡ह्नि꣢भिर्दे꣣वै꣡र꣢ग्ने स꣣या꣡व꣢भिः । आ꣡ सी꣢दतु ब꣣र्हि꣡षि꣢ मि꣣त्रो꣡ अ꣢र्य꣣मा꣡ प्रा꣢त꣣र्या꣡व꣢भिरध्व꣣रे꣢ ॥५०॥

स्वर सहित पद पाठ

श्रु꣣धि꣢ । श्रु꣣त्कर्ण । श्रुत् । कर्ण । व꣡ह्नि꣢꣯भिः । दे꣣वैः꣢ । अ꣣ग्ने । सया꣡व꣢भिः । स꣣ । या꣡व꣢꣯भिः । आ । सी꣣दतु । बर्हि꣡षि꣢ । मि꣣त्रः꣢ । मि꣣ । त्रः꣢। अ꣣र्यमा꣢ । प्रा꣣तः । या꣡व꣢꣯भिः । अ꣣ध्वरे꣢ ॥५०॥


स्वर रहित मन्त्र

श्रुधि श्रुत्कर्ण वह्निभिर्देवैरग्ने सयावभिः । आ सीदतु बर्हिषि मित्रो अर्यमा प्रातर्यावभिरध्वरे ॥५०॥


स्वर रहित पद पाठ

श्रुधि । श्रुत्कर्ण । श्रुत् । कर्ण । वह्निभिः । देवैः । अग्ने । सयावभिः । स । यावभिः । आ । सीदतु । बर्हिषि । मित्रः । मि । त्रः। अर्यमा । प्रातः । यावभिः । अध्वरे ॥५०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 50
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5;
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपरक) हे (श्रुत्कर्ण) ऐकणाऱ्या कानांनी युक्त म्हणजे अपरिमित श्रवणशक्ती असणाऱ्या (अग्ने) परमात्मन् आपण (वहिभि:) अश्वाप्रमाणे वहन करणारे म्हणजे जसे घोडे आपल्या पाठीवर बसवून लोकांना गन्तव्य स्थानापर्यंत नेतात, तद्वत हे परमेश्वर, आपण उपासकाला उत्कर्षाच्या शिखरापर्यंत नेता. सयावभि: आपल्या सोबत येणाऱ्या वा असणाऱ्या (देवै) दिव्य गुणांसह आपण (श्रुधि) माझी प्रार्थना ऐका (अध्वरे) हिंसा आदी मालिव्य दोघांनी रहित अशा माझ्या उपासना यज्ञात (प्रातर्याघभि:) प्रात:काळी यज्ञाप्रसंगी हृदयात उदित होणाऱ्या दिव्य गुणांसह (मित्रा) मित्राप्रमाणे स्नेहशील (अर्यमा) न्यायकारी असे आपण माझ्या हृदयासनावर (आसीदतु) विराजमान व्हा. ।। द्वितीय अर्थ : (शजापरक) हे (श्रुत्कर्ण) बहुश्रुत अथवा अनेकांचे वचन/प्रार्थना ऐकणारे राजनीतिकुशल (अग्ने) विद्याप्रकाशयुक्त राजन् आपण (वहिभि:) राज्यशासन करण्यात समर्थ असून (सदावभि:) आपल्यासोबत येणाऱ्या (देवै) विद्वान मंत्री आदी राजपुरुषांसह (श्रुधि) आमचे निवेदन ऐका. आश्व (अध्वरे) या राष्ट्रयज्ञात (प्रातर्यावभि:) प्रजेचे सुख-दु:ख वा म्हणणे ऐकण्यासाठी सकाळीच राजसभेत उपस्थित होणारे आहात. अशा राज्याधिकाऱ्यांसह (मित्र:) मित्राप्रमाणे आचरण करणारे राजसचिव आणि (अर्थमा) श्रेष्ठजनांना सन्मानित करणारे आणि इतर अश्रेष्ठजनांना देहित करणारे न्यायाधीश या सर्व जणांनी (बर्हिषि) आपापल्या वान्यासनावर (आसदितु) बसावे. ।।६।।

भावार्थ - पवित्र भावनांचा प्रेरक जो प्रभातकाळ त्या प्रभातकाळी जे उपासकगण उपासना यज्ञ करतात. त्या यज्ञात परमात्मा राम, दम, तप, स्वाध्याय, दान, दया, न्याय आदी विविध गुणदेखील उदित होतात. त्याकाळी हृदयात अनुभूत परमेश्वरास आणि सद्गुणांना उपासकाने हृदयात स्थायीरूपेण धारण केले पाहिजे. तसेच प्रजापालक राजाचेही कर्तव्य आहे की त्याने राज्यसंचालनात सक्षम, योग्य मंत्री, न्यायाधीश आदी राजपुरुषांची नेमणूक करून त्यांच्यासह प्रजाजनांच्या गाऱ्हाणे ऐकून त्याचे निवारण करावे. ।।६।।

इस भाष्य को एडिट करें
Top