Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 529
ऋषिः - पराशरः शाक्त्यः देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

अ꣡क्रा꣢न्त्समु꣣द्रः꣡ प्र꣢थ꣣मे꣡ विध꣢꣯र्मन् ज꣣न꣡य꣢न्प्र꣣जा꣡ भुव꣢꣯नस्य गो꣣पाः꣢ । वृ꣡षा꣢ प꣣वि꣢त्रे꣣ अ꣢धि꣣ सा꣢नो꣣ अ꣡व्ये꣢ बृ꣣ह꣡त्सोमो꣢꣯ वावृधे स्वा꣣नो꣡ अद्रिः꣢꣯ ॥५२९॥

स्वर सहित पद पाठ

अ꣡क्रा꣢꣯न् । स꣣मुद्रः꣢ । स꣣म् । उद्रः꣢ । प्र꣣थमे꣢ । वि꣡ध꣢꣯र्मन् । वि । ध꣣र्मन् । जन꣡य꣢न् । प्र꣣जाः꣢ । प्र꣣ । जाः꣢ । भु꣡व꣢꣯नस्य । गो꣣पाः꣢ । गो꣣ । पाः꣢ । वृ꣡षा꣢꣯ । प꣣वि꣡त्रे꣢ । अ꣡धि꣢꣯ । सा꣡नौ꣢꣯ । अ꣡व्ये꣢꣯ । बृ꣣ह꣢त् । सो꣡मः꣢꣯ । वा꣣वृधे । स्वानः꣢ । अ꣡द्रिः꣢꣯ । अ । द्रिः꣣ ॥५२९॥


स्वर रहित मन्त्र

अक्रान्त्समुद्रः प्रथमे विधर्मन् जनयन्प्रजा भुवनस्य गोपाः । वृषा पवित्रे अधि सानो अव्ये बृहत्सोमो वावृधे स्वानो अद्रिः ॥५२९॥


स्वर रहित पद पाठ

अक्रान् । समुद्रः । सम् । उद्रः । प्रथमे । विधर्मन् । वि । धर्मन् । जनयन् । प्रजाः । प्र । जाः । भुवनस्य । गोपाः । गो । पाः । वृषा । पवित्रे । अधि । सानौ । अव्ये । बृहत् । सोमः । वावृधे । स्वानः । अद्रिः । अ । द्रिः ॥५२९॥

सामवेद - मन्त्र संख्या : 529
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (पर्जन्यपर) - (समुद्रः) जलाचा जो आगर मेघ, तो (प्रथमे) श्रेष्ट असून (विधर्मन्) विशेष रूपाने धारणकर्ता अंतरिक्षात (अक्रान्) व्याप्त होतो. (प्रजाः) वृक्ष, वनस्पती रूप प्रज (जनयन्) उत्पन्न करीत (भूतस्य) भूतलाचा (गोपाः) तो रक्षक होो. (वृषा) वृष्टी करणारा (स्वानः) सर्वांना स्नान घात (अद्रिः) मेघरूप तो (सोमः) (पवित्रे) पवित्र (अव्ये) पार्थिव (सानौ अधि) पर्वत- शिखरावर (बृहत्) अत्यंत (वावृधे) वृद्धिंगत होतो.।। द्वितीय अर्थ - (परमात्मपर) (समुद्रः) शक्तीचा पारावार परमेश्वर (प्रथमे) श्रेष्ठ असून (विधर्मन्) विसेषत्वाने जड - चेतन जगाचा धारक आहे व या व्यापक रूपाने तो सर्व ब्रह्मांडात (अक्रान्) व्याप्त आहे. तो (प्रजाः) जड वा चेतन सर्व पदार्थांना जन्म देत (भुवनस्य) जगाचा (गोपाः) रक्षक आहे. तोच (वृषा) सद्गुणांची वा अंतरिक्षस्य जलाची वृष्टी करणारा असून (स्वानः) सत्कर्मासाठी सर्वांना प्रेरणा करतो. तो (अद्रिः) अविनाशी (सोम) परमेश्वर (पवित्रे) पवित्र (अव्ये) अव्यय आहे. (कधी व्यय वा नष्ट होणारा नाही) तो (सानौ अधि) उन्नत उत्कृष्ट आत्म्यामध्ये (बृहत्) अत्यंत (वावृधे) महिमाशीत होतो. (श्रेष्ठ व सात्त्विक आत्माच त्याचे महत्त्व जाणू शकतो.) कारण की श्रेष्ठ मनुष्याद्वारे केलेल्या कार्यातूनच परमेश्वराचे महत्त्व कळून येते.।। ७।।

भावार्थ - जसे अगाध जलराशी असणारा मेघ अंतरिक्षात व्याप्त होतो, तसेच परमेश्वर समस्त ब्रह्मांडात व्याप्त आहे. जसे मेघ वर्षा करून वृक्ष, वनस्पती आदींची उत्पत्ती, वृद्धी करतो, तद्वत परमेश्वर जड वा चेतन सर्व पदार्थांना उत्पन्न करतो. जसे मेघ भूमीचा रक्षक आहे, तसेच परमेश्वर सर्व भुवनांचा रक्षक आहे. जसे मेघ पर्वत- शिखरांना विस्तारित होतो, तद्वत परमेश्वर मनुष्यांच्या आत्म्यात विस्तार पावतो. (योगी मनुष्य अंतःकरणामध्ये त्याची अधिकाधिक अनुभूती घेतात.)।। ७।।

इस भाष्य को एडिट करें
Top