Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 530
ऋषिः - प्रस्कण्वः काण्वः देवता - पवमानः सोमः छन्दः - त्रिष्टुप् स्वरः - धैवतः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

क꣡नि꣢क्रन्ति꣣ ह꣢रि꣣रा꣢ सृ꣣ज्य꣡मा꣢नः꣣ सी꣢द꣣न्व꣡न꣢स्य ज꣣ठ꣡रे꣢ पुना꣣नः꣢ । नृ꣡भि꣢र्य꣣तः꣡ कृ꣢णुते नि꣣र्णि꣢जं꣣ गा꣡मतो꣢꣯ म꣣तिं꣡ ज꣢नयत स्व꣣धा꣡भिः꣢ ॥५३०॥

स्वर सहित पद पाठ

क꣡नि꣢꣯क्रन्ति । ह꣡रिः꣢꣯ । आ । सृ꣣ज्य꣡मा꣢नः । सी꣡द꣢꣯न् । व꣡न꣢꣯स्य । ज꣣ठ꣡रे꣢ । पु꣣नानः꣢ । नृ꣡भिः꣢ । य꣣तः꣢ । कृ꣣णुते । निर्णि꣡ज꣢म् । निः꣣ । नि꣡ज꣢꣯म् । गाम् । अ꣡तः꣢꣯ । म꣣ति꣢म् । ज꣣नयत । स्वधा꣡भिः꣢ । स्व꣣ । धा꣡भिः꣢꣯ ॥५३०॥


स्वर रहित मन्त्र

कनिक्रन्ति हरिरा सृज्यमानः सीदन्वनस्य जठरे पुनानः । नृभिर्यतः कृणुते निर्णिजं गामतो मतिं जनयत स्वधाभिः ॥५३०॥


स्वर रहित पद पाठ

कनिक्रन्ति । हरिः । आ । सृज्यमानः । सीदन् । वनस्य । जठरे । पुनानः । नृभिः । यतः । कृणुते । निर्णिजम् । निः । निजम् । गाम् । अतः । मतिम् । जनयत । स्वधाभिः । स्व । धाभिः ॥५३०॥

सामवेद - मन्त्र संख्या : 530
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 4; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 6;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (सोम औषधीपर) - (हरिः) हिरव्या रंगाचा सोम - रस (आ सृज्यमानः) द्रोण कलशात पडताना वा सोडले जात असताना (कनिक्रन्ति) ध्वनी उत्पन्न करतो (वनस्य) वनाच्या (जठरे) मध्यभागी (खोल अरण्यात) (सीदन्) सापडणारी वा असणारी ती औषधी (पुनानः) वायुमंडळाला पवित्र वा शुद्ध करते. (नृभिः) यज्ञाचे नेतृत्व करणाऱ्या ऋत्विजांद्वारे (यतः) तोडून आपलेला तो सोम (ती औषधी) (गाम्) गायीच्या दुधात घातल्यानंतर (निर्मिजम्) आपल्या गुणांमुळे त्या दुधाला अधिक पुष्ट करे. (अतः) यामुळे हे यजमान जनहो, तुम्ही (स्वधाभिः) हवीरूप --- सोमयाग करण्यासाठी (मतिम्) बुद्धी (निश्चय वा योजना) (जवयत) तयार करा म्हणजे सोम याग संपन्न करण्यासाठी आवड वा इच्छा उत्पन्न करा.।। द्वितीय अर्थ - (परमात्म पर) (हरिः) पापहारी परमेश्वर (आसृज्यमानः) मनुष्याच्या आत्म्याशी संयुक्त होत असता (कनिक्रन्ति) कर्तव्य - अकर्तव्याविषयी उपदेश करीत असतो (वनस्य) आपल्या प्रिय उपासकाच्या (जठरे) हृदयात (सीदन्) बसून (पुनानः) पावित्र्य देत असतो. (नृभिः) उपासक जनांद्वारे (यतः) हृदयात बंदिस्त केलेला तो (गाम्) इंद्रिय- समूहाला (निर्णिजम्) शुद्ध (कृणुते) करतो (अतः) यामळे हे मनुष्यांनो, तुम्ही (स्वधाभिः) आत्म समर्पण करीत त्या परमेश्वराविषयी (मतिम्) स्तुती (जनयत) व्यक्त करा.।। ८।।

भावार्थ - ज्याप्रमाणे द्रोण कलशात पडणारा सोम टपटप शब्द करतो, तद्वत मनुष्यांच्या आत्म्यात विद्यमान परमेश्वर त्यांना कर्तव्य - अकर्तव्याविषयी उपदेश करीत असतो. जसे सोम गायीच्या दुधात मिळाल्यानंतर दुधाला अधिक पौष्टीक बनवतो. तद्वत हृदयात निगृहीत परमेश्वर इंद्रिये पुष्ट व निर्मळ करतो. म्हणून सर्वांनी परमेश्वराचे स्तुतिगीते अवश्य गावावीत.।। ८।।

इस भाष्य को एडिट करें
Top