Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 560
ऋषिः - रेणुर्वैश्वामित्रः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0
त्रि꣡र꣢स्मै स꣣प्त꣢ धे꣣न꣡वो꣢ दुदुह्रिरे स꣣त्या꣢मा꣣शि꣡रं꣢ पर꣣मे꣡ व्यो꣢मनि । च꣣त्वा꣢र्य꣣न्या꣡ भुव꣢꣯नानि नि꣣र्णि꣢जे꣣ चा꣡रू꣢णि चक्रे꣣ य꣢दृ꣣तै꣡रव꣢꣯र्धत ॥५६०॥
स्वर सहित पद पाठत्रिः꣢ । अ꣣स्मै । सप्त꣢ । धे꣣न꣡वः꣢ । दु꣣दुह्रिरे । सत्या꣢म् । आ꣣शि꣡र꣢म् । आ꣣ । शि꣡र꣢꣯म् । प꣣रमे꣢ । व्यो꣢मन् । वि । ओ꣣मनि । चत्वा꣡रि꣢ । अ꣣न्या꣢ । अ꣣न् । या꣢ । भु꣡व꣢꣯नानि । नि꣣र्णि꣡जे꣢ । निः꣣ । नि꣡जे꣢꣯ । चा꣡रू꣢꣯णि । च꣣क्रे । य꣢त् । ऋ꣣तैः꣢ । अ꣡व꣢꣯र्धत ॥५६०॥
स्वर रहित मन्त्र
त्रिरस्मै सप्त धेनवो दुदुह्रिरे सत्यामाशिरं परमे व्योमनि । चत्वार्यन्या भुवनानि निर्णिजे चारूणि चक्रे यदृतैरवर्धत ॥५६०॥
स्वर रहित पद पाठ
त्रिः । अस्मै । सप्त । धेनवः । दुदुह्रिरे । सत्याम् । आशिरम् । आ । शिरम् । परमे । व्योमन् । वि । ओमनि । चत्वारि । अन्या । अन् । या । भुवनानि । निर्णिजे । निः । निजे । चारूणि । चक्रे । यत् । ऋतैः । अवर्धत ॥५६०॥
सामवेद - मन्त्र संख्या : 560
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 9;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 9;
Acknowledgment
विषय - स्तोत्याला (उपासकाला) कोणते लाभ मिळतात याविषयी विरस्मै सप्त धेनवो दुदुहिरे सत्यामाशिरं परमे ग्योमनि।
शब्दार्थ -
(परमे) उत्कृष्ट (व्योमनि) हृदयाकाशात (अस्मै) या स्तोतासाठी (त्रिःसप्त) एकवीस छंद असलेल्या (धेनवः) वेद नाणीरूप गायी (सत्याम् आशिरम्) सत्यरुप दूध (दुदुहिृरे) दोहन करतात (वैदज्ञान देतात) (धत्) जेव्हा हा उपासक (ऋतैः) सत्य ज्ञानाने व सत्यकर्माने (अवृर्दत) वृद्धिंगत होतो, उन्नती करतो, तेव्हा (निर्णिजे) आपल्या आत्म्याच्या शोधनासाठी वा पोषणासाठी (अन्या) इतर (चत्वारि) चार (चासणि) रमणीय (भुवनानि) धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चार भुवनांचे (चक्रे) निर्माण करतो ।।७।।
भावार्थ - साठ गायत्री छन्द, सात अतिजग ती आदी छन्द आणि सात कृत्या आदी छन्द असे सर्व मिळून वेदांमधे एकवीस छन्द आहेत. त्या एकवीस छंदामुळे एकवीस प्रकारच्या वेदवाणी जणू एकवीस गायी आहेत, या गायी आपल्या सेवकाला सत्यज्ञानरूप आणि सत्कर्तव्यरूप दूध देतात. या दुधामुळे परिपुष्ट झालेला स्तोता धज्ञर्, अर्थ, कपाळ मोक्ष या चार भुवनांत वास्तव्य करीत आपले जीवन यशस्वी करून धेवो.।।७।।
विशेष -
‘धनु’ शब्द निघण्टु (१/११) मधे वाणी अर्थाने आलेला आहे- ताण्डय आणि गोषध ब्राह्मणात देखील म्हटले आहे ती ‘वाणी हीच धेनु’ आहे. (ताण्डय ब्राह्मण ग्रंथ-१८/९/२१/गोषध-पू.२/२१) वेदवाणीवर धेनुत्वाचा आरोप असल्यामुळे तसेच उपमेयाचे उपमानाद्वारे निगरण केल्यामुळे येथे अतिशयोक्ति अलंकार आहे. ।।७।।