Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 575
ऋषिः - पर्वतनारदौ काण्वौ देवता - पवमानः सोमः छन्दः - उष्णिक् स्वरः - ऋषभः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

अ꣣स्म꣡भ्यं꣢ त्वा वसु꣣वि꣡द꣢म꣣भि꣡ वाणी꣢꣯रनूषत । गो꣡भि꣢ष्टे꣣ व꣡र्ण꣢म꣣भि꣡ वा꣢सयामसि ॥५७५॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣स्म꣡भ्य꣢म् । त्वा꣣ । वसुवि꣡द꣢म् । व꣣सु । वि꣡द꣢꣯म् । अ꣣भि꣢ । वा꣡णीः꣢ । अ꣣नूषत । गो꣡भिः꣢꣯ । ते꣣ । व꣡र्ण꣢꣯म् । अ꣣भि꣢ । वा꣣सयामसि ॥५७५॥


स्वर रहित मन्त्र

अस्मभ्यं त्वा वसुविदमभि वाणीरनूषत । गोभिष्टे वर्णमभि वासयामसि ॥५७५॥


स्वर रहित पद पाठ

अस्मभ्यम् । त्वा । वसुविदम् । वसु । विदम् । अभि । वाणीः । अनूषत । गोभिः । ते । वर्णम् । अभि । वासयामसि ॥५७५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 575
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 10;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) परमात्मपर)- हे सोम परमेश्वर, (अस्मभ्यम्) आम्हांसाठी (वसुविदम्) आपण ऐश्वर्यदायक आहात. (त्वा) (अभि) आपणास उद्देशून (वाणीः) आमची वाणी (अनूषत) आपली स्तुती करीत आहे. आम्ही (गो भिः) वेदवाणी द्वारे (ते) तुमच्या (वर्णम्) स्वरूपाला (अभिवासयामसि) आमच्या अंतःकरणात स्थापित करीत आहोत.।। द्वितीय अर्थ - (वैद्यपर)- उपचारासाठी सोम आदी औषधींचा रस अभिषुत करणारे वैद्यराज, (अस्मभ्यम्) आम्हा रोग्यांसाठी (वसुविदम्) स्वास्थ्यरूप संपदा देणाऱ्या अशा (त्वा अभि) आपणास उद्देशून आम्हा रोगीजनांत (वाणीः) वाणी (अनूषत) तुमची स्तुती करीत आहे, म्हणजे तुमच्या आयुर्वेदशास्त्रात ज्ञानाची प्रशंसा करीत आहे (इथपर्यंत रोगीजनांचे कथन आहे.) पुढे वैद्यराज म्हणतात- हे त्वचारोगाने त्रस्त रोगी मनुष्या, (गोभिः) गायीद्वारे प्राप्त होणाऱ्या दूध, दही, घृत, मूत्र व शेण या पंच गव्यांद्वारे आम्ही (ते) तुझ्या त्वचेच (वर्णम्) स्वाभाविक रंग पुन्हा (अभिवासयामसि) तुझ्या त्वचेत आणून देतो, म्हणजे कुष्ठ आदी रोगाने तुझ्या त्वचेचा जे रंग-रूप विकृत झाले होते, ते घालवून पूर्वीचा स्वाभाविक रंग आणतो. या वर्णनाने असे सूचित होते की त्वचा रोगांवर पंच गव्य चिकित्सा अत्यंत गुणकारी आहे.।।१०।।

भावार्थ - सर्व प्रकारचे ऐश्वर्य देणाऱ्या परमेश्वराचे सत्य, शिव, सुंदर, सच्चिदानंत स्वरूप आम्ही हृदयात धारण केले पाहिजे. तसेच श्रेष्ठ वैद्यांनी सांगितलेल्या पद्धतीने पंचगव्यांद्वारे उपचार करून रोगीजनांनी त्वचा आदीन्त होणारे रोग दूर करावेत.।।१०।।

इस भाष्य को एडिट करें
Top