Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 59
ऋषिः - कण्वो घौरः
देवता - अग्निः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
प्र꣡ वो꣢ य꣣ह्वं꣡ पु꣢रू꣣णां꣢ वि꣣शां꣡ दे꣢वय꣣ती꣡ना꣢म् । अ꣣ग्नि꣢ꣳ सू꣣क्ते꣢भि꣣र्व꣡चो꣢भिर्वृणीमहे꣣ य꣢꣫ꣳसमिद꣣न्य꣢ इ꣣न्ध꣡ते꣢ ॥५९॥
स्वर सहित पद पाठप्र꣢ । वः꣣ । यह्व꣢म् । पु꣣रूणा꣢म् । वि꣣शा꣢म् । दे꣣वयती꣡ना꣢म् । अ꣣ग्नि꣢म् । सू꣣क्ते꣢भिः꣣ । सु꣣ । उक्थे꣡भिः꣢ । व꣡चो꣢꣯भिः । वृ꣣णीमहे । य꣢म् । सम् । इत् । अ꣣न्ये꣢ । अ꣣न् । ये꣢ । इ꣣न्ध꣡ते꣢ ॥५९॥
स्वर रहित मन्त्र
प्र वो यह्वं पुरूणां विशां देवयतीनाम् । अग्निꣳ सूक्तेभिर्वचोभिर्वृणीमहे यꣳसमिदन्य इन्धते ॥५९॥
स्वर रहित पद पाठ
प्र । वः । यह्वम् । पुरूणाम् । विशाम् । देवयतीनाम् । अग्निम् । सूक्तेभिः । सु । उक्थेभिः । वचोभिः । वृणीमहे । यम् । सम् । इत् । अन्ये । अन् । ये । इन्धते ॥५९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 59
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 1; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - आता परमेश्वराविषयी आणि राजाविषयी सांगताहेत. -
शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमात्मपूरक) - (देवयतीनाम्) स्वत:साठी दिव्य भोग, दिव्य गुण आणि दिव्य आनंदाची इच्छा करणाऱ्या अशा (पुरुणाम्) तुम्हा अनेक (निशांव:) प्रजाजनांसाठी आम्ही (विद्वान उपासक) (यह्म्) गुणांमुळे अति महान (अग्निम्) परमेश्वराचे (सूक्तेभि:) उत्तम प्रकारे गायिलेल्या (वयोगि:) साम मंत्राद्वारे व अन्नस्त्रोतांद्वारे (प्रवृणीमहे) प्रकट रूपेण भजन करतो. (यम्) ज्या परमेश्वराला (अन्ये इत्) इतरही अनेक भक्तजन (सम् इन्थते) चांगल्या प्रकारे आपल्या अंत:करणात प्रदीप्त करतात. (आम्हीही त्या ईश्वराचे तुमच्या सुख आनंदासाठी ध्यान करतो.)
द्वितीय अर्थ : (राजापरक) (देवयतीनाम्) स्वत:साठी विजयाभिलाषी राजाची इच्छा करणाऱ्या अशा (पुरुणाम्) अनेक (विशांव:) तुम्हा प्रजाजनांमधून आम्ही उपासक (सूक्तै:) चांगल्या प्रकारे आधारित (वयोभि:) उद्बोधक वचनांसह (प्रवृणीमहे) राजपदासाठी या गुणी मनुष्याला निवडून देत आहोत. (मम्) ज्या कथना गुणी याच मनुष्याला (अन्ये) अन्मही राष्ट्रवासी जनांनी (सम् इन्धते) या पदासाठी समुवाहितला समर्पित केले आहे. प्रजेनी राजपदासाठी निर्वाचित केलेल्या मनुष्याला विद्वन्मंडळीदेखील अनुमोदित करीत आहे. ।।५।।
भावार्थ - जसे राजोचित सकलगुणविभूषित कुणी महान पुरुष राजपदासाठी निर्वाचित होत असतो, तसेच सुमहान परमेश्वराचेही सुधारीत स्तुतीवचनांद्वारे मार्गदर्शक रूपेण वरण केले पाहिजे. ।।५।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. ।।५।।