Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 594
ऋषिः - आत्मा
देवता - अन्नम्
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0
अ꣣ह꣡म꣢स्मि प्रथम꣣जा꣡ ऋ꣣त꣢स्य꣣ पू꣡र्वं꣢ दे꣣वे꣡भ्यो꣢ अ꣣मृ꣡त꣢स्य꣣ ना꣡म꣢ । यो꣢ मा꣣ द꣡दा꣢ति꣣ स꣢꣫ इदे꣣व꣡मा꣢वद꣣ह꣢꣫मन्न꣣म꣡न्न꣢म꣣द꣡न्त꣢मद्मि ॥५९४
स्वर सहित पद पाठअ꣣ह꣢म् । अ꣣स्मि । प्रथमजाः꣢ । प्र꣣थम । जाः꣢ । ऋ꣣त꣡स्य꣢ । पू꣡र्व꣢꣯म् । दे꣣वे꣡भ्यः꣢ । अ꣣मृ꣡त꣢स्य । अ꣣ । मृ꣡त꣢꣯स्य । ना꣡म꣢꣯ । यः । मा꣣ । द꣡दा꣢꣯ति । सः । इत् । ए꣣व꣢ । मा꣣ । अवत् । अह꣢म् । अ꣡न्न꣢꣯म् । अ꣡न्न꣢꣯म् । अ꣣द꣡न्त꣢म् । अ꣣द्मि ॥५९४॥
स्वर रहित मन्त्र
अहमस्मि प्रथमजा ऋतस्य पूर्वं देवेभ्यो अमृतस्य नाम । यो मा ददाति स इदेवमावदहमन्नमन्नमदन्तमद्मि ॥५९४
स्वर रहित पद पाठ
अहम् । अस्मि । प्रथमजाः । प्रथम । जाः । ऋतस्य । पूर्वम् । देवेभ्यः । अमृतस्य । अ । मृतस्य । नाम । यः । मा । ददाति । सः । इत् । एव । मा । अवत् । अहम् । अन्नम् । अन्नम् । अदन्तम् । अद्मि ॥५९४॥
सामवेद - मन्त्र संख्या : 594
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - अन्न देवता। परमेश्वर स्वतःचा परिचय देत आहे-
शब्दार्थ -
(अहम्) मी परमेश्वर (ऋतस्थ) संसारात सर्वत्र दिसून येणाऱ्या सत्य नियमांचा (ते नियम की ज्याच्याखाली ग्रह- उपग्रह संक्रमण, विकास, परिवर्तन आदी क्रिया घडत आहेत) (प्रथमजाः) प्रथम उत्पादक (अस्मि) आहे (सृष्टि-उत्पत्तीच्या वेळी आरंभी नियम परमेश्वराने स्थापित केले, त्याप्रमाणे नंतर सृष्टी चालत आहे) मी (देवेभ्यः) सूर्य, विद्युत, अग्नी, तारामंडळ, आदी सर्व दीप्तिमान पदार्थांच्या उत्पत्ति (पूर्वम्) पूर्वी विद्यमान होतो. मी (अमृतस्य) मोक्षावस्थेत मिळणाऱ्या आनंदामृताचा (नाम) केंद्रचा स्रोत आहे. (य्ः) जो मनुष्य (मा) मला (ददाति) आपल्या आत्म्यात समर्पित करतो, (सः इत, एवं) विश्वयानेते (मा) मला (अवत्) प्राप्त होतो (ईश्वराला तो जाणतो) (अहम्) मी (अन्नम्) अन्न आहे, मी भक्तांचे भोजन आहे आणि मीच (अन्नम् अदन्तम्) भोग भोगणाऱ्या प्रत्येक प्राण्याला (अग्नि) खात असतो अर्थात मीच प्रलयकाळी सर्वांना खाऊन टाकतो, यामुळे मीच अत्ता (खाणारा) ही आहे.।।
परमेश्वराची अग व अत्ता ही रूपे उपनिषदात व ब्रह्मसूत्रात याप्रमाणे स्पष्य केली आहेत. ‘मी अन्न आहे, मी अन्न आहे, मी अन्नाद (खाणारा) आहे, मीच अन्नाद आहे? (तैत्तिरीय उप. ३/१०/६) ‘परमेश्वर ‘अत्ता’ यामुळे आहे की तो प्रलयकाळी चर-अचर सर्व जगाला गिळून टाकतो’ (ब्रह्मसूत्र १/२/९)
निरूक्तामधे परोक्षकृत, प्रत्यक्षनकृत, आणि आध्यात्मिक अशा ज्या ती प्रकारच्या ऋचा सांगितल्या आहेत, त्यापैकी ही ऋचा आध्यात्मिक प्रकाराची आहे. आध्यात्मिक ऋचांची ओळख अशी की त्यामधे क्रिया उत्तम पुरुष असून सर्वत्र ङ्गअहम्फ सर्वनामाचा उपयोग केलेला आढळतो अर्थात त्यामधे देवता स्वतःच आपल परिचय देत असते.।।९।।
भावार्थ - जसे प्राणी भोजनाशिवाय जिवंत राहू शकत नाहीत. तसेच भक्तजन परमेश्वराशिवाय जीवित राहू शकत नाहीत. जसे प्राणी अन्नाचा घास घेतो, तद्वत परमेश्वर चराचर जगाचा ग्रास घेत असतो.।।९।। या पूर्वीच्य दशतीत परमेश्वराचे वर्णन सोम या नावाने केले असून या दशतीतदेखील इन्द्र, वरूण, सोम आदी नावाने परमेश्वराचे वर्णन केले आहे. म्हणून या दशतीच्या विषयांशी पूर्व दशतीच्या विषयांची संगती आहे, असे जाणावे.।। षष्ठ प्रपाठकातील तृतीय अर्धाची प्रथम दशती समाप्त। षष्ठ अध्यायातीत प्रथम खंड समाप्त.
विशेष -
या मंत्रात ‘मी अन्न आहे’ मी अन्न खाणारा आहे’ या कथनाला विरोध भासतो म्हणून इथे विरोध अलंकार आहे. ।।९।।