Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 595
ऋषिः - श्रुतकक्ष आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0
त्व꣢मे꣣त꣡द꣢धारयः कृ꣣ष्णा꣢सु꣣ रो꣡हि꣢णीषु च । प꣡रु꣢ष्णीषु꣣ रु꣢श꣣त्प꣡यः꣢ ॥५९५॥
स्वर सहित पद पाठत्व꣢म् । ए꣣त꣢त् । अ꣣धारयः । कृष्णा꣡सु꣢ । रो꣡हि꣢꣯णीषु । च꣣ । प꣡रु꣢꣯ष्णीषु । रु꣡श꣢꣯त् । प꣡यः꣢꣯ ॥५९५॥
स्वर रहित मन्त्र
त्वमेतदधारयः कृष्णासु रोहिणीषु च । परुष्णीषु रुशत्पयः ॥५९५॥
स्वर रहित पद पाठ
त्वम् । एतत् । अधारयः । कृष्णासु । रोहिणीषु । च । परुष्णीषु । रुशत् । पयः ॥५९५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 595
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - प्रथम मंत्राची देवता-इन्द्र। इन्द्र परमेश्वराच्या कौशल्याचे वर्णन
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (गौपरक) हे इन्द्र परमेश्वर, (त्वम्) आपण सर्वशक्तिमान आहात. आपणच (कृष्णासु) काळ्या रंगाच्या (रोहिणीषुच) आणि लाल रंगाच्या तसेच (परुष्णीषु) अत्यंत स्नेहशीला मातृवत गायीमधे (एतत्) या, जे आम्ही रोज पीत आहोत, त्या (सशत्) पांढऱ्या शुभ्र (पयः) दूध (अधारयः) निहित केले आहे.।।
द्वितीय अर्थ - (नदीपतक) हे इन्द्र परमेश्वर, (त्वम्) या जगात व्यवस्था वा संचालन करणारे आपण (कृष्णासु) कृषिकर्मात सहाय्यक असणाऱ्या (रोहिणीषुच) आणि वृक्ष- वनस्पतीचा जीवन देणाऱ्या (परुष्णीषु) पर्व असणाऱ्या (पर्व म्हणजे पोरे-गाठी आदी) म्हणजे वाकडी वाकडी वाहणाऱ्या नद्यांमधे (एतत्) या (रूशत्) स्वच्छ व शुद्ध (पयः) जल (अधारयः) निहित केले आहे. (तुमच्या व्यवस्थेमुळेच नद्यात जल वाहत आहे.)
तृतीय अर्थ - (नाडीपरक)- हे इन्द्र जनत्पत्ती परमेश्वर, (त्वम्) सर्व प्राण्यांच्या शरीरांचे संचालक (कृष्णासु) निळ्या रंगाच्या (रोहिणीषुच) आणि लाल रंगाच्या नाड्यामधे (पुरुष्णीषु) अंगाअंगात जाणाऱ्या अथवा रक्ताला वाहून नेणाऱ्या रक्तनाड्यांमधे (एतत्) या (रुशत्) चमकणाऱ्या निळ्या व लाल रंगाच्या (पयः) रक्तरुपजल आपणच (अधारयः) घातले आहे.।।
चतुर्थ अर्थ - (रात्रिपरक) हे इन्द्र राजाधिराज परमेश्वर, (त्वम्) दिवस-रात्रीचे प्रवर्तक या (कृष्णासु) आंशिक रूपाने काळ्या वा कधी पूर्णतः काळ्या (रोहिणीषु-च) आणि कधी चंद्रप्रकाशाने उज्वल अशा (परुष्णीषु) कृष्ण-पक्ष व शुक्ल पक्षातील रात्रीत (एतत्) हे सर्वांना दिसून येणारे (रुशत्) चमचमणारे (पयः) दवबिंदुरूप जल (अधारयः) आपणच घातले आहे.।।१।।
भावार्थ - हे त्या परमेश्वराचेच कौशल्य आहे की त्याने विविध रंगाच्या गायीच्या स्तनात दूध दिले आहे, नद्यात स्वच्छ जल आणि शरीरस्थ नाड्यांमधे निळे व लाल रक्त तसेच कृष्णपक्ष व शुक्त पक्षाच्या रात्रीत दवबिंदूचे जल उत्पन्न केले आहे.।।१।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे.।।१।।