Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 599
ऋषिः - प्रथो वासिष्ठः
देवता - विश्वे देवाः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0
प्र꣡थ꣢श्च꣣ य꣡स्य꣢ स꣣प्र꣡थ꣢श्च꣣ ना꣡मानु꣢꣯ष्टुभस्य ह꣣वि꣡षो꣢ ह꣣वि꣢र्यत् । धा꣣तु꣡र्द्युता꣢꣯नात्सवि꣣तु꣢श्च꣣ वि꣡ष्णो꣢ रथन्त꣣र꣡मा ज꣢꣯भारा꣣ व꣡सि꣢ष्ठः ॥५९९॥
स्वर सहित पद पाठप्र꣡थः꣢꣯ । च꣣ । य꣡स्य꣢꣯ । स꣣प्र꣡थः꣢ । स꣣ । प्र꣡थः꣢꣯ । च꣣ । ना꣡म꣢꣯ । आ꣡नु꣢꣯ष्टुभस्य । आ꣡नु꣢꣯ । स्तु꣣भस्य । हवि꣡षः꣢ । ह꣣विः꣢ । यत् । धा꣣तुः꣢ । द्यु꣡ता꣢꣯नात् । स꣣वितुः꣢ । च꣣ । वि꣡ष्णोः꣢꣯ । र꣣थन्तर꣢म् । र꣣थम् । तर꣢म् । आ । ज꣣भार । व꣡सि꣢꣯ष्ठः ॥५९९॥
स्वर रहित मन्त्र
प्रथश्च यस्य सप्रथश्च नामानुष्टुभस्य हविषो हविर्यत् । धातुर्द्युतानात्सवितुश्च विष्णो रथन्तरमा जभारा वसिष्ठः ॥५९९॥
स्वर रहित पद पाठ
प्रथः । च । यस्य । सप्रथः । स । प्रथः । च । नाम । आनुष्टुभस्य । आनु । स्तुभस्य । हविषः । हविः । यत् । धातुः । द्युतानात् । सवितुः । च । विष्णोः । रथन्तरम् । रथम् । तरम् । आ । जभार । वसिष्ठः ॥५९९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 599
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 2;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 2; मन्त्र » 5
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 2;
Acknowledgment
विषय - विश्वेदेवाः देवता। धाता, सविता, विष्णु, या नावाने परमेश्वराचे स्मरण-
शब्दार्थ -
(यस्य) ज्या परमेश्वराचे (प्रयःच सप्रथःच) सर्वत्र प्रख्यात असल्यामुळे (नाम) नाव आहे ‘प्रण्य’ आणि सर्वत्र व्यापक असल्यामुळे ज्याचे नाव आहे ‘सप्रथ, तसेच (यत्) जो (आनु ष्टु भस्य) अनुष्टुप् छंदातील मंत्राद्वारे दिल्या जाणाऱ्या (हलिषः) उपासकांच्या आत्मसमर्पणरूप दृष्टीचा केंद्र आहे, त्या (द्युतानात्) द्योतमान आणि (धातुः) संपूर्ण जगाचे धारण करणाऱ्या (सवितृःच) आणि अगदुत्पादक (विष्णोः) सर्वव्यापक परमेश्वराकडून (वसिष्ठः) अत्यंत वसुयुक्त म्हणजे विद्या, विनय आदी धनांने संपन्न असलेला विद्वान मनुष्य (रथन्तरम्) आत्मा, मन, बुद्धी, प्राण, इंद्रियें आदीद्वारे अधिष्ठित शरीररूप रथाने संसार-मार्ग आक्रमित करण्याचे जे साधन ते ब्रह्मवर्चस् (आ जभार) प्राप्त करू शकतो वा करतो.।।५।।
‘साममचे एक नाव आहे इथन्तर. हे साम वसिष्ठ ऋषीद्वारे दृष्ट अभि त्वा शूर नोनु मोऽदुग्धा इव धेनवः (साम२३३)
आदी ऋचांच्या अघोर या त्यावर गायिले जाते.।।२।।
भावार्थ - साधकांद्वारे वा योगीजनाद्वारे ध्यान केलेला परमेश्वर त्यांना असे शक्तिमान ब्रह्मवर्चस् (तेज) प्रदान करतो की ज्याच्या साह्याने ते साधक विषयभोगाच्या चिखलात रूतून बसत नाही आणि मन, बुद्धी, प्राण, इंद्रिये, आत्मा वशरीर यांद्वारे मोक्ष-साध कर्म करीत वा भवसागरास पार करून पर ब्रह्म्याला प्राप्त करू शकतो.।।५।।
विशेष -
या मंत्रातील ‘प्रथश्च’ आणि ‘हवि’ या शब्दांचा आवृत्तीत यमक अलंकार तसेच उत्तरार्धात ‘त’ व ‘र’ च्या आवृत्तीमुळे वृत्त्यनुप्रास अलंकार आहे.।।५।।