Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 600
ऋषिः - गृत्समदः शौनकः देवता - वायुः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0

नि꣣यु꣡त्वा꣢꣯न्वाय꣣वा꣡ ग꣢ह्य꣣य꣢ꣳ शु꣣क्रो꣡ अ꣢यामि ते । ग꣡न्ता꣢सि सुन्व꣣तो꣢ गृ꣣ह꣢म् ॥६००॥

स्वर सहित पद पाठ

नि꣣यु꣡त्वा꣢न् । नि꣣ । यु꣡त्वा꣢꣯न् । वा꣣यो । आ꣢ । ग꣣हि । अय꣢म् । शु꣣क्रः꣢ । अ꣣यामि । ते । ग꣡न्ता꣢꣯ । अ꣣सि । सुन्वतः꣢ । गृ꣣ह꣢म् ॥६००॥


स्वर रहित मन्त्र

नियुत्वान्वायवा गह्ययꣳ शुक्रो अयामि ते । गन्तासि सुन्वतो गृहम् ॥६००॥


स्वर रहित पद पाठ

नियुत्वान् । नि । युत्वान् । वायो । आ । गहि । अयम् । शुक्रः । अयामि । ते । गन्ता । असि । सुन्वतः । गृहम् ॥६००॥

सामवेद - मन्त्र संख्या : 600
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 2; मन्त्र » 6
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(वायो) वायूप्रमाणे अनंत शक्तिमान वा सर्वांना शुद्ध करणाऱ्या, सर्वांचा जीवनाधार हे प्राणप्रिय परमेश्वरा, (नियुत्वान्) सर्वांना नियंत्रणात ठेवण्याचे व सर्वांचे नियोजन करण्याचे सामर्थ्य तुझ्या ठिकाणी आहे, त्यामुळे (आगहि) मला नियंत्रित करण्यासाठी आणि मला सत्कर्मांत नियुक्त करण्यासाठी तू माझ्या हृदवाल ये. (अयम्) हा (शुक्रः) पवित्र व प्रदीप्त ज्ञान, कर्म आणि भक्तिरूप सोमरस (अयामि) मी तुझ्यासाठी अर्पित करीत आहे. तू (सुन्वतः) ज्ञान, कर्म आणि भक्ति यांद्वारे यज्ञ करणाऱ्या यजमानाच्या (ज्ञानी, कर्मशील व भक्तिपरायण उपासकाच्या) (गृहम्) हृदयरूप घरात (गन्ता) जाणारा (असि) आहेस.।।६।।

भावार्थ - ज्ञानयज्ञ, कर्मयज्ञ आणि भक्तियज्ञ यामधे सम्मिलित होऊनच परमात्म्याची कृपा प्राप्त करता येते.।।६।।

इस भाष्य को एडिट करें
Top