Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 621
ऋषिः - नारायणः देवता - पुरुषः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - आरण्यं काण्डम्
0

त꣡तो꣢ वि꣣रा꣡ड꣢जायत वि꣣रा꣢जो꣣ अ꣢धि꣣ पू꣡रु꣢षः । स꣢ जा꣣तो꣡ अत्य꣢꣯रिच्यत प꣣श्चा꣢꣫द्भूमि꣣म꣡थो꣢ पु꣣रः꣢ ॥६२१॥

स्वर सहित पद पाठ

त꣡तः꣢꣯ । वि꣣रा꣢ट् । वि꣣ । रा꣢ट् । अ꣣जायत । वि꣣रा꣢जः । वि꣣ । रा꣡जः꣢꣯ । अ꣡धि꣢꣯ । पू꣡रु꣢꣯षः । सः । जा꣣तः꣢ । अ꣡ति꣢꣯ । अ꣣रिच्यत । पश्चा꣢त् । भू꣡मि꣢꣯म् । अ꣡थ꣢꣯ । उ꣣ । पुरः꣢ ॥६२१॥


स्वर रहित मन्त्र

ततो विराडजायत विराजो अधि पूरुषः । स जातो अत्यरिच्यत पश्चाद्भूमिमथो पुरः ॥६२१॥


स्वर रहित पद पाठ

ततः । विराट् । वि । राट् । अजायत । विराजः । वि । राजः । अधि । पूरुषः । सः । जातः । अति । अरिच्यत । पश्चात् । भूमिम् । अथ । उ । पुरः ॥६२१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 621
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 3; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 6; खण्ड » 4;
Acknowledgment

शब्दार्थ -
पुरुष परमेश्वरापासून (विराट्) विशेषत्वाने देदीप्यमान पिंड (अजायत) उत्पन्न झाला. (नीहारिक असे आधुनिक नाव आहे) तो (पुरुषः) सर्वत्र परिपूर्ण परमेश्वरच (विराजः अधि) त्या विशेष दीप्तिमान पिण्डाचा अधिष्ठातं होता. (जातः स्ः) तो उत्पन्न झालेला पिंड पुन्हा (अत्यरिच्यत) भूमी आदी खंडांमधे विभाजित झाला. तो परमेश्वर मात्र (भूमिम्) पृथ्वी आदी लोकांच्या उत्पत्ती (पश्चात्) नंतर (अथ उ) आणि (पुरः) त्याच्या उत्पत्तिपूर्वीही विद्यमान होता (व आजही आहे) ।।७।।

भावार्थ - आमच्या सौरमंडळाचा जन्म कसा झाला, हे या मंत्रात वर्णिले आहे. अगदी प्रारंभी विशाल नीहारिकेच्या रूपात एका देदीप्यमान पिंडाची उत्पत्ती झाली. ती आकाशात वेगाने फिरत असल्यामुळे त्याचे अनेक तुकडे होऊन वेगळे भाग झाले. उरलेला मुख्य भाग सूर्य झाला आणि त्यापासून तुकडे रूपात भिन्न झालेले अनेक भाग भूमी, बुध, मंगळ, गुरू आदी ग्रह-उपग्रह झाले. याच पद्धतीने अन्य अनेक सौरमंडळांची उत्पत्ती झाली, असे जाणावे. हा सर्व विस्तार, विकास परमात्म्याच्या अधिष्ठातृत्वाखाली संपन्न झाला.।।७।।

इस भाष्य को एडिट करें
Top