Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 63
ऋषिः - श्यावाश्वो वामदेवो वा
देवता - अग्निः
छन्दः - त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
काण्ड नाम - आग्नेयं काण्डम्
0
आ꣡ जु꣢होता ह꣣वि꣡षा꣢ मर्जय꣣ध्वं नि꣡ होता꣢꣯रं गृ꣣ह꣡प꣢तिं दधिध्वम् । इ꣣ड꣢स्प꣣दे꣡ नम꣢꣯सा रा꣣त꣡ह꣢व्यꣳ सप꣣र्य꣡ता꣢ यज꣣तं꣢ प꣣꣬स्त्या꣢꣯नाम् ॥६३
स्वर सहित पद पाठआ꣢ । जु꣣होत । हवि꣡षा꣢ । म꣣र्जयध्वम् । नि꣢ । हो꣡ता꣢꣯रम् । गृ꣣ह꣡प꣢तिम् । गृ꣣ह꣢ । प꣣तिम् । दधिध्वम् । इडः꣢ । प꣣दे꣢ । न꣡म꣢꣯सा । रा꣣त꣡ह꣢व्यम् । रा꣣त । ह꣣व्यम् । सपर्य꣡त꣢ । य꣣जत꣢म् । प꣣स्त्या꣢꣯नाम् ॥६३॥
स्वर रहित मन्त्र
आ जुहोता हविषा मर्जयध्वं नि होतारं गृहपतिं दधिध्वम् । इडस्पदे नमसा रातहव्यꣳ सपर्यता यजतं पस्त्यानाम् ॥६३
स्वर रहित पद पाठ
आ । जुहोत । हविषा । मर्जयध्वम् । नि । होतारम् । गृहपतिम् । गृह । पतिम् । दधिध्वम् । इडः । पदे । नमसा । रातहव्यम् । रात । हव्यम् । सपर्यत । यजतम् । पस्त्यानाम् ॥६३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 63
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - प्रथम मंत्रात सांगत आहेत की सर्वांनी परमेश्वराचे ध्यान व पूजन केले पाहिजे.
शब्दार्थ -
हे स्तोतागणहो तुम्ही (हविषा) आत्मसमर्पणरूप हवीद्वारे (आजुहोत) परमात्मरूप अग्नीत अग्हित्र करा. आणि (भर्जयध्वय्) आपल्या आत्म्यास शुद्ध करून घ्या. अलंकृत करा. (होत्मरम्) यज्ञाचे फळ देणाऱ्या (गृहपतिम्) शरीररूप घराचे रक्षक त्या परमात्म अग्नीला (निदधिध्वम्) हृदयी धारण करा. म्हणजे निरंतर त्याचे ध्यान करा. (शतहव्यम्) देण्यास योग्य म्हणजे आम्हास आवश्यक त्या ते सांसारीक पदार्थ आणि सद्गुण देणाऱ्या (पस्त्यानाम्) प्रजाजनांतर्फे (यजतम्) प्रजनीय त्या परमात्म अग्नीचे (इड. पदे) हृदयरूप यज्ञवेदीस्था (नमसा) नमस्काराद्वारे (सपर्यत) पूजन करा. (त्याचे ध्यान धरा.) ।।१।।
भावार्थ - आत्मकल्याणाचे इच्छुक मनुष्यांनी आपल्या आत्म्यास परमात्मरूप अग्नीला समर्पित करून आत्मशुद्धी केली पाहिजे. ।।१।।
विशेष -
या मंत्रात आजुहोत, मर्जयध्वम्, निदधिध्वम्, सपर्यत या अनेक क्रियांचा एकच कर्ता असल्यामुळे येथे दीपक अलंकार आहे.