Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 666
ऋषिः - इरिम्बिठिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम -
0
आ꣡ या꣢हि सुषु꣣मा꣢꣫ हि त꣣ इ꣢न्द्र꣣ सो꣢मं꣣ पि꣡बा꣢ इ꣣म꣢म् । एदं꣢꣫ ब꣣र्हिः꣡ स꣢दो꣣ म꣡म꣢ ॥६६६॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । याहि꣣ । सुषुम꣢ । हि । ते꣢ । इ꣡न्द्र꣢꣯ । सो꣡मम्꣢꣯ । पिब । इ꣡म꣢꣯म् । आ । इ꣣द꣢म् । ब꣣र्हिः꣢ । स꣣दः । म꣡म꣢꣯ ॥६६६॥
स्वर रहित मन्त्र
आ याहि सुषुमा हि त इन्द्र सोमं पिबा इमम् । एदं बर्हिः सदो मम ॥६६६॥
स्वर रहित पद पाठ
आ । याहि । सुषुम । हि । ते । इन्द्र । सोमम् । पिब । इमम् । आ । इदम् । बर्हिः । सदः । मम ॥६६६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 666
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 6; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 2; सूक्त » 3; मन्त्र » 1
Acknowledgment
विषय - प्रथम ऋचेची व्याख्या पूर्वाचिक भागात मंत्र क्र. १९१ वर केली आहे. ती व्याख्या तीन अर्थ असणारी आहे.. परमात्मपर, राजापर आणि आचार्यपर. आता जीवात्म्याविषयी व्याख्या केली जात आहे.
शब्दार्थ -
हे (इन्द्र) माझ्या अंत:करणा, तू (आयाहि) ये (तू यत्रतत्र भरकटू नकोस. स्थिर रहा) पहा, आम्ही (ते) तुझ्यासाठी (सोमम्) ज्ञशनरूप रस (सुषुम्) नेत्र, कर्ण आदी ज्ञानप्राप्तीच्या साधनांद्वारे पिकून तयार केला आहे. तू हा ज्ञानरस (पिव) पी म्हणजे ज्ञानेंद्रियाद्वारे प्राप्त ज्ञानावर मनन कर. ध्यानात असू दे की तू (इदम्) या (मम) माझ्या (बर्हि:) हृदयासनावर (आरूढ:) बसलेला आहेस ।।१।।
भावार्थ - माणसाने मनाच्या माध्यमातून ज्ञानेंन्द्रियांद्वारे ज्ञान मिळवावे आणि त्या ज्ञानाविषयी चिंतन, मनन, निदिध्यासन आदी उपायाने त्या ज्ञानाचा पूर्ण साक्षात्कार करावा ।।१।।
विशेष -
हा एका साधकाचा आत्म्याशी झालेला संवाद आहे.