Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 687
ऋषिः - कलिः प्रागाथः देवता - इन्द्रः छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती) स्वरः - मध्यमः काण्ड नाम -
0

त꣡रो꣢भिर्वो वि꣣द꣡द्व꣢सु꣣मि꣡न्द्र꣢ꣳ स꣣बा꣡ध꣢ ऊ꣣त꣡ये꣢ । बृ꣣ह꣡द्गाय꣢꣯न्तः सु꣣त꣡सो꣢मे अध्व꣣रे꣢ हु꣣वे꣢꣫ भरं꣣ न꣢ का꣣रि꣡ण꣢म् ॥६८७॥

स्वर सहित पद पाठ

त꣡रो꣢꣯भिः । वः꣣ । विद꣡द्व꣢सुम् । वि꣣द꣢त् । व꣣सुम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । स꣡बा꣢꣯धः । स꣣ । बा꣡धः꣢꣯ । ऊ꣡त꣡ये꣢ । बृ꣡ह꣢त् । गा꣡य꣢꣯न्तः । सु꣣त꣡सो꣢मे । सु꣡त꣢ । सो꣣मे । अध्वरे꣢ । हु꣣वे꣢ । भ꣡र꣢꣯म् । न । का꣣रि꣡ण꣢म् ॥६८७॥


स्वर रहित मन्त्र

तरोभिर्वो विदद्वसुमिन्द्रꣳ सबाध ऊतये । बृहद्गायन्तः सुतसोमे अध्वरे हुवे भरं न कारिणम् ॥६८७॥


स्वर रहित पद पाठ

तरोभिः । वः । विदद्वसुम् । विदत् । वसुम् । इन्द्रम् । सबाधः । स । बाधः । ऊतये । बृहत् । गायन्तः । सुतसोमे । सुत । सोमे । अध्वरे । हुवे । भरम् । न । कारिणम् ॥६८७॥

सामवेद - मन्त्र संख्या : 687
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 14; मन्त्र » 1
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 4; मन्त्र » 1
Acknowledgment

शब्दार्थ -
(एक वेदज्ञ विद्वान मनुष्यांना सांगत आहे हे मनुष्यांनो, (सबाध:) जेव्हा तुम्ही अविद्यारूप बाधेने पीडित होता, तेव्हा (व:) तुम्ही (ऊतये) रक्षणासाठी अथवा मार्गदर्शनाद्वारे बाधा दूर करण्याचे उपाय शोधण्यासाठी (तरोभि:) अत्यंत वेगवान व कुशाग्र बुद्धीमान आणि (विददुसुम्) ब्रह्मविद्यारूप धन देणाऱ्या (इन्द्रम्) आचार्याचे (बृहत्) अत्यधिक (गायन्त:) महिमा गान करा (तो तुमची अविद्या बाधा दूर करील) मी (एक वेदज्ञ विद्वान) देखील (सुतसोमे) ज्यात विद्यारसाचे निष्पादन होते, त्या (अध्वरे) विद्या यज्ञात सहभागी होतो आणि प्रज्ञानी आचार्याकडे जातो. कशाप्रकारे ? जसे (भरं न) आपल्या परिवाराचे भरणपोषण पालन करणारा गृहस्वामी पालन कार्यासाठी धावपळ करतो, तसे मीदेखील ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी (कारिणम्) कर्मयोगी आचार्यालाच (हुवे) हाक मारतो. त्यांच्याकडे जातो ।।१।।

भावार्थ - ब्रह्म साक्षात्कार प्राप्त करण्यासाठी मनुष्यांनी योग्य गुरुचा आश्रय घेतला पाहिजे. पण तो गुरू स्वत: ब्रह्म साक्षात्कार झालेला असावा, हे महत्त्वाचे आहे. ।।१।।

इस भाष्य को एडिट करें
Top