Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 686
ऋषिः - नोधा गौतमः
देवता - इन्द्रः
छन्दः - प्रगाथः(विषमा बृहती समा सतोबृहती)
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम -
0
द्यु꣣क्ष꣢ꣳ सु꣣दा꣢नुं꣣ त꣡वि꣢षीभि꣣रा꣡वृ꣢तं गि꣣रिं꣡ न पु꣢꣯रु꣣भो꣡ज꣢सम् । क्षु꣣म꣢न्तं꣣ वा꣡ज꣢ꣳ श꣣ति꣡न꣢ꣳ सह꣣स्रि꣡णं꣢ म꣣क्षू꣡ गोम꣢꣯न्तमीमहे ॥६८६॥
स्वर सहित पद पाठद्यु꣣क्ष꣢म् । द्यु꣣ । क्ष꣢म् । सु꣣दा꣡नु꣢म् । सु꣣ । दा꣡नु꣢꣯म् । त꣡वि꣢꣯षीभीः । आ꣡वृ꣢꣯तम् । आ । वृ꣣तम् । गिरि꣢म् । न । पु꣣रुभो꣡ज꣢सम् । पु꣣रु । भो꣡ज꣢꣯सम् । क्षु꣣म꣡न्त꣢म् । वा꣡ज꣢꣯म् । श꣢ति꣡न꣢म् । स꣣हस्रि꣡ण꣢म् । म꣣क्षू꣢ । गो꣡म꣢꣯न्तम् । ई꣣महे ॥६८६॥
स्वर रहित मन्त्र
द्युक्षꣳ सुदानुं तविषीभिरावृतं गिरिं न पुरुभोजसम् । क्षुमन्तं वाजꣳ शतिनꣳ सहस्रिणं मक्षू गोमन्तमीमहे ॥६८६॥
स्वर रहित पद पाठ
द्युक्षम् । द्यु । क्षम् । सुदानुम् । सु । दानुम् । तविषीभीः । आवृतम् । आ । वृतम् । गिरिम् । न । पुरुभोजसम् । पुरु । भोजसम् । क्षुमन्तम् । वाजम् । शतिनम् । सहस्रिणम् । मक्षू । गोमन्तम् । ईमहे ॥६८६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 686
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 13; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 13; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 4; सूक्त » 3; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - आता परमेश्वराला प्रार्थना करीत आहोत. -
शब्दार्थ -
(भक्तगण प्रार्थना करीत आहेत) आम्ही त्या (घुक्षम्) अंतरात्म्यास तेज वा उत्साह देणाऱ्या तसेच (सुदानुम्) श्रेष्ठ दानी असलेल्या आणि (विषीभि आवृतम्) विविध शक्तींनी परिपूर्ण अशा इन्द्र परमेश्वराची प्रार्थना करीत आहोत. तो (गिरिन) पर्वताप्रमाणे व मेघाप्रमाणे (पुरूभोजसभृ) खूप खूप पालन करणारा आहे. म्हणजे जसे पर्वत आणि मेघ विविध औषधीद्वारे व जलाद्वारे सर्वांचे पालन करतात, तद्वत जड चेतन जगाचे पालन करणारा आहे. आम्ही (झुमन्तम्) अन्न भांडांराचे भांडारी अर्थात सर्वांना अन्न पाणी देणाऱ्या (शतिनम्) शेकडो ऐश्वर्यानी युक्त व (सहस्रिणम्) सहस्रगुणांनी युक्त तसेच (गोमन्तम्) गतीमान सूर्य, चंद्र, ग्रह, नक्षत्रादीचा स्वामी असलेल्या इन्द्र परमेश्वराकडे (मक्षु) लवकरात लवकर (वाजम्) अन्न, धन, ज्ञान, शक्ती, वे, सुख आधी देण्यासाठी (ईमहे) याचना करीत आहोत. ।।२।।
भावार्थ - सर्व मनुष्यांसाठी हेच हिताचे आहे की जो परमेश्वर सर्व विद्या आणि सर्व ऐश्वर्यांचा काप्य आहे सर्व मनुष्यांनी त्याची उपासना करून सर्व विद्या आणि सर्व भौतिक आणि आध्यात्मिक संपदा प्राप्त करावी. ।।२।।
विशेष -
या मंत्रात उपमा अलंकार आहे. ये प्रयुक्त जो क्षुमन्तम्, पुरूभोजसम् आदी विशेषणे आहेत, ती साभिप्राय व हेतुपुरस्सर वापरली आहेत. म्हणून येथे परिकर अलंकारही आहे. ।।२।।