Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 693
ऋषिः - गौरिवीतिः शाक्त्यः
देवता - पवमानः सोमः
छन्दः - काकुभः प्रगाथः (विषमा ककुप्, समा सतोबृहती)
स्वरः - पञ्चमः
काण्ड नाम -
0
य꣡स्य꣢ ते पी꣣त्वा꣡ वृ꣢ष꣣भो꣡ वृ꣢षा꣣य꣢ते꣣ऽस्य꣢ पी꣣त्वा꣢ स्व꣣र्वि꣡दः꣢ । स꣢ सु꣣प्र꣡के꣢तो अ꣣꣬भ्य꣢꣯क्रमी꣣दि꣢꣫षोऽच्छा꣣ वा꣢जं꣣ नै꣡त꣢शः ॥६९३॥
स्वर सहित पद पाठय꣡स्य꣢꣯ । ते꣣ । पीत्वा꣢ । वृ꣣षभः꣢ । वृ꣣षाय꣡ते꣢ । अ꣣स्य꣢ । पी꣣त्वा꣢ । स्व꣣र्वि꣡दः꣢ । स्वः꣣ । वि꣡दः꣢꣯ । सः । सु꣣प्र꣡के꣢तः । सु꣣ । प्र꣡के꣢꣯तः । अ꣣भि꣢ । अ꣣क्रमीत् । इ꣡षः । अ꣡च्छ꣢꣯ । वा꣡ज꣢꣯म् । न । ए꣡त꣢꣯शः ॥६९३॥
स्वर रहित मन्त्र
यस्य ते पीत्वा वृषभो वृषायतेऽस्य पीत्वा स्वर्विदः । स सुप्रकेतो अभ्यक्रमीदिषोऽच्छा वाजं नैतशः ॥६९३॥
स्वर रहित पद पाठ
यस्य । ते । पीत्वा । वृषभः । वृषायते । अस्य । पीत्वा । स्वर्विदः । स्वः । विदः । सः । सुप्रकेतः । सु । प्रकेतः । अभि । अक्रमीत् । इषः । अच्छ । वाजम् । न । एतशः ॥६९३॥
सामवेद - मन्त्र संख्या : 693
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 16; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » ; सूक्त » 16; मन्त्र » 2
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 1; खण्ड » 5; सूक्त » 2; मन्त्र » 2
Acknowledgment
विषय - आता परमेश्वराकडून मिळणाऱ्या शांतिरसाविषयी सांगत आहेत.
शब्दार्थ -
हे पवमान सोय हे पवित्रतादायक रसागार परमेश्वर, (दस्य ते) तुझा तो शांतिरस (पीत्वा) पिऊन (वृषभा) भगवंताला आपल्या भक्तिरसाने सिंचित करणारा उपासक (वृषायते) बरसणाऱ्या ढगाप्रमाणे आचरण करू लागतो म्हणजे ज्याप्रमाणे एक मेघ ऊन व उष्णतेने व्याकुळ झालेल्या भूमीवर वा लोकांवर शांतिदायक अशी वृष्टी करतो, त्याप्रमाणे तुझ्याकडून मिळणाऱ्या शांतिरसाने उपासक अशांत मनाला शांती व शीतलता देतो. (अस्थ) तुझ्या या शांतिरसाचे (पीत्वा) पान करून लोक वा उपासक (स्वर्विद:) मोक्षसुख प्राप्त करतात. (सुप्रकेत:) उत्कृष्ठ ज्ञानी (स:) तो तुमचा उपासक (इष:अभि) इच्छा सिद्धीच्या दिशेने (अक्रमित) पाऊल टाकतो. कशाप्रकारे? की (म) जसे (एतश:) एक घोडा (वाजम् अच्छ) रणभूमीकडे धावत जातो. ।।२।।
भावार्थ - एक भक्त परमेश्वराच्या उपासनेमुळे जशी शांती मिळवितो, तसा तो इतरांवरही शांततेची वृष्टी करतो. तसेच त्याचे धर्मानुकुल असलेले सर्व मनोरथ सफल होतात. ।।२।।
विशेष -
या मंत्रात ‘वृषभो वृषायते’ या कथनात आचार्य मम्मरच्या मताचा आधार घेतला तर वाचक लुप्तोपमा अलंकार आहे आणि दर्पणकार आचार्य विश्वनाथच्या मताचा आधार घेतल्यास धर्मलुप्तेपमा अलंकार आहे. वृष, वृथा मध्ये धेकानुप्रास आहे. उत्तरार्धात पूर्णोपमा आहे ।।२।।