Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 745
ऋषिः - शुनःशेप आजीगर्तिः देवता - इन्द्रः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम -
0

आ꣡ घा꣢ गम꣣द्य꣢दि꣣ श्र꣡व꣢त्सह꣣स्रि꣡णी꣢भिरू꣣ति꣡भिः꣢ । वा꣡जे꣢भि꣣रु꣡प꣢ नो꣣ ह꣡व꣢म् ॥७४५॥

स्वर सहित पद पाठ

आ । घ꣣ । गमत् । य꣡दि꣢꣯ । श्र꣡व꣢꣯त् । स꣣हस्री꣡णी꣢भिः । ऊ꣣ति꣡भिः꣢ । वा꣡जे꣢꣯भिः । उ꣡प꣢꣯ । नः꣣ । ह꣡वम्꣢꣯ ॥७४५॥


स्वर रहित मन्त्र

आ घा गमद्यदि श्रवत्सहस्रिणीभिरूतिभिः । वाजेभिरुप नो हवम् ॥७४५॥


स्वर रहित पद पाठ

आ । घ । गमत् । यदि । श्रवत् । सहस्रीणीभिः । ऊतिभिः । वाजेभिः । उप । नः । हवम् ॥७४५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 745
(कौथुम) उत्तरार्चिकः » प्रपाठक » 1; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » ; सूक्त » 11; मन्त्र » 3
(राणानीय) उत्तरार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 3; सूक्त » 3; मन्त्र » 3
Acknowledgment

शब्दार्थ -
प्रथम अर्थ (परमेश्वरपक्षी) त्या इन्द्र परमेश्वराने (सदि) जर (श्रवत्) आमचे आवाहन अथवा प्रार्थना ऐकली, तर त्याने (घ) अवश्यमेव (सहस्रिणिभि:) आपल्या हजारो (ऊतिभि:) रक्षण उपायांसह आणि (वाजेभि) त्याच्या शक्ती सामर्थ्यासह (न:) आमची (हवम्) हाक ऐकून (उप आ गमत्) आमच्याजवळ यावे (अशी आमची दृढ कामना आहे.) द्वितीय अर्थ : (गुरू शिष्याविषयी) - (य दि) जर या शिष्याने (श्रवत्) गुरु मुखातून शास्त्र ऐकले असतील (अर्थात) जर तो परिपूर्ण शिष्य झाला असेल तर तो हजारो विद्येमुळे प्राप्त समाधानासह तसेच (वाजेभि:) आत्मशक्तीसह (वा) आम्हा नागरिकांच्या (हवम्) उत्सव आदी समारंभामध्ये आम्ही दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून निश्चयाने (उप आ गमत्) आमच्याकडे येईल आणि आपल्या विद्वत्ताप्रचुर विचार ऐकवून आम्हाला कृतार्थ करील ।।३।।

भावार्थ - उपासकाच्या हृदयातून निघालेली हाक तो जगदीश्वर अवश्य ऐकतो. तसेच सुयोग्य आचार्याजवळ राहून गुरुकुलात राहून ज्या शिष्यांनी उत्तम ज्ञान संपादित केले असेल त्यांनी समावर्तय संस्कारानंतर म्हणजे शिक्षण पूर्ण करून आचार्यकुलातून बाहेर समाजात आल्यानंतर सर्व लोकांना उपदेशाद्वारे श्रेष्ठ मार्गाकडे जाण्यासाठी प्रवृत्त करावे ।।३।।

इस भाष्य को एडिट करें
Top