ऋग्वेद - मण्डल 10/ सूक्त 10/ मन्त्र 1
ऋषिः - यमी वैवस्वती
देवता - यमो वैवस्वतः
छन्दः - विराट्त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
ओ चि॒त्सखा॑यं स॒ख्या व॑वृत्यां ति॒रः पु॒रू चि॑दर्ण॒वं ज॑ग॒न्वान् । पि॒तुर्नपा॑त॒मा द॑धीत वे॒धा अधि॒ क्षमि॑ प्रत॒रं दीध्या॑नः ॥
स्वर सहित पद पाठओ इति॑ । चि॒त् । सखा॑यम् । स॒ख्या । व॒वृ॒त्या॒म् । ति॒रः । पु॒रु । चि॒त् । अ॒र्ण॒वम् । ज॒ग॒न्वान् । पि॒तुः । नपा॑तम् । आ । द॒धी॒त॒ । वे॒धाः । अधि॑ । क्षमि॑ । प्र॒ऽत॒रम् । दीध्या॑नः ॥
स्वर रहित मन्त्र
ओ चित्सखायं सख्या ववृत्यां तिरः पुरू चिदर्णवं जगन्वान् । पितुर्नपातमा दधीत वेधा अधि क्षमि प्रतरं दीध्यानः ॥
स्वर रहित पद पाठओ इति । चित् । सखायम् । सख्या । ववृत्याम् । तिरः । पुरु । चित् । अर्णवम् । जगन्वान् । पितुः । नपातम् । आ । दधीत । वेधाः । अधि । क्षमि । प्रऽतरम् । दीध्यानः ॥ १०.१०.१
ऋग्वेद - मण्डल » 10; सूक्त » 10; मन्त्र » 1
अष्टक » 7; अध्याय » 6; वर्ग » 6; मन्त्र » 1
अष्टक » 7; अध्याय » 6; वर्ग » 6; मन्त्र » 1
भावार्थ - सूर्योदय झाल्यावर दिवस पृथ्वीवर व रात्र खाली असते. गृहस्थाश्रमात पतीला नम्र होऊन पत्नीने याचना करावी व पितृऋणातून अनृण होण्यासाठी पुत्राची उत्पत्ती करावी. ॥१॥
टिप्पणी -
समीक्षा - या मंत्राचा सायणने जो अर्थ केलेला आहे. तो संदेह निवृत्तीसाठी समीक्षा दिली जात आहे. $ १. अत्रास्मिन सूक्ते वैवस्वतयोर्यमयम्यो: संवाद उच्यते-अस्यामृचि यमं प्रति यमी प्रौवाच-तिर:-अन्तर्हितम प्रकाशमानं निर्जन प्रदेशमित्यर्थ = विवस्वानची मुले-मुली यम यमीच्या या सूक्तात संवाद आहे. या ऋचेमध्ये यमाला यमीने म्हटले - अप्रकाशमान निर्जन प्रदेशा(ला गेली व यमाला म्हणू लागली) $ समीक्षा - येथे विवस्वान कोणी देहधारी मनुष्य आहे काय? ज्याचे यम-यमी संतानाची कथा वेद वर्णन करतो? वैदिक काळापूर्वी त्यांची उत्पत्ती झाली होती काय? किंवा अलंकार आहे? जसे नवीन लोक म्हणतात, की विवस्वान सूर्य आहे. त्याचा मुलगा दिवस व मुलगी रात्र आहे. असे जर मानतात तर तो अप्रकाशमात्र निर्जन देश कोणता आहे. जेथे रात्र गेली? $ २. ‘अर्णवं समुद्रैकदेशमंवान्तरद्वीपम्’ $ समीक्षा - येथे ‘अर्णवम्’चा अर्थ ‘अवान्तर द्वीपम्’ अत्यंत गौण लक्षणे मध्येच होऊ शकतो. $ ३. ‘जगन्वान गतवती यमी’ येथे जगन्वान् पुंल्लिंगला स्त्रीलिंगाचे विशेषण करणे शब्दाबरोबर बलात्कारच आहे. $ ४. ओववृत्याम् = आवर्त्तयामि = त्वत्संभोगं करोमि’ येथे ‘त्वत्संभोगं करोमि = तुझ्याशी संभोग करते’ हे म्हणणे व संभोगाची प्रार्थना करत जाणे हा किती विपरीत अर्थ आहे. $ ५. ‘पितु = आवयोर्भविष्यत: पुत्रस्य पितृभूतस्य तवार्थाय = आम्हा दोघांच्या होणाऱ्या पुत्राचा तुझ्या पितृरूपाच्या निमित्त’ हा अर्थ अत्यंत दु:साध्य व गौरवदोषयुक्त आहे. $ ६. ‘अधिक्षमि = अधि पृथिव्यां पृथिवी स्थानीयन भोदरे इत्यर्थ’ = पृथिवी स्थानीय नभोदरात’ द्वीपान्तरात स्थिती व नभोदरात गर्भाधान व्हावे, हे असंबंध आहे. $ ७. ‘पुत्रस्य जननार्थमावां ध्यायन्नादधीत प्रजापति: = पुत्रजननार्थ आम्हा दोघांवर लक्ष्य ठेवून प्रजापतीने गर्भाधान करावे’ किती असंगति आहे- प्रस्ताव व प्रार्थना पतीला व आधान करावे प्रजापतीने ॥१॥