Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 167
ऋषिः - कुसीदी काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
आ꣡ तू न꣢꣯ इन्द्र क्षु꣣म꣡न्तं꣢ चि꣣त्रं꣢ ग्रा꣣भ꣡ꣳ सं गृ꣢꣯भाय । म꣣हाहस्ती꣡ दक्षि꣢꣯णेन ॥१६७॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । तु । नः꣢ । इन्द्र । क्षुम꣡न्त꣢म् । चि꣣त्र꣢म् । ग्रा꣣भ꣢म् । सम् । गृ꣣भाय । महाहस्ती꣢ । म꣣हा । हस्ती꣢ । द꣡क्षि꣢꣯णेन ॥१६७॥
स्वर रहित मन्त्र
आ तू न इन्द्र क्षुमन्तं चित्रं ग्राभꣳ सं गृभाय । महाहस्ती दक्षिणेन ॥१६७॥
स्वर रहित पद पाठ
आ । तु । नः । इन्द्र । क्षुमन्तम् । चित्रम् । ग्राभम् । सम् । गृभाय । महाहस्ती । महा । हस्ती । दक्षिणेन ॥१६७॥
सामवेद - मन्त्र संख्या : 167
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - पुढे परमेश्वराला आणि राजाला प्रार्थना केली आहे -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (राजापर) - हे (इन्द्र) परम ऐश्वर्यशाली राजा, (महाहस्ती) विशाल सोंड असलेल्या हत्तीप्रमाणे तुझ्या भुजा विशाल असून (तु) त्वरित (दक्षिणेन) उजव्या हाताने (नः) आमच्यासाठी म्हणजे आम्हाला दान देण्यासाठी (क्षुमन्तम्) भरपूर अन्न धान्यादीनी भरलेले (चित्रम्) अद्भुत असे (ग्राभम्) धन (आ संगृराम) सर्वतः संग्रह कराव आम्हांस दान द्या।।
द्वितीय अर्थ (परमात्मपर) हे (इन्द्र) परमैश्वर्यशाली परमेश्वरा, (तु) तू लवकरच (नः) आम्हाला देण्यासाठी (क्षुमन्तम्) भौतिक धन, अन्न आदींनी संपन्न (चित्रम्) अद्भुत (ग्राभम्) ग्राह्य अध्यात्म संपत्ती वा आत्मिक शक्तीरूप धन (संगृ भाय) संग्रहीत करा (अथवा आपण हे भौतिक आमच्याभोवती वृक्ष, वनस्पती, जल, वायू आदी रूपाने भरून ठेवलेले आहेच. ज्याप्रमाणे (महाहस्ती) विशाल वाहू असलेला मनुष्य (दक्षिणेन) आपल्या उजव्या हाताने पदार्थांचा संग्रह करतो अथवा जसे (महाहस्ती) प्रशस्त किरणांचा स्वामी तेजस्वी सूर्य (दक्षिणेत) आपल्या समृद्ध किरण समूहरूप हातांनी भूमीवरील जलाचा संग्रह करतो अथवा (महाहस्ती) विशाल हत्ती (दक्षिणेन) आपल्या बलिष्ठ सोंडेने विविध पदार्थांचा संग्रह करतो (त्याप्रमाणे, हे परमेश्वरा, तू आम्हा उपासकांसाठी धन संपदेचा जो संग्रह तू आधीच सर्वत्र करून ठेवला आहेस, ते धन आम्हास प्राप्त व्हावे, असे कर. ।। ३।।
भावार्थ - परमेश्वराने आणि राजाने सर्व प्रजाजनांना पुरुषार्थाद्वारे प्रचुर धन- धान्य अजि४त करण्यास प्रेरणा द्यावी की ज्यायोगे सर्व जण धनसंपन्न, विद्यावन, धार्मिक व योगविद्याविशारद होतील ।। ३।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे. ‘महाहस्ती शब्दात लुप्तोपमा अलंकार आहे ।। ३।।