Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 168
ऋषिः - प्रियमेधः आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
अ꣣भि꣡ प्र गोप꣢꣯तिं गि꣣रे꣡न्द्र꣢मर्च꣣ य꣡था꣢ वि꣣दे꣢ । सू꣣नु꣢ꣳ स꣣त्य꣢स्य꣣ स꣡त्प꣢तिम् ॥१६८॥
स्वर सहित पद पाठअ꣣भि꣢ । प्र । गो꣡प꣢꣯तिम् । गो꣢ । प꣣तिम् । गिरा꣢ । इ꣡न्द्र꣢꣯म् । अ꣣र्च । य꣡था꣢꣯ । वि꣣दे꣢ । सू꣣नु꣢म् । स꣣त्य꣡स्य꣣ । स꣡त्प꣢꣯तिम् । सत् । प꣣तिम् ॥१६८॥
स्वर रहित मन्त्र
अभि प्र गोपतिं गिरेन्द्रमर्च यथा विदे । सूनुꣳ सत्यस्य सत्पतिम् ॥१६८॥
स्वर रहित पद पाठ
अभि । प्र । गोपतिम् । गो । पतिम् । गिरा । इन्द्रम् । अर्च । यथा । विदे । सूनुम् । सत्यस्य । सत्पतिम् । सत् । पतिम् ॥१६८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 168
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 4
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 6;
Acknowledgment
विषय - आता मनुष्यांना प्रेरणा केली आहे -
शब्दार्थ -
हे मनुष्य, तू (गोपतिम्) सूर्य, पृथ्वी आदी लोकांचे / अथवा राष्ट्रभूमीचे पालनकर्ता (सत्यस्य सूनुम्) सत्य ज्ञान / सत्य कर्माचे प्रेरक (सत्पतिम्) सज्जनांचे रक्षक आणि दुष्टांना दंड देणाऱ्या (इन्द्रम्) परमेश्वराची वा राजाची (अभि) उद्देशून (गिरा) आपल्या वाणीने (प्र अर्च) उत्तम प्रकारे सस्तुती कर म्हणजे यांच्या गुणकर्माचे वर्णन कर (तुझी स्तुती इतकी मनोभावे केलेली असावी की (यता) ज्यायोगे परमेश्वर व राजा तुझ्या स्तुतीला जाणून घेतील (म्हणजे तुझ्या भावना समजून घेतील) ।। ४।।
भावार्थ - मनुष्यासाठी हे हितकर आहे की त्यानी विविध गुण संपन्न परमेश्वर व राजाच्या गुण - कर्म- स्वभावाचे असे वर्णऩ करावे की ते त्याची नोंद घेतील. कारण असे की स्तोतव्य वा वंदनीय देवाची भक्ताने केलेली स्तुती तेव्हाच फलदायी होते, जेव्हा ती स्तुती देवाच्या अंतःकरणाचा ठाव घेते. ।। ४।।
विशेष -
या मंत्रात अर्थश्लेष अलंका आहे ।। ४।।