Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 185
ऋषिः - कण्वो घौरः
देवता - इन्द्रः
छन्दः - गायत्री
स्वरः - षड्जः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
य꣡ꣳ रक्ष꣢꣯न्ति꣣ प्र꣡चे꣢तसो꣣ व꣡रु꣢णो मि꣣त्रो꣡ अ꣢र्य꣣मा꣢ । न꣢ किः꣣ स꣡ द꣢भ्यते꣣ ज꣡नः꣢ ॥१८५॥
स्वर सहित पद पाठय꣢म् । र꣡क्ष꣢꣯न्ति । प्र꣡चे꣢꣯तसः । प्र । चे꣣तसः । व꣡रु꣢꣯णः । मि꣣त्रः꣢ । मि꣣ । त्रः꣢ । अ꣣र्यमा꣢ । न । किः꣣ । सः꣢ । द꣣भ्यते । ज꣡नः꣢꣯ ॥१८५॥
स्वर रहित मन्त्र
यꣳ रक्षन्ति प्रचेतसो वरुणो मित्रो अर्यमा । न किः स दभ्यते जनः ॥१८५॥
स्वर रहित पद पाठ
यम् । रक्षन्ति । प्रचेतसः । प्र । चेतसः । वरुणः । मित्रः । मि । त्रः । अर्यमा । न । किः । सः । दभ्यते । जनः ॥१८५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 185
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 2; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 5; मन्त्र » 1
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 2; खण्ड » 8;
Acknowledgment
विषय - या दशतीच्यारथम मंत्रात मित्र, वरूण आणि अर्थमा याविषयी सांगितले आहे -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (अध्यात्मपर) या ऋचेची देवता इन्द्र असल्यामुळे इन्द्राला संबोधित केले आहे. हे इन्द्र, हे माझी अंतरात्मा (यम्) ज्या मनुष्याच्या (प्रचेतसः) हृदयात सदैव जागृत असणारे (वरुणः) पाप - निवारण गुण (मित्रः) मैत्रीचे गुण आणि (अर्यमा) न्यायकारितेचे गुण (रक्षन्ति) त्याची सदैव रक्षा करतात, विपत्तींपासून त्याला वाचवतात आणि त्याचे पालन करतात (सः) तो (जनः) मनुष्य (नकिः) कधीही (दभ्यते) कोणाकडून पराजित वा हिंसित होत नाही.
(द्वितीय अर्थ) - (राष्ट्रपर) - ज्या राजाचा (प्रचेतसः) एक उदात्त चित्त अतिविज्ञत्रानवान व सदैव जागरूक असा (वरुणः) पाराधारी, शस्त्रास्त्रधारी, शत्रुपराजेता व्यक्ती सेनापती असतो, तसेच एक (मित्रः) देश- विदेशापर्यंत मैत्रीचा संदेश देणारा मैत्रीसचिव (विदेश मंत्री) असतो आणि एक (अर्यमा) निष्पक्ष न्यायाधीश (कायदा मंत्री) असतो व हे तिघे (यम्) ज्या राजाचे (ऱक्षन्ति) रक्षण करतात, (सः) तो (जनः) राजा (नकिः) कधीही कोणाकडून (दभ्यते) पराजित वा हिंसित होत नाही. ।। १।।
भावार्थ - सर्वांचे हे कर्तव्य आहे की त्यानी आपल्या हृदयात पाप- निवारण, मैत्री आणि न्याय हे सद्वुण धारण करावेत. तसेच राजाचेही कर्तव्य आहे की त्याने आपल्या राष्ट्रात सेनाध्य्क्ष, मैत्री सचिव आणि न्यायाधीश आदी विविध पदांवर सुयोग्य व्यक्तींनाच नेमावे. यामुळे राज्यात प्रजेचा उत्कर्ष होत राहील आणि शत्रूंचा विनाश होईल. ।। १।।
इस भाष्य को एडिट करें