Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 239
ऋषिः - मेधातिथिः काण्वः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
पि꣡बा꣢ सु꣣त꣡स्य꣢ र꣣सि꣢नो꣣ म꣡त्स्वा꣢ न इन्द्र꣣ गो꣡म꣢तः । आ꣣पि꣡र्नो꣢ बोधि सध꣣मा꣡द्ये꣢ वृ꣣धे꣢३ऽस्मा꣡ꣳ अ꣢वन्तु ते꣣ धि꣡यः꣢ ॥२३९॥
स्वर सहित पद पाठपि꣡बा꣢꣯ । सु꣣त꣡स्य꣢ । र꣣सि꣡नः꣢ । म꣡त्स्व꣢꣯ । नः꣣ । इन्द्र । गो꣡म꣢꣯तः । आ꣣पिः꣢ । नः꣣ । बोधि । सधमा꣡द्ये꣢ । स꣣ध । मा꣡द्ये꣢꣯ । वृ꣣धे꣢ । अ꣣स्मा꣢न् । अ꣣वन्तु । ते । धि꣡यः꣢꣯ ॥२३९॥
स्वर रहित मन्त्र
पिबा सुतस्य रसिनो मत्स्वा न इन्द्र गोमतः । आपिर्नो बोधि सधमाद्ये वृधे३ऽस्माꣳ अवन्तु ते धियः ॥२३९॥
स्वर रहित पद पाठ
पिबा । सुतस्य । रसिनः । मत्स्व । नः । इन्द्र । गोमतः । आपिः । नः । बोधि । सधमाद्ये । सध । माद्ये । वृधे । अस्मान् । अवन्तु । ते । धियः ॥२३९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 239
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 5; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - परमेश्वर आणि राजा आमची वृद्धी करोत
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (परमेश्वरपर) हे (इन्द्र) परमेश्वर, आपण (रसिनः) सरस (सुतस्य) आणि योग्य रीतीने निष्पादित भक्तिरभावरूप सोमरस (पिब) प्या (गोमतः) इन्द्रयांवर वश मिळविलेल्या आणि प्रशंसनीय वेदवाणीचा पाठ करणाऱ्या (नः) आम्हा उपासकांना (मत्स्व) आनंदित करा. (अधमाघे) ज्यात सर्व राष्ट्रांचे लोक मिळून आनंद प्राप्त करात अशा या विश्वयज्ञात (वृधे) बुद्धी वा प्रमतीकरिता (आपिः) आमचा बंधू (सहाय्यक) होऊन (नः) आम्हाला (बोधि) बोध प्रदान करा. (ते) तुमच्या (धियः) बुद्धी, ज्ञान व कर्म यांनी (अस्मान्) आमचे (अवन्तु) रक्षण करावे ( ही प्रार्थना)।।
द्वितीय अर्थ - (राजापर) - हे (इन्द्र) परमैश्वर्यशाली राजा, आपण (सुलस्य) योग्य पद्धतीने तयार केलेल्या या (रसिनः) सरस व स्वादिष्ट हा सोमरस (पिव) प्या. त्याने शक्तिशाली होऊन आपण (गोमतः) विशाल भू प्रदेशाचे स्वामी असलेल्या (नः) आम्हाला (मत्स्व) आनंदित करा. (आम्ही आपल्या स्वागतार्थ दिलेल्या सोमरसाचे पान केल्यामळे आपण वीरत्व व उत्साहाने परिपूर्ण व्हाल व त्यामुळे आम्हाला आनंद होईल) (सधमाघे) ज्यामध्ये सहभागी होऊन सर्व प्रजाजन सुखी आनंदित होतात, त्या राष्ट्र यज्ञात (वृधे) वृद्धी वा उन्नती प्राप्तीसाठी (आपिः) आपण आमचे बंधू होऊन आम्हा प्रजाजनांना (बोधि) सावध व चैतन्य करा. प्रेरक व्हा. (ते) तुमच्याजवळ असलेली (धियः) बुद्धी व सत्कर्मे राष्रोन्नतीच्या कार्यात (अस्मान्) आमचे (अधन्तु) रक्षण करतो.।।७।।
भावार्थ - परमेश्वराची कृपा आणि राजांचा पुरुषार्थ यांनीच राष्ट्राची उन्नती, प्रजेचे हित आणि विश्वशांती संभवनीय आहे.।।७।।
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंका आहे।।७।।