Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 281
ऋषिः - भरद्वाजो बार्हस्पत्यः
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
इ꣡न्द्रा꣢ग्नी अ꣣पा꣢दि꣣यं꣡ पूर्वागा꣢꣯त्प꣣द्व꣡ती꣢भ्यः । हि꣢त्वा꣡ शिरो꣢꣯ जि꣣ह्व꣢या꣣ रा꣡र꣢प꣣च्च꣡र꣢त्त्रि꣣ꣳश꣢त्प꣣दा꣡ न्य꣢क्रमीत् ॥२८१॥
स्वर सहित पद पाठइ꣡न्द्रा꣢꣯ग्नी । इ꣡न्द्र꣢꣯ । अ꣣ग्नीइ꣡ति꣢ । अ꣣पा꣢त् । अ꣣ । पा꣢त् । इ꣣य꣢म् । पू꣡र्वा꣢꣯ । आ । अ꣣गात् । पद्व꣡ती꣢भ्यः । हि꣣त्वा꣢ । शि꣡रः꣢꣯ । जि꣣ह्व꣡या꣢ । रा꣡र꣢꣯पत् । च꣡र꣢꣯त् । त्रिँ꣣श꣢त् । प꣣दा꣡नि꣢ । अ꣣क्रमीत् ॥२८१॥
स्वर रहित मन्त्र
इन्द्राग्नी अपादियं पूर्वागात्पद्वतीभ्यः । हित्वा शिरो जिह्वया रारपच्चरत्त्रिꣳशत्पदा न्यक्रमीत् ॥२८१॥
स्वर रहित पद पाठ
इन्द्राग्नी । इन्द्र । अग्नीइति । अपात् । अ । पात् । इयम् । पूर्वा । आ । अगात् । पद्वतीभ्यः । हित्वा । शिरः । जिह्वया । रारपत् । चरत् । त्रिँशत् । पदानि । अक्रमीत् ॥२८१॥
सामवेद - मन्त्र संख्या : 281
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 3; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 5;
Acknowledgment
विषय - पुढील मंत्रात इन्द्राग्नी देवता। प्रहेलिका (कोडे) रूपाने श्रद्धा, उषा आणि विद्युत आदीचे वर्णन केले आहे -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (श्रद्धापरक) - हे (इन्द्राग्नी) परमात्मा आणि हे जीवात्मा, तुमच्या साहचर्यामुळे (अपात्) पाय नसताना देखील (इयम्) ही पूर्व मंत्रात वर्णिलेली श्रद्धा (पद्थीभ्यः) पाय असलेल्या लोकांपेक्षा (पूर्वा) आधी (आ अगात्) आली आहे. (माणूस पायाने चालत कुठे तरी जातो पण ही श्रद्धा भावना हृदयातच त्वरित प्रकट ोहते.) तसेच (शिरः) मस्तक (हित्वा) सोडूनदेखील म्हणजे मस्तकारहित असूनही ही (जिहृया) जिव्हासम असलेल्या आपल्या प्रथेमुळे (रारपत्) पुन्हा पुन्हा जागरणाचा संदेश देत (चरत्) अत्र-तत्र विचरण करीत आहे (श्रद्धेला शरीर नसते, पण ती माणसाला ध्येय प्राप्तीसाठी सतत प्रेरित करीत असते). ही (त्रिंशत् पदावि) शरीरस्य दहा इंद्रिये, दहा प्राण, पाच कोष आणि आल्यासह अहंकार चतुष्टय या तीस स्थानांना (अक्रमीत्) व्याप्त करीत आहे.।।
द्वितीय अर्थ - (उषापर) - हे (इन्द्राग्नी) ब्राह्मणहो व क्षत्रियहो, (अपात्) पाय नसलेली (इयम्) ही उषा (पद्धतीभ्या) अशा लोकांपेक्षा (की जे हात-पाय असूनही आळशासारखे अंथरूणात लोळत असतात) (पूर्वा) त्यांच्या आधीच जागृत होऊन (इथे पूर्व दिशेत) प्रकट झाली आहे. ही उषा (शिरः) (हित्वा) डोके सोडून देऊनदेखील म्हणजे मस्तक नसतानाही (जिहृमा) आपल्या जिव्हा सदृश लाल - लाल प्रथेमुळे (रारपत्) सर्वांना जागरणाचा संदेश देत (चरत्) दिशांतामध्ये विचरण करीत आहे. ही (त्रिंशत् पदानि) दिवस- रात्रीचे तीस प्रहर पार करून आली आहे, म्हणजे एक रात्र व एक दिवसानंतर पुन्हा उषेचे आगमन होत असते.।।
तृतीय अर्थ - (विद्युतपर) हे (इन्द्राग्नी) राजा आणि हे प्रजाजनहो, पहा, (अपात्) पाय नसलेली (इयम्) ही विद्युत (पद्धतीभ्यः) पाय असलेले मनुष्य, पशू आदी प्राण्यांच्या (पूर्वा) आधी म्हणजे अति तीव्र गतीने (आ अगात्) उपयोग करावा, यासाठी आमच्यापर्यत आली आहे. ही विद्युत (शिरः हित्वा) अस्तकाशिवाय देखील (जिहृया) आपल्या संदेशवाहक तारयंत्राद्वारे (रारपत्) संदेश प्रेषकाचा संदेश आम्हाला पुन्हा पुन्हा सांगत (चरत्) तारेद्वारे विचरण करीत आहे. ही (त्रभिंशत् पदानि) एका महिन्याच्या तीस दिवसांना व्यापून (अक्रमीत्) प्रकाश- प्रदान, संदेश-वहन, यंत्र चालम (यान चालन) आदी कार्यांमध्ये आपले पाय रोवून आहे म्हणजे ही कामे करीत आहे. ।। ९।।
भावार्थ - श्रद्धेमुळे माणसाची धर्माकडे प्रवृत्ती वाढते आणि वैयक्तिक व सामाजिक उन्नती होते. उषा सर्वांना जागरणाचा संदेश देत असते. विद्युतेमुळे रात्रीदेखील दिवसाप्रमाणे प्रकाश मिळतो आणि विजेद्वारेच दूरभाष यंत्र, आकाशवाणी मंत्र, एक्स रे यंत्र, वजन उचलणारे यंत्र, अस्त्र सोडण्याचे यंत्र आदी विविध मंत्रांचे संचालन होते तसेच स्थलमान, जलमानव व विमान चालविले जातात. अशा प्रकारे श्रद्धा, उषा व विद्युत सर्वांकरिता लाभकारी आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यापासून लाभ प्राप्त केले पाहिजेत. ।। ९।।
विशेष -
या मंत्रातील पाय नसतानादेखील पाय असलेल्या लोकापे७ा लवकर पोचते. ‘डोके नसूनही जिव्हेने बोलते’ या कथनात कारणाशिवाय कार्योत्पत्ती दाखविली आहे. यामुळे इथे ङ्गविभावनाफ अलंकार आहे. श्रद्धा, उषा, विद्युत आदींचा नामोल्लेख न करता संकेताद्वारे सूचित केले असल्यामुळे इथे ‘प्रहेलिका आहे. ।। ९।।