Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 295
ऋषिः - मेधातिथि0मेध्यातिथी काण्वौ विश्वामित्र इत्येके
देवता - इन्द्रः
छन्दः - बृहती
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
आ꣡ त्वा꣢३꣱द्य꣡ स꣢ब꣣र्दु꣡घा꣢ꣳ हु꣣वे꣡ गा꣢य꣣त्र꣡वे꣢पसम् । इ꣡न्द्रं꣢ धे꣣नु꣢ꣳ सु꣣दु꣢घा꣣म꣢न्या꣣मि꣡ष꣢मु꣣रु꣡धा꣢रामर꣣ङ्कृ꣡त꣢म् ॥२९५॥
स्वर सहित पद पाठआ꣢ । तु । अ꣣द्य꣢ । अ꣣ । द्य꣢ । स꣣ब꣡र्दुघाम् । स꣣बः । दु꣡घा꣢꣯म् । हु꣣वे꣢ । गा꣣यत्र꣡वे꣢पसम् । गा꣣यत्र꣢ । वे꣣पसम् । इ꣡न्द्र꣢꣯म् । धे꣣नु꣢म् । सु꣣दु꣡घा꣣म् । सु꣣ । दु꣡घा꣢꣯म् । अ꣡न्या꣢꣯म् । इ꣡ष꣢꣯म् । उ꣣रु꣡धा꣢राम् । उ꣣रु꣢ । धा꣣राम् । अरङ्कृ꣡त꣢म् । अ꣣रम् । कृ꣡त꣢꣯म् ॥२९५॥
स्वर रहित मन्त्र
आ त्वा३द्य सबर्दुघाꣳ हुवे गायत्रवेपसम् । इन्द्रं धेनुꣳ सुदुघामन्यामिषमुरुधारामरङ्कृतम् ॥२९५॥
स्वर रहित पद पाठ
आ । तु । अद्य । अ । द्य । सबर्दुघाम् । सबः । दुघाम् । हुवे । गायत्रवेपसम् । गायत्र । वेपसम् । इन्द्रम् । धेनुम् । सुदुघाम् । सु । दुघाम् । अन्याम् । इषम् । उरुधाराम् । उरु । धाराम् । अरङ्कृतम् । अरम् । कृतम् ॥२९५॥
सामवेद - मन्त्र संख्या : 295
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 3
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 3; खण्ड » 7;
Acknowledgment
विषय - इन्द्राची स्तुती - गायीच्या रूपाने
शब्दार्थ -
(अघ) आज (तु) त्वरित (सर्वदुघाम्) ज्ञानरूप दूध देणाऱ्या, (गायत्र - वेपसम्) ज्याच्या कर्मांचे सर्व मान वा स्तुती होत आहे, त्या (सुदुघाम्) पूर्णत्वेन कामना पूर्ण करणाऱ्या (अन्याम्) विलक्षण आणि (इषम्) वांछनीय वा सर्वांना अति पिय तसेच (ऊरुधाराम्) मोठ मोठ्या धारेने ज्ञानरूप दूध देणाऱ्या (अरंकृतम्) अलंकृत करणाऱ्या अशा (इन्द्रं धेतुं) परमेश्वररूप गायीला मी (आहुवे) बोलावीत आहे. (हृदयात त्याने ध्यान जागृत करीत आहे.) ।। ३।।
भावार्थ - जसे गाय दूध देते, तसेच परमेश्वर ज्ञानरूप रस देतो. गी आणि परमेश्वर या दोघ्यांचे जे यज्ञ- साधकत्व रूप कर्म आहे, त्याचे गान वा त्याची स्तुती केली जाते. दोघेही मनोरत पूर्ण करणारे आहेत. गौ अनेक बाबतीत अन्य पशूपेक्षा विलक्षण आहे, तर परमेश्वर अन्य चेतन- अचेतन पदार्थांपेक्षा विलक्षण आहे. गौ दुधाच्या जाड- जाड धारांद्वारे लोकांना आनंदित करते, तर परमेश्वर आनंदाची धाराधार वृष्टी करतो. गाय पोषण व आरोग्य देऊन मनुष्यांना शोभिवंत करते, तर परमेश्वर उपासकाला मनोबल देऊन यशस्वी करतो. अशा प्रकारे दोघांमध्ये साम्य असल्या कारणाने परमेश्वराची गायीप्रमाणेच सेवा व पूजा करणे उचित आहे. ।। ३।।
विशेष -
या मंत्रात परमेश्वरावर गायीचा आरोप असल्यामुळे रूपक अलंकार आहे. ।। ३।।