Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 358
ऋषिः - वामदेवो गौतमः
देवता - दधिक्रा
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
द꣣धिक्रा꣡व्णो꣢ अकारिषं जि꣣ष्णो꣡रश्व꣢꣯स्य वा꣣जि꣡नः꣢ । सु꣣रभि꣢ नो꣣ मु꣡खा꣢ कर꣣त्प्र꣢ न꣣ आ꣡यू꣢ꣳषि तारिषत् ॥३५८॥
स्वर सहित पद पाठद꣣धिक्रा꣡व्णः꣢ । द꣣धि । क्रा꣡व्णः꣢꣯ । अ꣣कारिषम् । जिष्णोः꣢ । अ꣡श्व꣢꣯स्य । वा꣣जि꣡नः꣢ । सु꣣रभि꣢ । सु꣣ । रभि꣢ । नः꣣ । मु꣡खा꣢꣯ । मु । खा꣣ । करत् । प्र꣢ । नः꣢ । आ꣡यूँ꣢꣯षि । ता꣣रिषत् ॥३५८॥
स्वर रहित मन्त्र
दधिक्राव्णो अकारिषं जिष्णोरश्वस्य वाजिनः । सुरभि नो मुखा करत्प्र न आयूꣳषि तारिषत् ॥३५८॥
स्वर रहित पद पाठ
दधिक्राव्णः । दधि । क्राव्णः । अकारिषम् । जिष्णोः । अश्वस्य । वाजिनः । सुरभि । सु । रभि । नः । मुखा । मु । खा । करत् । प्र । नः । आयूँषि । तारिषत् ॥३५८॥
सामवेद - मन्त्र संख्या : 358
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - मंत्राची देवता दधिक्रावा अग्नी, त्याची परमात्म्याची यज्ञाग्रीची व राजाची स्तुती -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (परमात्मपर अर्थ) मी (जिष्णोः) विजयशील आणि विजय प्रदान करणाऱ्या (अश्वस्य) सर्व शुभ गुणवान (वाजिनः) शक्ती व विज्ञानाने संपन्न अशा (दधिक्राव्णः) पृथ्वी, चंद्र, सूर्य, नक्षत्र आदी लोक त्यांच्या, त्यांच्या धुरीवर धारण अथवा कोणा अन्य ग्रह, पिंडाच्या भोवती परिक्रमित करणाऱ्या (परमेश्वराचा स्वागत करतो वा त्याचे आभार मानतो) अथवा (दधि क्राव्णः) स्तोत्र धारक, धर्म-धारक व सद्गुण- धारक लोकांना सद्गुण धारण करविणाऱ्या जगदीश्वराचे (अकारिषम्) स्वागत करतो. स्वागत - वचन व सत्काराचा स्वीकार करून तो जगदीश्वर (नः) आम्हा उपासकांचे मुख (सुरक्षि) सुवासित (करत) करा म्हणजे कटु-वचन, पर - निंदा आदीपासून दूर ठेवो तसेच मधुर भाण व सत्यभाषण रूप सौरभाने सुरभित करो आणि (नः) आमचे (आयूंषि) आयुष्य (९ तारिषत्) दीर्घ करो.।।
द्वितीय अर्थ - (यज्ञाग्नीपर अर्थ) - (जिष्णोः) रोग आदींवर विजय मिळविणाऱ्या व विजय संपादन करविणाऱ्या (अश्वस्य) शीघ्र पसरणाऱ्या आणि (वाजिनः) पौष्टिक हृव्य आदीद्वारे संपन्न (यज्ञाग्नीचा मी उपयोग करतो) (दधिक्राव्णः) हृवी पदार्थ स्वीकारून त्याचे रूपांतर करून पदार्थांना देशांतराला पोचविणाऱ्या त्या आवहनीय अग्नीचा मी (अकारिषम्) यज्ञाग्नीत उपयोग करतो. म्हणजे हृव्य पदार्थ अग्नीत टाकतो. तो यज्ञाग्नी (नः) आमचे मुख अर्थात नासिका प्रदेश (सुरभि) (करत्) सुगंधित करो आणि (नः) आमचे (आयूंषि) आयुष्य (प्रतारिषत्) वृद्धिंगत करो. यज्ञाग्नीने आम्हा यज्ञकर्त्यांचे आयुष्य वाढवावे, (ही प्रार्थना) तात्पर्य हे की नित्य नेमाने ़अग्निहोत्र करणारे आम्ही याज्ञिकजन दीर्घायु व्हावेत.।।
अग्नीत आहुत केलेल्या सुवासिक द्रव्याद्वारे सुगंधित झालेला वायू श्वास- प्रश्वास प्रक्रियेने फुफ्फुसापर्यंत जातो व तिथे रक्ताची शुद्धी करून रक्तात जीवनदायी तत्त्व समाविष्ट करतो. शिवाय रक्ताच्या मालिव्याचे हरण करून दोष बाहेर काढतो. वेदात सांगितलेले आहेच की ‘‘हे वायू, तू आपल्यासोबत औषधी शरीरात आण व त्यात जे मळ वा दोष असतील, त्यांना बाहेर घालव. तू सर्व रोगांवर औषध आहेस. तूच जाणकार वैद्यांचा दूत होऊन सर्वत्र विवरण करतोस.’’ (ऋ १०/१३७/३) एका अन्य मंत्रात वैद्य म्हणत आहे - ‘‘हे राजे, मी हवीद्वारे तुला नवजीवन देत आहे. तुला अज्ञात रोगापासून मुक्त करीन आणि राजयक्ष्या रोगाच्या पाशातून तुला सोडवीन. जर तुला संधिवाताने धरले असेल तर वायू आणि अग्नी तुला त्यापासूनही सोडवतील.’’ (ऋ १०/१६१/१)’’
तृतीय अर्थ - (राजापर अर्थ) - (जिष्णोः) विजयशील (अश्वस्य) अशाप्रमाणे राष्ट्राच्या रथीचे संचालन करणारे (वाजिनः) अन्न-धान्य, शक्तीमानी समृद्ध व युद्धात प्रवीण असलेल्या (दधिक्राव्णः) अनेकांना जो आघार, विमानादी यानांच्या समूह जवळ असणारा असा जो राजा,त्याने केलेल्या नियमांचे मी (एक जागरूक प्रजाजन) पालन करतो. (सः) तो राजा (नः) आम्हा प्रजाजनांचे (मुखा) मुख (सुरभि) यशाच्या सुगंधाने (शुभ व मधुर वचनाने (करत्) सुशोभित करो आणि (नः) आमच्या (आपूंषि) आयुष्याची वर्षे (प्रतारिषट्) वाढवो. तात्पर्य हे की आयुर्वेद शिक्षण, चिकित्सेची व्यवस्था, कृषी- व्यापार- पशुपालन कार्यात उत्कर्ष, हिंसा- उपद्रवायीचे निवारम, शत्रु पारिपव्यादी सर्व उपायांद्वारे राजाने सर्व राष्ट्रवासीजनांना अकाल मृत्यूपासून वाचवावे.।। ७।।
भावार्थ - परमेश्वराची स्तुती, अग्निहोत्र आणि राजनियमांचे पालन याद्वारे आम्ही यशः सौरभ व दीर्घायुष्य प्राप्त केले पाहिजे. ।। ७।। महीधराने या मंत्रावर भाष्य करताना त्याने केलेल्या यजुर्वेद भाष्यातील कात्यायन श्रौतसूत्राच्या अश्वमेधविधीचे अनुसरण केले आहे. त्याने लिहिले आहे की यजमानाची प्रथम परिणीत पत्नी, जी घोड्याजवळ झोपलेली आहे. तिला तिथून उठवून अध्वर्यू, ब्रह्मा, उद्माता, होता आणि क्षता नावाच्या या ऋत्विजांनी या मंत्राचे वाचन करावे. तसेच ‘सुरभि नो मुखा करत’ या वाक्याची व्याख्या करीत लिहिले आहे की अश्लील भाषणामुळे दुर्गंधित झालेल्या मुखाला यज्ञाद्वारे सुगंधित करावे’ हे सर्व निव्वळ प्रलापभाग आहे. कोण शहाणा माणूस असे करील की आधी अश्लील भाषण करून मुख दुर्गंधित करील आणि नंतर त्याच्या शुद्धीकरणाच्या उपायांचा सोध करील ? ‘चिखलात हात बुडवून हात घाण करून नंतर धूत बसण्यापेक्षा चिखलात हात न घालणेच शहाणपणाचे असते.’ या पद्धतीचा अवलंब का करू नये ?
विशेष -
या मंत्रात श्लेष अलंकार आहे. तृतीय व चतुर्थ चरणात अन्त्यानुप्रासही आहे. दधिक्राषा, अश्व आणि वाजी हे तिन्ही शब्द अश्ववाचक असल्यामुळे इथे पुनरुक्ती वाटते, पण या शब्दांचा यौगिक अर्थ केल्यानंतर पुनरुक्ती वाटणारा दोष नाहीसा होता. यामुळे येथे पुनरुक्तवदाभास अलंकार आहे.।। ७।।