Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 359
ऋषिः - जेता माधुच्छन्दसः
देवता - इन्द्रः
छन्दः - अनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
पु꣣रां꣢ भि꣣न्दु꣡र्युवा꣢꣯ क꣣वि꣡रमि꣢꣯तौजा अजायत । इ꣢न्द्रो꣣ वि꣡श्व꣢स्य꣣ क꣡र्म꣢णो ध꣣र्त्ता꣢ व꣣ज्री꣡ पु꣢रुष्टु꣣तः꣡ ॥३५९॥
स्वर सहित पद पाठपु꣣रा꣢म् । भि꣣न्दुः꣢ । यु꣡वा꣢꣯ । क꣣विः꣢ । अ꣡मि꣢꣯तौजाः । अ꣡मि꣢꣯त । ओ꣣जाः । अजायत । इ꣡न्द्रः꣢꣯ । वि꣡श्व꣢꣯स्य । क꣡र्म꣢꣯णः । ध꣣र्त्ता꣢ । व꣣ज्री꣢ । पु꣣रुष्टुतः꣢ । पु꣣रु । स्तुतः꣢ ॥३५९॥
स्वर रहित मन्त्र
पुरां भिन्दुर्युवा कविरमितौजा अजायत । इन्द्रो विश्वस्य कर्मणो धर्त्ता वज्री पुरुष्टुतः ॥३५९॥
स्वर रहित पद पाठ
पुराम् । भिन्दुः । युवा । कविः । अमितौजाः । अमित । ओजाः । अजायत । इन्द्रः । विश्वस्य । कर्मणः । धर्त्ता । वज्री । पुरुष्टुतः । पुरु । स्तुतः ॥३५९॥
सामवेद - मन्त्र संख्या : 359
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 2; मन्त्र » 8
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 1;
Acknowledgment
विषय - इंद्र नावाच्या परमेश्वराचा, राजाचा व सूर्यादीचा महिमा -
शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) (परमात्मपर) (पुराम्) मनात घर करून राहिलेल्या तमोगुणाच्या अनेक --- (भिन्दुः) ध्वस्त करणारा (युवा) नित्य युवा अर्थात अजर, अमर, तसेच (कविः) वेदकाव्याचा कर्ता वा क्रान्तदर्शी तो (इंद्रः) इंद्र (अमितौजाः) अपरिमित तेजस्वी आहे. तो (वज्री) न्यायी व न्यायदंड धारण करणारा तसेच (पुरुष्टुतः) बुहस्तुत (इंद्र) ब्रह्मांडाचा सम्राट असून (विश्वस्य कर्मणः) सूर्य, चंद्र, पृथ्वी आदींचे परिभ्रमण, ऋतु निर्माण, नदी-प्रवाह, वृष्टी, पाप-पुण्याचे फल देणे आदी सर्व कर्मांचा (धर्ता) नियामक (अजायत) झालेला आहे.।।
द्वितीय अर्थ - (राष्ट्रपर) - (पुराम्) शत्रूच्या नगीर आणि त्याचे दुर्गा यांना (भिन्दुः) भग्न करणारा (युवा) तरुण आणि (कविः) राजनीतिशास्त्रवेत्ता व दूरद्रष्टा (अभितौजाः) अपरिमित पराक्रम करणारा तो (इंद्रः) आमचा शूरवीर राजा वा सेनापती (वज्री) विविध सस्त्रांच्या संग्रहकर्ता व अस्त्र शस्त्र प्रयोगनिपुण आहे, ती (पुरुष्टुतः) अनेक प्रजाजनांद्वारे प्रशंसित आहे आणि (विश्वस्य कर्मणः) सर्व राज्य कारभार, सैन्य संगठन या कार्यांचा (धर्ता) जबाबदारी उचलणारा (अजायत) असतो. (वा असा असायला पाहिजे.)।।
तृतीय अर्थ - (सूर्यपर अर्थ) (पुराम्) अंधकार, ढग, बर्फ आदींच्या नगरींना (समूहाला) (भिन्दुः) भेद न करणारा (युवा) पदार्थांचे मिश्रण व विभक्तीकरण करणारा (कविः) आपल्या धुरीवर फिरणारा अथवा पृथ्वी, मंगळ, बुध, चंद्र आदी ग्रह-उपग्रहांना आपल्याभोवती परिभ्रमण करविणारा (अभितैजाः) अपरिमित शक्ती व प्रकाश धारण करणारा (इंद्रः) सूर्य (सर्वांचा धारक आहे) तो (वज्री) किरणरूप वज्र धारण करणारा व (पुरुष्टुतः) खगोल- ज्योतिष जामणाऱ्या विद्वानांनी व वैज्ञानिकांनी ज्याचे वर्णन केले आहे, असा असून (विश्वस्य कर्मणः) सौरमंडलात दिसणाऱ्या सर्व प्राकृतिक कर्मांचे (दिवस- रात्र होणे, उदय अस्त होए आदींचा) (धर्ता) धारक (अजायत) म्हणून विद्यमान आहे.।। ८।।
चतुर्थ प्रपाठकातील द्वितीय अर्धाची दशती समाप्त.
चतुर्थ अध्यायातील प्रथम खंड समाप्त.
भावार्थ - या मंत्रात श्लेषालंकार आहे.।। ८।।
विशेष -
या मंत्रात श्लेषालंकार आहे.।। ८।।