Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 361
ऋषिः - वामदेवो गौतमः देवता - इन्द्रः छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0

क꣣श्यप꣡स्य꣢ स्व꣣र्वि꣢दो꣣ या꣢वा꣣हुः꣢ स꣣यु꣢जा꣣वि꣡ति꣢ । य꣢यो꣣र्वि꣢श्व꣣म꣡पि꣢ व्र꣣तं꣢ य꣣ज्ञं꣡ धी꣢꣯रा नि꣣चा꣡य्य꣢ ॥३६१

स्वर सहित पद पाठ

क꣣श्य꣡प꣢स्य । स्व꣣र्वि꣡दः꣢ । स्वः꣣ । वि꣡दः꣢꣯ । यौ꣢ । आ꣣हुः꣢ । स꣣यु꣡जौ꣢ । स꣣ । यु꣡जौ꣢꣯ । इ꣡ति꣢꣯ । य꣡योः꣢꣯ । वि꣡श्व꣢꣯म् । अ꣡पि꣢꣯ । व्र꣣त꣢म् । य꣣ज्ञ꣢म् । धी꣡राः꣢꣯ । नि꣣चा꣡य्य꣢ । नि꣣ । चा꣡य्य꣢꣯ ॥३६१॥


स्वर रहित मन्त्र

कश्यपस्य स्वर्विदो यावाहुः सयुजाविति । ययोर्विश्वमपि व्रतं यज्ञं धीरा निचाय्य ॥३६१


स्वर रहित पद पाठ

कश्यपस्य । स्वर्विदः । स्वः । विदः । यौ । आहुः । सयुजौ । स । युजौ । इति । ययोः । विश्वम् । अपि । व्रतम् । यज्ञम् । धीराः । निचाय्य । नि । चाय्य ॥३६१॥

सामवेद - मन्त्र संख्या : 361
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 2
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 2;
Acknowledgment

शब्दार्थ -
(प्रथम अर्थ) - (ब्रह्माणुपर) विद्वज्जन ज्या अति तत्त्व आणि सौम्य तत्वाला (स्वर्विदः) प्रकाश आणि आनंद देणारे मानतात व (कस्यपस्य) सर्वद्रष्टा इंद्र जगदीश्वराचा (सयुजौ इति) सहयोगी (आहुः) म्हणतात आणि ज्यांच्या (अग्नी व सौम्य तत्त्वाच्या) (यज्ञरूप म्हणतात, (तौ) त्या अग्नितत्त्व व सौम्य तत्त्वाला (निचाय्य) जाणून घेऊन, हे मनुष्यानो, तुम्ही (धीरा) पंडित व्हा.।।। या मंत्राची देवता इंद्र असल्यामुळे येथे ङ्गकश्यपफ इंद्रालाच म्हटले आहे. वेदांमध्ये इंद्राचे प्रधान सहचारी म्हणून अग्नी व सोम यांचा उल्लेक सापडतो. कारण अनेक ठिकाणी इंद्रासोबत या दोघांचे वर्णन सापडते. जसे ‘ंइंद्राग्नी शर्म यच्छतम्’ (ऋ १/२१/६) ‘इंद्राग्नी वृत्रहणा जुषेथाम्’ (७/९३/१) या मंत्रात अग्नी इंद्राचा सहचारी आहे आणि ‘इंद्रासोमा युवमस्माँ अविष्टम्’ (२/३०/६) ‘इंद्रासोमा तपत रक्ष उब्जतम्’ (अ। ८/४/१) या मंत्रात इंद्राचा सहचारी सोम आहे. एका मंत्रात तर इंद्र, अग्नी व सोम तिन्ही एकत्र दिसतात. जसे ‘यशा इन्द्रो यशा अग्निर्यशाः सोमो अजायत’ (अश ६/५८/३) निरुक्त वा वेदांगामध्ये इंद्राचे सहकारी म्हणून सर्वप्रथम अग्नी व सोम यांचीच गणना केली आहे. (वि ७/१०) हे जग अग्नी व सोम (आग्नेय तत्त्व व सौम्य तत्त्व) याद्वारे निर्मित आहे. श्नोपनिषदामध्ये याच दोन तत्त्वांना रयि व प्राण म्हटले आहे. तिथे असे लिहिले आहे की कबन्धी कात्यायन याने भगवान पिप्पलादकडे जाऊन असा प्रश्न केला की भगवन्, या प्रजा कोठून उत्पन्न झाल्या आहेत ? तेव्हा पिप्लाद यांनी उत्तर दिले की प्रजापतीने प्रजेची उत्पत्ती कण्याच्या हेतूने तप केले आणि तपाद्वारे त्यांनी रयि व प्राण यांची जोडी उत्पन्न केली. त्याचा उद्देश होता की हे दोघे मिळून अनेक प्रजा उत्पन्न करतील. तिथेच प्राणाचे व रदीचे सूर्य- चंद्र, उत्तरायण - दक्षिणायन, शुक्ल पक्ष - कृष्ण पक्ष, दिवस-रात्र या रूपात वर्णन केले आहे. शतपथ ब्राह्मणात म्हटले आहे की सूर्य आग्नेय आहे, चंद्र सौम्य आहे, दिवस आग्नेय आहे, रात्र सौम्य आहे, शुक्ल पक्ष आग्नेय आहे, कृष्ण पक्ष सौम्य आहे (श. १/६/३/२४) या मंत्रात हेच अग्नी - सोम इंद्राच्या सहचर रूपाने वर्णित आहेत, असे समजले पाहिजे. इंद्र परमेश्वर यांच्याच माध्यमातून जगाची उत्पत्ती करतो आणि त्याचे संचालन करतो. याच मंत्रात असेही म्हटले आहे की यांचे (अग्नी - सोम) सर्व कर्म यज्ञरूप आहेत. वेदांमध्ये अन्यत्र एका स्थळी अग्नी व सोम यांचा महिमा सांगितला आहे - ‘हे शुभ कर्म करणारे अग्नी व सोम, तुम्ही दोघांनीच आकाशात दीप्तिमान पिंडांना धारण केले आहे. पर्वतांवर थिजलेल्या जमलेल्या हिमामुळे ज्या नद्या वाळतात, त्यांना हिम वितळणेद्वारे तुम्ही वाहत्या करता. हे अग्नी व सोम, तुम्ही ब्रह्मपासून बृद्धी घेऊन यज्ञाकरिता हा विशाल लोक उत्पन्न करता. (ऋ २/९३/ ५) जे लोक इंद्राचे सहचारी असलेल्या या अग्नी व सोम यांचे हे वेद प्रतिपादित महत्त्व जाणून घेतात वा जाणतात, तेच पंडित असतात.।। द्वितीय अर्थ - (शरीरपर अर्थ) विद्वज्जन (यौ) ज्या बुद्धी, मन अथवा प्राण - अपानरूप अग्नी व सोम यांना (स्वर्विदः) विवेकाचा प्रकाश आणि आनंदाचा अनुभव देणाऱ्या (कश्यपस्य) ज्ञान- द्रष्टा जीवात्मारूप इंद्राचे (सयुजौ) सहकारी (आहुः) म्हणतात आणि (ययोः) बुद्धी - मनाच्या वा प्राण - अपानाच्या (विश्वम् अपि) सर्वच (व्रतम) कर्मांना विद्वज्जन (यज्ञम्) ज्ञान - यज्ञ वा शरीर संचालन यज्ञ म्हणतात (तौ) त्या बुद्धी - मन व प्राण -अपान यांना (विचाय्य) चांगल्या प्रकारे जाणून घेऊन वा त्यांचा प३योग करून हे मनुष्यांनो, तुम्ही (धीराः) ज्ञान- बोध धारण करा अथवा शरीर धारणात समर्थ व्हा. तात्पर्य हे की तुम्ही बुद्धी व मनाचा सम्यक् उपयोग करून, ज्ञानेन्द्रियांच्या साह्याने ज्ञान - संच व संचय करण्यात समर्थ व्हा आणि प्राणायामाद्वारे प्राण - अपान यांना वश करून शरीर धारण कार्यात समर्थ व्हा.।। तृतीय अर्थ - (राष्ट्रपर अर्थ) - राजनीतीचे जाणकार (यौ) ज्या सेनाध्यक्ष आणि राज्यमंत्री रूप अग्नि- सोम यांना (स्वर्विदः) प्रजेला सुख समाधान देणारे आणि (कश्यपस्य) राजपुरुषांचे कार्ये व प्रजेचे सुख - दुःख ओळखणारे (समुजौ) दोन सहाय्यक (आहुः) म्हणतात आणि (ययोः) ज्या सेनाध्यक्ष व राज मंत्रीच्या (विश्वम् अपि) समस्त (वृतम्) शत्रुनिवारण व राज्य संचालनरूप कार्यांना (यज्ञम्) राष्ट्र यज्ञाची पूर्ती करणारे (आहुः) म्हणतात. त्यामुळे त्या दोघांचा (निचाय्य) सत्कार करून हे प्रजाजनहो, तुम्ही (धीराः) राष्ट्रधारक व्हा.।। चतुर्थ अर्थ - (आदित्य व अहोरात्र पर अर्थ) - विद्वज्जन (यौ) ज्या दिवस व रात्रभरूप अग्नी - सोम यांना (स्वर्विदः) सुखाची प्राप्ती करविणाऱ्या तसेच (कश्यपस्य) सर्व पदार्थ पाहण्यास साधन असलेल्या आणि गतिमान पृथ्वी आदी लोकांचा रक्षक असलेल्या आदित्याचा (समुजौ) सहकारी (आहुः) म्हणतात, तसेच (ययोः) ज्या दिवस- रात्रीच्या (विश्वम् अपि) साऱ्याच (व्रतम्) कमा४ंना (यज्ञम्) विद्वज्जन यज्ञात्मक वा परोपकारात्मक (आहुः) म्हणतात (तौ) त्या दिवस - रात्रींना (निचाय्य) पूर्णपणे जाणून घेत, हे मनुष्यानो, तुम्हीही (धीराः) परोपकार वृत्ती धारण करा.।। २।।

भावार्थ - परमेश्वराचे सहचर (सृष्टि निर्मितीत सहायक) असलेल्या अग्नी-तत्त्वाला व सोम तत्त्वाला तसेच जीवात्म्याचे सहचर असलेल्या बुद्धीला अथवा प्राण- अपान यांना, राजाचे सहचर सेनाधीश व राजमंत्री यांना आणि सूर्याचे सहचर दिवस - रात्र यांना यथोचित रूपाने जाणून घेऊन मनुष्यांनी त्यापासून आवस्यक लाभ प्राप्त केले पाहिजेत.।। २।।

इस भाष्य को एडिट करें
Top