Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 376
ऋषिः - सव्य आङ्गिरसः
देवता - इन्द्रः
छन्दः - जगती
स्वरः - निषादः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
अ꣣भि꣢꣫ त्यं मे꣣षं꣡ पु꣢रुहू꣣त꣢मृ꣣ग्मि꣢य꣣मि꣡न्द्रं꣢ गी꣣र्भि꣡र्म꣢दता꣣ व꣡स्वो꣢ अर्ण꣣व꣢म् । य꣢स्य꣣ द्या꣢वो꣣ न꣢ वि꣣च꣡र꣢न्ति꣣ मा꣡नु꣢षं भु꣣जे꣡ मꣳहि꣢꣯ष्ठम꣣भि꣡ विप्र꣢꣯मर्चत ॥३७६॥
स्वर सहित पद पाठअ꣣भि꣢ । त्यम् । मे꣣ष꣢म् । पु꣣रुहूत꣢म् । पु꣣रु । हूत꣢म् । ऋ꣣ग्मि꣡य꣢म् । इ꣡न्द्र꣢꣯म् । गी꣣र्भिः꣢ । म꣣दत । व꣡स्वः꣢꣯ । अ꣣र्णव꣢म् । य꣡स्य꣢꣯ । द्या꣡वः꣢꣯ । न । वि꣣चर꣢न्ति । वि꣣ । च꣡र꣢꣯न्ति । मा꣡नु꣢꣯षम् । भु꣣जे꣢ । मँ꣡हि꣢꣯ष्ठम् । अ꣣भि꣢ । वि꣡प्र꣢꣯म् । वि । प्र꣣म् । अर्चत ॥
स्वर रहित मन्त्र
अभि त्यं मेषं पुरुहूतमृग्मियमिन्द्रं गीर्भिर्मदता वस्वो अर्णवम् । यस्य द्यावो न विचरन्ति मानुषं भुजे मꣳहिष्ठमभि विप्रमर्चत ॥३७६॥
स्वर रहित पद पाठ
अभि । त्यम् । मेषम् । पुरुहूतम् । पुरु । हूतम् । ऋग्मियम् । इन्द्रम् । गीर्भिः । मदत । वस्वः । अर्णवम् । यस्य । द्यावः । न । विचरन्ति । वि । चरन्ति । मानुषम् । भुजे । मँहिष्ठम् । अभि । विप्रम् । वि । प्रम् । अर्चत ॥
सामवेद - मन्त्र संख्या : 376
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 4; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 4; मन्त्र » 7
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 3;
Acknowledgment
विषय - जगदीश्वर आणि राजा, यांची वाणीने अर्चना केली पाहिजे.
शब्दार्थ -
(त्यम्) त्या (मेषम्) सुखाचे सिंचन करणाऱ्या तसेच (पुरुहूतम्) अनेक जण ज्याचे ावाहन करतात आणि (ऋग्मियम्) अर्चनीय व (वस्वः अर्णवम्) धनाचा जो सागर त्या (इन्द्रम्) परमेश्वराला /राजाला, हे लोकहो, तुम्ही आपल्या (बीर्भिः) वाणीद्वारे (मदत) हर्षित करा (परमेश्वर नित्य आनंदमय असल्यामुळे तो प्रसन्न वा हर्षित होत नाही. येथे अर्थ असा की त्याची स्तुती करून तुम्ही आनंदित व्हा. राजा मात्र प्रशंसेने प्रसन्न होतो. हे मनुष्यांनो, (यस्य) ज्या परमेश्वराच्या /राजाच्या (घावः) दीप्ती वा तेज (मानुषम्) मनुष्याचा (न विचरन्ति) कधी अपकार करीत नाही. (उलट उपकारच करतो) त्या (मंहिष्ठम्) अत्यंत महान आणि दाता (विप्रम्) मेधावी विद्वान परमेश्वराला /राजाला (भुजे) तुमचे पालन करण्यासाठी तुम्ही (अर्चत) पूजित वा अत्कृत करा.।। ७।।
‘वस्वः अर्णवम्’ या मंत्रात समुद्रवाचक अर्णव शब्दाचा लक्षणा शब्द शक्तीने ‘अर्णव’ म्हणजे ‘निधी’ हा लक्ष्यार्थ घेतला पाहिजे. प्रत्यक्ष निधी न म्हणता ‘अर्णव’ शब्दाचा प्रयोग केल्यामुळे त्यंत धनवान होणे हा व्यंग्दार्थही सूचित होत आहे. इन्द्रावर अर्णवाचा आरोप केल्यामुळे येथे रूपक अलंकार आहे.।। ७।।
भावार्थ - सुखाची वृष्टी करणारा, ऐश्वर्याचा सागर, सर्वांहून महान, सर्वांहून श्रेष्ठ दानी व मेघावी परमेश्वरच पूजनीय आहे. याच गुणांनी युक्त राजाचा देखील प्रजेने सत्कार केला पाहिजे व त्यास नेहमी प्रोत्साहन दिले पाहिजे.।। ७।। विवरणकार माधव याने या मंत्राच्या आधारावर एक ऐतिहासिक कथा रचली आहे. ‘‘अंगिरा नावाचा एक ऋषी होता. त्याने इंद्राला पुत्र रूपाने प्राप्त करण्यासाठी याचना करीत आत्म ध्यान केले. त्याच्या योग शक्तीमुळे ध्यानाचे सुफल म्हणून त्याला पुत्र झाला. नाव ठेवले सव्य. इंद्राने मेषाचे (एडको) रूप धारण केले व त्याने सव्याला पळवून नेले.’’ ही कथा सांगून माधव म्हणतो की ‘‘या मंत्रात हीच कथा सांगितली आहे. यामध्ये मेष रूपधारी इंद्राची स्तुती केली आहे.’’ पण ही घटना केवळ कल्पना प्रसूत आहे. मंत्राचा ऋषी अंगिरस सव्य आहे आणि मंत्रात इंद्राला मेष म्हटले आहे. हे पाहून वरील कथेची निर्मिती केली आहे.।। सायणाचार्य यांनी ‘मेष’ शब्द तुदादिगणाच्या स्पर्धात्मक ‘मिष्’ धातूपासून निर्मित आहे, असे मानून आधी ‘मेष’ शब्दाचा यौगिक अर्थ म्हमजे ‘शत्रूंशी स्पर्धा करणारा’ असा केला आहे व नंतर वैकल्पिक रूपाने एक इतिहासही दाखविला आहे. तो असा की कण्व ऋषीचा पुत्र मेधातिथी यज्ञ करीत होता. तेव्हा इंद्र मेषाचे (एडक्याचे) रूप धारण करून तिथे आला आणि तिथे ठेवलेला सोमरस त्याने पिऊन टाकला. तेव्हा ऋषीने इंद्राला ‘मेष’ म्हटले होते, म्हणून आताही इंद्राचे नाव मेष आहे. ही कथादेखील काल्पनिक आहे. वास्तवात अशी कोणतीही घटना घडलेली नसून या मंत्रात तसा इतिहास मुळीच नाही, हे सूज्ञांस सांगणे न लगे.।।
इस भाष्य को एडिट करें