Sidebar
सामवेद के मन्त्र
सामवेद - मन्त्रसंख्या 466
ऋषिः - गृत्समदः शौनकः
देवता - इन्द्रः
छन्दः - अष्टिः
स्वरः - मध्यमः
काण्ड नाम - ऐन्द्रं काण्डम्
0
त꣢व꣣ त्य꣡न्न꣢꣯र्यं नृ꣣तो꣡ऽप꣢ इन्द्र प्रथ꣣मं꣢ पू꣣र्व्यं꣢ दि꣣वि꣢ प्र꣣वा꣡च्यं꣢ कृ꣣त꣢म् । यो꣢ दे꣣व꣢स्य꣣ श꣡व꣢सा꣣ प्रा꣡रि꣢णा꣣ अ꣡सु꣢ रि꣣ण꣢न्न꣣पः꣢ । भु꣢वो꣣ वि꣡श्व꣢म꣣भ्य꣡दे꣢व꣣मो꣡ज꣢सा वि꣣दे꣡दूर्ज꣢꣯ꣳ श꣣त꣡क्र꣢तुर्वि꣣दे꣡दिष꣢꣯म् ॥४६६॥
स्वर सहित पद पाठत꣡व꣢꣯ । त्यत् । न꣡र्य꣢꣯म् । नृ꣣तो । अ꣡पः꣢꣯ । इ꣣न्द्र । प्रथम꣢म् । पू꣣र्व्य꣢म् । दि꣣वि꣢ । प्र꣣वाच्य꣢म् । प्र꣣ । वा꣡च्य꣢꣯म् । कृ꣣त꣢म् । यः । दे꣣व꣡स्य꣢ । श꣡व꣢꣯सा । प्रा꣡रि꣢꣯णाः । प्र꣣ । अ꣡रि꣢꣯णाः । अ꣡सु꣢꣯ । रि꣣ण꣢न् । अ꣣पः꣢ । भु꣡वः꣢꣯ । वि꣡श्व꣢꣯म् । अ꣣भि꣢ । अ꣡देव꣢꣯म् । अ । दे꣣वम् । ओ꣡ज꣢꣯सा । वि꣣दे꣢त् । ऊ꣡र्ज꣢꣯म् । श꣣त꣡क्र꣢तुः । श꣣त꣢ । क्र꣣तुः । विदे꣢त् । इ꣡ष꣢꣯म् ॥४६६॥
स्वर रहित मन्त्र
तव त्यन्नर्यं नृतोऽप इन्द्र प्रथमं पूर्व्यं दिवि प्रवाच्यं कृतम् । यो देवस्य शवसा प्रारिणा असु रिणन्नपः । भुवो विश्वमभ्यदेवमोजसा विदेदूर्जꣳ शतक्रतुर्विदेदिषम् ॥४६६॥
स्वर रहित पद पाठ
तव । त्यत् । नर्यम् । नृतो । अपः । इन्द्र । प्रथमम् । पूर्व्यम् । दिवि । प्रवाच्यम् । प्र । वाच्यम् । कृतम् । यः । देवस्य । शवसा । प्रारिणाः । प्र । अरिणाः । असु । रिणन् । अपः । भुवः । विश्वम् । अभि । अदेवम् । अ । देवम् । ओजसा । विदेत् । ऊर्जम् । शतक्रतुः । शत । क्रतुः । विदेत् । इषम् ॥४६६॥
सामवेद - मन्त्र संख्या : 466
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 12;
Acknowledgment
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 5; अर्ध-प्रपाठक » 2; दशतिः » 3; मन्त्र » 10
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 4; खण्ड » 12;
Acknowledgment
विषय - इन्द्र देवता। त्याच्या लोकोपकारी कर्मांचे वर्णन -
शब्दार्थ -
हे (नृतो) पृथ्वी आदी ग्रह- नक्षत्रांना नाचविणारे (इन्द्र) परमेश्वर, (नर्यम्) मनुष्यांचे हितकर (प्रथमम्) श्रेष्ठ आणि (पूर्व्यम्) पूर्वीपासून चालत आलेले (तव) तुमचे (त्यत्) ते (अपः) (ग्रहादीचे संचालन, सृष्ट्युत्क्यी, कर्म फलप्रदान आदी) कर्म (प्रवाच्यम्) अत्यंत प्रशंसनीय आहे. (यः) तुम्ही हे जे (देवस्य) प्रकाशक सूर्याच्या (शवसा) शक्तीने (असु) प्राणशक्तीला (रिणन्) प्रेरित करीत (अपः) अंतरिक्षस्थित जलाला (प्रारिणाः) वृष्टीच्या रूपाने खाली आणता आणि तुम्ही जे (विश्वम्) सर्व (अदेवम्) अप्रकाशाचा कारणीभूत भौतिक अंधकाराला व मानसिक नैराश्यरूप अंधकाराला (ओजसा) आपल्या शक्तीने (अभिभुवः) पराभूत करता (तुमची ही सर्व कर्मे खरोखर अति प्रशंसनीय आहेत.) पुढे परोक्षकृत वर्णन केले आहे, (म्हणजे कामना केली आहे की) असा तो (शतक्रतुः) अनंत प्रज्ञावान आणि अनंत कर्मवान परमेश्वर आम्हाला (ऊर्जम्) इच्छित कार्याला (विदेत्) पूर्ण करो.।। १०।।
भावार्थ - परमेश्वरच सूर्याद्वारे पृथ्वी आदी लोक- लोकांतरांना नाचवीत सूर्याच्या भोवती वा स्वतःच्या धुरीवर फिरवीत असतो. अंतरिक्षात थांबून असलेल्या पाण्याला तोच पृथ्वीवर आणतो. याचप्रमाणे आत्मलोकात थांबून वा सुप्तावस्थेत असलेल्या आनंदधारांना परमेश्वरच मनोभूमीवर आणतो. तोच परमेश्वर जसे विशाळ अंधकाराला विदीर्ण करून भौतिक प्रकाश उत्पन्न करतो, तसेच मनोभूमीवर व्याप्त तमोगुणाच्या प्रभावाला छिन्न- विच्छिन्न करतो व आत्म-प्रकाश प्रकटित करतो.।। १०।। या दशतीमध्ये सूर्य, पवमान, हरि, सविता, अग्नि, विष्णु या विविध नावाने जगदीश्वराच्या गुण- कर्मांचे वर्णन असून ङ्गविश्वेदेवाफ आणि मरुत्-गण यांचे आवाहन आहे. यामुळे या दशतीच्या विषयांशी मागील दशतीच्या विषयांची संगती आहे, असे जाणावे.।। पंचम प्रपाठकातील द्वितीय अर्धची तृतीय दशती समाप्त. चतुर्थ अध्यायाचा द्वादश खंड समाप्त. हा चतुर्थ अध्याय येथे संपला.
विशेष -
या मंत्रात ‘रिणा, रिण,’ ‘देव देव’ ‘विदेदू, विदेदि’ या सर्व स्थानी छेकानुप्रास आहे.।। १०।।