Loading...

सामवेद के मन्त्र

सामवेद - मन्त्रसंख्या 495
ऋषिः - अहमीयुराङ्गिरसः देवता - पवमानः सोमः छन्दः - गायत्री स्वरः - षड्जः काण्ड नाम - पावमानं काण्डम्
0

अ꣣या꣢ वी꣣ती꣡ परि꣢꣯ स्रव꣣ य꣡स्त꣢ इन्दो꣣ म꣢दे꣣ष्वा꣢ । अ꣣वा꣡ह꣢न्नव꣣ती꣡र्नव꣢꣯ ॥४९५॥

स्वर सहित पद पाठ

अ꣣या꣢ । वी꣣ती꣢ । प꣡रि꣢꣯ । स्र꣣व । यः꣢ । ते꣣ । इन्दो । म꣡दे꣢꣯षु । आ । अ꣣वा꣡ह꣢न् । अ꣣व । अ꣡ह꣢꣯न् । न꣣वतीः꣢ । न꣡व꣢꣯ ॥४९५॥


स्वर रहित मन्त्र

अया वीती परि स्रव यस्त इन्दो मदेष्वा । अवाहन्नवतीर्नव ॥४९५॥


स्वर रहित पद पाठ

अया । वीती । परि । स्रव । यः । ते । इन्दो । मदेषु । आ । अवाहन् । अव । अहन् । नवतीः । नव ॥४९५॥

सामवेद - मन्त्र संख्या : 495
(कौथुम) पूर्वार्चिकः » प्रपाठक » 6; अर्ध-प्रपाठक » 1; दशतिः » 1; मन्त्र » 9
(राणानीय) पूर्वार्चिकः » अध्याय » 5; खण्ड » 3;
Acknowledgment

शब्दार्थ -
(इन्दो) आनंद रसाचे व वीररसाचे भंडार हे परमेश्वर, आपण (अया वीती) या रीतीने (परि स्रव) उपासकांच्या अंतःकरणात प्रवाहित व्हा की ज्यायोगे (यः) जो कोणी उपासक (मदेषु) तुम्ही दिलेल्या नंदात (आ) मग्न होईल आणि त्याचे विरोधी असणाऱ्या (नवनवतीः नव्याण्णव वृत्रांचा (अवाहन्) संहार करू शकेल.।। वेदांप्रमाणे माणसाचे सरासरी आयुष्य शंभर वर्षाचे आहे. पैकी नऊ वा दहा महिने आईच्या गर्भात व्यतीत होतात, म्हणून माणूस प्रत्यक्षात नव्वाण्णव वर्ष जगतो. त्या नव्याण्णव वर्षात येणारी नव्याण्णव विघ्ने यांना वृत्र म्हणतात. सोमजनित आनंदाने व वीरत्वाने तृप्त होऊन माणसाने त्या सर्व वृत्रांचा संहार करण्यात समर्थ व्हावे, हा आशय आहे.।। ९।।

भावार्थ - परमेश्वरापासून झरत असलेला आनंदरस अथवा वीररस स्तोताजनाला इतके आल्हादित करून टाकतो की तो जीवनात येणाऱ्या सर्व विघ्नांचा आणि शत्रूंचा संहार करू शकतो.।। ९।।

इस भाष्य को एडिट करें
Top